दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 13 सप्टेंबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 22 भाद्रपद शके 1947; तिथि : षष्ठी 07:23, सप्तमी 29.04; नक्षत्र : कृत्तिका 10:10
- योग : हर्षण 10:31; करण : विष्टी 18:11
- सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:43
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
सप्तमी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस संमिश्र असेल. व्यवसायात किरकोळ समस्या येऊ शकतात, ज्यामुळे चिंता वाढतील. मात्र प्रयत्नांनी कामात यश मिळेल आणि आर्थिक लाभही होईल. कामाच्या निमित्ताने खूप धावपळ होईल, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी भांडण होण्याची शक्यता आहे.
वृषभ – दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल, त्यामुळे सर्व कामे यशस्वी होतील. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कुटुंबासह एखाद्या सुंदर पर्यटन स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. आरोग्यही चांगले राहील. तरीही खाण्यापिण्याची काळजी घ्या.
मिथुन – व्यवसायात यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल, परंतु अनावश्यक खर्चामुळे चिंता वाढेल. गोड बोलण्याने सहकाऱ्यांकडून नेमलेली कामे पूर्ण करू शकाल. गाडी चालवताना काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
कर्क – दिवस खूप चांगला जाईल. व्यवसायात नफा होईल. व्यवसाय विस्तारासाठी पद्धतशीरपणे योजना बनवू शकाल. मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल आणि कठोर परिश्रमामुळे तुम्हाला त्या कामात यश मिळेल. मात्र झालेल्या दगदगीमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटू शकते. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
सिंह – दिवस सामान्य राहील. व्यवसायात छोट्या-मोठ्या समस्या येऊ शकतात. कामाचा ताण जास्त असेल आणि संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवेल. राग नियंत्रित करा आणि शब्द नियंत्रणात ठेवा, अन्यथा तुम्ही एखाद्या वादात अडकू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. भरपूर पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
कन्या – दिवस शुभ राहील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या ठिकाणी मित्र आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामात यश मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. पदोन्नती देखील मिळू शकते. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्रांसोबत सहलीचे नियोजन केले जाईल.
तुळ – दिवस चांगला जाईल. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज खूप धावपळ करावी लागेल, मात्र या कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून फायदा होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक – दिवस संमिश्र असेल. व्यवसाय चांगला चालेल आणि सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व कामांमध्ये यशस्वी व्हाल. मात्र, वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज असू शकतात. कामानिमित्त प्रवासाला जावे लागेल. मात्र प्रवासात आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. मनोरंजनावर पैसे खर्च होतील. संततीचीही काळजी वाटेल.
धनु – कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. कामाचा ताण जास्त असेल आणि दिवस धावपळीत जाईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे समाजात आदर वाढेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या बोलण्याने कोणालाही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
मकर – दिवस खूप चांगला जाईल. व्यवसायात नफा आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने नफा होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल. मित्रांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल.
कुंभ – व्यवसाय चांगला चालेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सर्व कामे योजनेनुसार पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील आणि दिवस आनंदाने जाईल. सहकाऱ्यांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण होतील. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीचे स्थान बदलण्याची आणि पगार वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – एका लाडवाची गोष्ट!
मीन – व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कामाचा ताण खूप असेल, मात्र कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे कामात यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा करा, अन्यथा नाहक एखाद्या वादात अडकाल. जोडीदाराच्या आणि मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वादविवाद किंवा बौद्धिक चर्चेपासून दूर रहा. जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
ज्येष्ठ प्रतिभावंत गायिका डॉ. प्रभा अत्रे
टीम अवांतर
भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. विजय करंदीकर, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर अशा एकापेक्षा एक सरस अशा गुरुकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्याबरोबर फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. नंतर विधि महाविदयालयातून कायद्याची पदवी संपादन केली. गांधर्व महाविद्यालयाच्या ‘संगीत अलंकार’ आणि ‘संगीत प्रवीण’ या पदव्या डॉ. प्रभा अत्रे यांनी प्राप्त केल्या होत्या. तसेच ट्रिनीटी कॉलेज ऑफ लंडन येथून त्यांनी वेस्टर्न म्युझिक थिअरी या विषयाचाही अभ्यास पूर्ण केला. याशिवाय त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट पूर्ण केले. ख्याल, तराणा, चतुरंग, टप्पा, ठुमरी, दादरा, भजन, गीत, गझल अशा वेगवेगळ्या संगीत प्रकारांत त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. 1960 ते 1970 या दशकात त्यांनी आकाशवाणीत साहाय्यक संगीत निर्माता म्हणून काम केले. पुढे 1979 ते 1992 पर्यंत मुंबईच्या SNDT महिला विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख म्हणूनही काम केले. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं. तसेच ‘संगीत शारदा’, ‘विद्याहरण’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’ नाटकांमधून त्यांनी नावाजलेल्या नटांबरोबर देखील काम केले होते. संगीत या विषयावर त्यांची एकंदर 11 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी ‘डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन’ची तर शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची स्थापना केली होती. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल 1990 साली पद्मश्री तर 2002 साली पद्मभूषण तर 2022 मध्ये ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. आचार्य अत्रे संगीत पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार, पुण्याच्या ब्राह्मण जागृती सेवा संघाचा समाजभूषण पुरस्कार, ‘पु. ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, पुण्यभूषण पुरस्कार, तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अशा या ज्येष्ठ शास्त्रीय गायिकेचे 13 जानेवारी 2024 रोजी निधन झाले.