Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 15 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 15 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 15 डिसेंबर 2025; वार : सोमवार
  • भारतीय सौर : 24 अग्रहायण शके 1947; तिथि : एकादशी 21:19; नक्षत्र : चित्रा 11:07
  • योग : शोभन 12:29; करण : बव 08:02
  • सूर्य : वृश्चिक; चंद्र : तुळ; सूर्योदय : 07:02; सूर्यास्त : 18:02
  • पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

सफला एकादशी

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे उत्साह आणखी वाढेल. परंतु, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तब्येत बिघडू शकते. आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. मनावर नियंत्रण ठेवा, अन्यथा महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येणार नाही. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे.

वृषभ – सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु, या सोबतच दान-पुण्य करावे. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल.

मिथुन – मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. भविष्यात ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे, अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरातील परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु कौटुंबिक नात्यातल्या सगळ्या तक्रारी दूर होतील. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा.

कर्क – नोकरीच्या ठिकाणी काही काळ केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल; सहकारी, सहयोगी मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील, असे दिसत नाही. कर्ज मिळविण्यात येणाऱ्या अडचणी आज दूर होतील. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. ऐतिहासिक स्थळांवर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन कराल.

सिंह – हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. संपत्तीशी संबंधित एखादे प्रकरण कोर्ट-कचेरीत प्रलंबित असेल तर, आज ते मार्गी लागेल आणि त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. अडचणीच्या प्रसंगी तुमचे कुटुंब तुमच्या बचावासाठी धावून येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील.

कन्या – अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या प्रतिमेला त्यामुळे धक्का बसू शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. फारसा परिचय नसलेल्या लोकांजवळ तुमच्या खासगी गोष्टी बोलू नका. भविष्यासाठी तुम्ही चांगले प्लॅन बनवू शकतात परंतु, त्याची वाच्यता कोणाकडे करू नका.

तुळ – आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. कुटुंबीयांबद्दल कायम आपुलकीने वागा, त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे चार क्षण व्यतीत करा.

हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी आहार-विहार

वृश्चिक – दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकतात, त्यामुळे पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. अल्पकालीन प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवून नवे तंत्रज्ञान शिकून घ्या आणि आपले कौशल्य वाढवा; त्याचा पुढे फायदा होईल. आज चांगल्या धनलाभाची शक्यता आहे, त्याचबरोबर अनावश्यक खर्च होणार नाही, याची काळजी घ्या.

धनु – संयम बाळगा, निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या स्वभावामुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज सहजपणे भांडवल उभे कराल, थकीत देणी परत मिळवाल. त्याचबरोबर कुठल्याही स्थितीमध्ये वेळेची कदर करावी लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्याकडील ज्ञानाच्या आधारे कुटुंबातील वयाने तुमच्यापेक्षा लहान सदस्यांना मार्गदर्शन कराल.

मकर – व्यापारातील नफा आज बऱ्याच व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, मात्र कामाच्या गडबडीत काही चूक होणार नाही, याची काळजी घ्या. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना, कुटुंबातील सर्वांची अनुकूलता असल्याची खात्री करा. जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

कुंभ – योगासने आणि ध्यानधारणा यामुळे प्रकृती चांगली राहील तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम राहाल. कामानिमित्त महत्त्वाच्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल, त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी संपर्क होऊ शकेल. भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करू शकता, सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी सर्व बाबी पडताळून घ्या.

मीन – उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. कामानिमित्त प्रभावी व्यक्तीला भेटताना दडपणाखाली आत्मविश्वास हरवू देऊ नका. असे होणे आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने हितकारक नाही, हे लक्षात ठेवा. भावा-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत जीभेवर ताबा ठेवा.


दिनविशेष

कडक शिस्तीचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन

टीम अवांतर

तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी. एन. शेषन यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 रोजी केरळ राज्याच्या पलक्कड जिल्ह्यातील तिरूनेल्लरी या गावी झाला. वस्तुत:, त्यांची खरी जन्मतारीख 15 जून 1933 रोजी, पण शाळेच्या सोयीसाठी त्यांनी तारीख 15 डिसेंबर नोंदवली आणि कागदोपत्री तीच कायम राहिली.

1955 मध्ये शेषन आयएएस परीक्षा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्या तुकडीतील टॉपर्समधील एक शेषन होते. 1957पासून जिल्हाधिकारी, दिंडीगुल येथून त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीस सुरुवात झाली ती मुख्य निवडणूक आयुक्तपदापर्यंत! देशात एक निवडणूक आयुक्तपद आहे आणि तेच सर्व देशभरात निवडणुका घेते, हे देशातील नागरिकांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच दाखवून दिले ते शेषन यांनीच.

हेही वाचा – शिवने दिलेली फाइल पाहून आकाश गोंधळला…

1990 साली भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची निवड झाली. 1990 ते 1996 अशी त्यांची ही कारकीर्द वादग्रस्त राहिली. या काळात भारतातील निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. निवडणूक प्रक्रियेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यांनी त्यावेळी घेतलेल्या धाडसी निर्णयांची आताच्या सर्व निवडणूक प्रक्रियांमध्ये कडक अंमलबजावणी केली जाते. मतदान ओळखपत्राच्या स्वरूपात मतदाराला ओळख दिली, शिवाय, निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदान ओळखपत्र अनिवार्य केले.

याशिवाय, केवळ कागदोपत्री असलेल्या आचारसंहितेचे कठोरतेने पालन करण्यास त्यांनी सर्व उमेदवारांसह नेत्यांना भाग पाडले. मतदाराला भूलविण्यासाठी उमेदवाराकडून होणार्‍या वारेमाप खर्चाला लगाम बसविण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय निवडणुकांना पारदर्शक अणि निष्पक्ष करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्तव्यदक्ष शेषन यांचे 10 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!