Friday, March 13, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 13 मार्च 2026

Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 13 मार्च 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 13 मार्च 2026; वार : शुक्रवार
  • भारतीय सौर : 22 फाल्गुन शके 1947; तिथि : दशमी अहोरात्र; नक्षत्र : पूर्वाषाढा 27:02;
  • योग : व्यतिपात 10:30; करण : वणिज 19:23;
  • सूर्य : कुंभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:50; सूर्यास्त : 18:47;
  • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : विश्वावसू;
  • शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्या संशोधक वा. वि. मिराशी

टीम अवांतर

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक आणि  भारतविद्यातज्ज्ञ वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म 13 मार्च 1893 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे (सध्या जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांनी मॅट्रिक, बी. ए. आणि एम. ए. या सगळ्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये प्रथमवर्ग पटकाविला. त्यांनी सुरुवातीस मुंबईतील शासकीय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी एलएल. बी. पदवी प्राप्त केली.

पुढे ते नागपूरच्या महाविद्यालयात नोकरी करू लागले. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळʼ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील संशोधन मराठीत लिहून ते विदर्भ संशोधन मंडळाच्या नियतकालिकातून प्रकाशित केले. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. त्यांनी वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला. खुद्द रामटेकला रामगिरीस्वामींचा उल्लेख असलेला वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हिचा शिलालेख एका वाकाटककालीन मंदिरात 1980 च्या दशकात सापडला, तो या सिद्धांताला पूरक ठरला.

हेही वाचा – घरी येताना आठवली लीला अन् पूजाची कहाणी!

शिलालेख, ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणीशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील तऱ्हाळा येथे सातवाहनकालीन नाणेनिधी सापडला; त्याचा सखोल अभ्यास करून प्राचीन साहित्यात उल्लेख नसलेल्या तीन नवीन सातवाहन राजांचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. यातून सातवाहन नाण्यांच्या अभ्यासकांसमोर त्यांनी एक नवा आदर्श ठेवला. भारतीय नाणकशास्त्रातील पुराव्याला वाङ्मयीन पुराव्याची जोडही त्यांनी दिली. संस्कृत साहित्यातील त्यांचे विशेष योगदान त्यांच्या कालिदास, भवभूती, हर्षचरितसार आणि लघुकौमुदी या पुस्तकांतून दिसून होते.

मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले; मात्र अगदी सुरुवातीला त्यांनी ग्रंथलेखन मराठीत केले. त्यांचे सुमारे 38 ग्रंथ आणि चारशेहून अधिक संशोधनात्मक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांच्या प्रमुख ग्रंथांची प्रादेशिक भाषांतून – विशेषत: हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत.

मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली. तसेच सागर, नागपूर, मुंबई व वाराणसी या विद्यापीठांची सन्माननीय डी. लिट्. पदवी; तत्कालीन ब्रिटिश सरकारची ‘महामहोपाध्यायʼ ही उपाधी; 1956 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते तर, 1961 मध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ताम्रपट; भारत सरकारतर्फे पद्मभूषण इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले. 3 एप्रिल 1985 रोजी त्यांचे नागपूर येथे निधन झाले.


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असेल. कौटुंबिक बाबींमुळे काही चिंता निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. बुद्धिमत्ता आणि कौशल्याने हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, मात्र अचानकच्या प्रवास खर्चामुळे आर्थिक स्थिती काहीशी डळमळेल. जोडीदाराकडून आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल.

वृषभ – आजचा दिवस आर्थिक बाबींमध्ये यश मिळवून देईल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल, नातेसंबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी होतील. सहकारी आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. आज आरोग्य ठीक राहील.

मिथुन – आजचा दिवस प्रगती आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. सर्जनशील कामाशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश मिळेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील, नवीन संपर्क होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. राग आणि बोलताना नियंत्रण ठेवा, नातेसंबंध अधिक गोड होतील. आरोग्य चांगले राहील.

कर्क – आज भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असेल. छोट्या छोट्या गोष्टींमुळे संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या. संयमामुळेच कामात यश मिळेल. आर्थिक लाभ अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकतो. कुटुंबाशी योग्य तो समन्वय ठेवा. यामुळे मानसिक शांती राखता येईल. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.

सिंह – आज आर्थिक बाबींमध्ये यश मिळू शकते, मात्र मन थोडे अस्वस्थ असेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल, नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखाद्या सदस्याशी मतभेद होऊ शकतात; त्यामुळे संयम ठेवा. तणाव टाळण्याचा प्रयत्न करा.

कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगती घेऊन येईल. तुम्ही आजपर्यंत केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधणे शक्य होईल. सरकारकडून एखाद्या योजनेसाठी सहकार्य मिळू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. आरोग्यही चांगले राहील.

तुळ – आजचा दिवस नातेसंबंध आणि काम यांच्यात संतुलन साधण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी निर्माण होतील. सर्जनशील कामाशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य सामान्य राहील. पाणी मात्र भरपूर प्या.

वृश्चिक – आजचा दिवस भाग्यशाली असेल. एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि संबंध निर्माण होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंब आणि शिक्षक वर्गाकडून पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील. उन्हात फार फिरू नका. अन्यथा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे.

धनु – आरोग्याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घाईघाईने कोणतेही निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी सतर्क राहा, अन्यथा एखाद्या लहानशा चुकीमुळे विश्वासार्हतेला धक्का लागू शकतो. आर्थिक बाबींमध्ये  हळूहळू प्रगती साधता येईल. गुंतवणुकीच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे, योग्य ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवा.

हेही वाचा – रत्नाच्या प्रिय आज्जोंनी घेतला महत्त्वाचा निर्णय…

मकर – आजचा दिवस शुभ परिणाम घेऊन येईल. कुटुंबाकडून आणि जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.  कामाच्या ठिकाणी यश आणि आदर मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञान शिकून घेऊन, व्यवसायात त्याचा वापर केल्यास फायदा होईल. आर्थिक स्थैर्य मजबूत होईल, कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. आरोग्य सामान्य राहील. हलका आहार घ्या.

कुंभ – आज सामाजिक कार्यात सहभाग वाढू शकतो. नातेसंबंधांमध्ये संतुलन राखा. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी संपर्क साधाल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल, मात्र नातेवाईकांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो. स्वतःच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मीन – आजचा दिवस शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळवून देईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. त्याचबरोबर रागाला आवर घालणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्यही चांगले राहील. शक्य असेल तर योगासने आणि प्राणायाम अवश्य करा. यामुळे मानसिक शांती मिळेल.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!