दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 14 ऑक्टोबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 22 आश्विन शके 1947; तिथि : अष्टमी 11:09; नक्षत्र : पुनर्वसू 11:53
- योग : सिद्ध 28:10; करण : तैतिल 22:46
- सूर्य : कन्या; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:18
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस चांगला जाईल. व्यवसायात अनपेक्षित फायदा आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. काही अडथळे येऊ शकतात, परंतु कठोर परिश्रमाने त्यावर यशस्वीपणे मात करता येईल. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध सुधारतील. आज जुने मित्र भेटू शकतात. आज आरोग्य चांगले राहील.
वृषभ – दिवसभरात संमिश्र अनुभव येतील. व्यवसाय चांगला राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना फलदायी ठरतील. वैयक्तिक कारणास्तव कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन – दिवस सामान्य असेल. शिक्षण आणि नोकरी संदर्भात काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तींना नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळेल आणि त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. कुटुंबाकडून आज पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत जागरूक रहा.
कर्क – दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात, परंतु बुद्धीचा उपयोग करून त्यावर मात कराल. नोकरी आणि व्यवसायात नवीन फायदे मिळतील. व्यवसायात गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत स्थलबदल शक्य आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सिंह – दिवस संमिश्र असेल. कठोर परिश्रमाने यश मिळेल, ज्यामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल. मात्र कामात साधेपणा आणि सामंजस्य राखण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे उत्तम. घाईघाईने केलेली कृती हानिकारक ठरू शकते. कोणतेही नवीन उपक्रम आज सुरू करू नका. मित्रांच्या होणाऱ्या भेटी आनंद देतील.
हेही वाचा – सैनिक हो, तुमच्यासाठी…
कन्या – दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही फारसे यश मिळणार नाही. त्यामुळे राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा एखाद्या वादात अडकू शकता. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. अशा परिस्थितीत डोके शांत ठेवून वागावे लागेल. अर्थात, यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. शारीरिक आरोग्य चांगले राहील.
तुळ – दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे काम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न कराल. सर्जनशील योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम गरजेचे आहेत. अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतील. आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक – दिवस संमिश्र असेल. व्यवसायात अडथळे येतील आणि कामांमध्ये यश मर्यादित राहील. भविष्याबद्दलचे नकारात्मक विचार उत्साह कमी करू शकतात. त्यामुळे ध्यान धारणा आणि मेडिटेशन करा. काहीतरी नवीन सुरू करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो विचार पुढे ढकला, कारण या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते.
धनु – दिवस सामान्य असेल. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल, परंतु अनावश्यक खर्चांमुळे आर्थिक स्थिती डळमळीत बनेल. कोणत्याही शंका मनात न बाळगता काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जुन्या मित्राची किंवा नातेवाईकाची भेट आनंद देऊन जाईल.
मकर – आजचा दिवस संमिश्र अनुभव देणारा असेल. व्यवसाय सामान्य राहील. अनावश्यक खर्च आर्थिक परिस्थिती कमकुवत करू शकतात. नकारात्मक विचार मागे सारा आणि आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करा. नवीन उपक्रम सुरू करत असाल तर इतरांचा सल्ला घेऊ नका. प्रियजनांकडूनच तुमचा विश्वासघात होऊ शकतो.
कुंभ – दिवस शुभ आणि फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रमांमुळेच सर्व कामांमध्ये यश मिळेल. सर्जनशील विचारशक्तीचे अनेक फायदे मिळतील. स्वाभिमानी स्वभावामुळे लोकप्रियता मिळविण्यात मदत होईल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी आणि नोकरी असणाऱ्यांना प्रगतीची दारे खुली होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस
मीन – दिवस शुभ राहील. व्यवसाय असलेले जातक विस्ताराची योजना आखू शकतील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्यामुळे कामाला एक नवीन ओळख मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळतील. भूतकाळ विसरून वर्तमानासाठी तडजोड करा. छोट्या छोट्या गोष्टींमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.
दिनविशेष
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
टीम अवांतर
साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध असमिया कादंबरीकार, सर्जनशील पत्रकार, प्रतिभासंपन्न कवी बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1924 रोजी आसाममधील सिबसागर जवळील एका चहाच्या बागेत, अगदी गरीब कुटुंबात झाला. शालेय वयातच कविता, कथालेखनाला त्यांनी सुरुवात केली होती. 1941 मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. जोरहाट हे त्याकाळी साहित्यिक कार्यक्रमांचे केंद्र होते. अनेक थोर साहित्यिक तिथे येत असल्याने बीरेंद्र यांना त्यांचा भरपूर सहवास मिळाला. शेतकऱ्यांची दयनीय स्थिती, देशाचा स्वातंत्र्यसंग्राम, दिग्बोई येथील तेलाच्या मजूरांचा संप या सर्व बाबी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या. तेच अनुभव त्यांच्या लेखनात व्यक्त झाले आहे. पुढे त्यांनी कलकत्त्याला येऊन वाङ्मयीन नियतकालिकांचे संपादन कार्य सुरू केले. वन्ही ही असमिया साहित्यपत्रिका, दैनिक असमिया, रामधेनू आणि नंतर सर्वाधिक खपाचे नवयुग या नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले. असमिया साहित्यातील “विनोद आणि उपहास” या विषयावर गुवाहाटी विश्वविद्यालयात त्यांनी आपली पी.एचडी. पदवी पूर्ण केली. बीरेंद्रकुमार हे एक कुशल कवी, प्रबंधलेखक, कथाकार आणि प्रतिभाशाली कादंबरीकार होते. 1946 मध्ये जीवनभर विपुल अमृतराशी हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. याशिवाय राजपथ रिंडीयाय, आई, सतसरी, शतघ्नी, मृत्युंजय, प्रतिपद, चिनाकिसून, कबार आरु फूल, बल्लारी, दायिनी, रंग मेगील, इयरूइंगम, शरत कोनवर, कलार हुमूनाह, चतुरंग यासारख्या कादंबऱ्या आणि कोलोंग अजिओ बल यासारख्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या. मृत्युंजय या कादंबरी लेखनासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना वयाच्या 35व्या वर्षी हा बहुमान तर, वयाच्या 56 व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच असमिया लेखक ठरले. 6 ऑगस्ट 1997 रोजी त्यांचे निधन झाले.


