दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 15 जानेवारी 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 25 पौष शके 1947; तिथि : द्वादशी 20:16; नक्षत्र : ज्येष्ठा 29:47
- योग : वृद्धी 20:37; करण : गरज अहोरात्र
- सूर्य : मकर; चंद्र : वृश्चिक 29:47; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:19
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
संक्रात करिदिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामातील अडथळ्यांवर मात करता येईल. समतोल आणि समन्वय राखल्याने कामात प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करू शकाल. प्रवास करावा लागेल, तो फायदेशीर ठरेल. आईकडून तुम्हाला विशेष लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी समाधानकारक यश मिळेल. चिंताजनक वातावरणातून काहीसा दिलासा मिळेल.
वृषभ – कोणत्याही व्यवहारात अस्पष्टता चांगली नाही. त्यामुळे तुमचे जे विचार असतील ते प्रामाणिकपणे मांडा. विरोधक आज तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. त्यातून सावरण्यासाठी वेळ आणि पैसा लागेल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर द्या.
मिथुन – पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील. प्रलंबित निधी वसूल करण्यात तुम्हाला मदत मिळेल. चांगल्या कामाचा मार्ग मोकळा होईल. व्यवसाय आणि व्यापार स्थिती अनुकूल राहील. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण कराल.
कर्क – स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या. आशा आणि उत्साह यामुळे तुमचा कामे हातावेगळी करण्याचा वेग वाढेल. प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरतील. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. आज एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे भेट म्हणून मिळू शकतात. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. मात्र आज विवेकाने वागण्याची गरज आहे.
हेही वाचा – दिग्या नव्हे, ‘दिगास’… फ्रेंच अवलिया!
सिंह – तुमच्या धार्मिक श्रद्धा फलदायी ठरतील. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. मात्र निराधार शंका मानसिक त्रास देऊ शकतात. कामाच्या भरगच्च वेळापत्रकाचा आराम आणि विश्रांतीवर परिणाम होईल. मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो. प्रतिष्ठित लोकांकडून सहानुभूती मिळेल. मात्र आज फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कन्या – कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे आणि समन्वयामुळे काम सोपे होईल. आजचा दिवस काहीतरी नकारात्मक परिणाम देऊन जाणारा असेल. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य उपलब्ध होईल. जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत सहकार्य केल्याने फायदे होतील. इच्छित कामे यशस्वी होतील.
तुळ – वाटाघाटी करून कामाला अंतिम रूप देणे हे योग्य ठरेल. तथापि, मन अकारण द्विधा मनस्थितीत राहील. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे फायदेशीर राहील. आशा आणि उत्साहचा कामावर अनुकूल परिणाम साधला जाईल. तुमच्या कामाचा वेग वाढेल. जुने मित्र भेटतील.
वृश्चिक – शत्रूंची भीती, चिंता, संततीबद्दल त्रास आणि अनावश्यक खर्च यामुळे आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. भावंडांकडून एखाद्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. उत्पन्न आणि खर्च समान राहील. व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल.
धनु – व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य स्थापित होईल. आरोग्य चांगले राहील. “चांगले केले तर चांगलेच तुमच्या वाट्याला येईल” ही म्हण लक्षात ठेवा. इतरांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणे टाळा, कारण अशाने तुमचेच नुकसान होण्याची शक्यता आहे. आज कर्ज आणि दीर्घकालीन आजारातून मुक्तता देखील शक्य आहे.
मकर – प्रवास शुभ राहील. कामाकडे बारकाईने लक्ष ठेवा. विरोधक नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. हितचिंतक मानले जाणारे लोकही तुमच्या पाठीमागे विरोधाकांना मदत करू शकतात. स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्यास मदत होईल.
कुंभ – हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ लागेल. संवादातून यश मिळविण्याच्या प्रयत्नांमुळे फायदा होईल. प्रवासामुळे दीर्घकालीन परिणाम मिळतील. काम उरकण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ होईल. फायदेशीर प्रकल्प पुढे नेण्याचे प्रयत्न प्रबळ असतील. इच्छित कामे यशस्वी होतील.
मीन – मनातील सकारात्मक विचार अधिक दृढ होतील. महत्त्वाची कामे हातावेगळी करा; कारण नंतर ती वेळखाऊ ठरतील. भावंडांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. इच्छित कामे यशस्वी होतील. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करण्यात तुम्हाला मदत मिळेल.
दिनविशेष
ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव
टीम अवांतर
स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान ज्यांच्याकडे जातो, त्या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातार्यातील गोलेश्वर येथे झाला. त्यांचे वडील दादासाहेब हे ख्यातनाम पैलवान होते. त्यामुळे खाशाबा यांना कुस्तीचे प्राथमिक शिक्षण हे घरीच वडिलांकडून मिळाले. नंतर ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला त्यांना बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांनी कुस्तीचे प्रशिक्षण दिले आणि मार्गदर्शन केले.
हेही वाचा –
1948 मध्ये त्यांची लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत फ्लायवेट गटासाठी कुस्तीमध्ये निवड झाली. या स्पर्धेत ते जिंकू शकले नाहीत. खरंतर, ही ऑलिम्पिक स्पर्धा खाशाबा पहिल्यांदा खेळले. त्यानंतर लगेच त्यांनी पुन्हा ऑलिम्पिक खेळायचं ते पदक जिंकण्यासाठीच, असं ठरवलेलं होतं. लंडनसाठी तयारी करताना आणि अगदी तिथपर्यंत पोहोचताना त्यांना खूप अडचणी आल्या.
हेही वाचा – उधारी अन् तरुणाच्या जीवाचे मोल!
पण 1952 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांची बॉटमवेट गटात म्हणजे 57 किलो वजन गटात निवड झाली, पण खाशाबा यांच्याकडे ऑलिम्पिक स्पर्धेस जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी गावातील सर्व लोकांनी तसेच आजूबाजूच्या लोकांनी वर्गणी गोळा करून खाशाबा यांना जाण्यासाठी पैसे जमा केले.
1952 मधील हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा सेमी फायनल्सपर्यंत पोहचले. तोपर्यंत त्यांनी जर्मनी, कॅनडा, मेक्सिको यांच्यासोबत झालेल्या स्पर्धा जिंकल्या होत्या. खाशाबा जाधव यांनी या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. त्यांनी जिंकलेले हे कांस्य पदक वैयक्तिक पातळीवर स्वतंत्र भारताला मिळालेले पाहिले ऑलिम्पिक पदक ठरले. त्यामुळे त्यांचा विजय हा भारत देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट ठरली. अशा या महान कुस्तीपटूचे 14 ऑगस्ट 1984 रोजी निधन झाले.


