दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 17 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 22:54; नक्षत्र : भरणी 20:02
- योग : वज्र 21:32; करण : वणिज 12:37
- सूर्य : कन्या; चंद्र : मेष 25:23; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:22
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे आनंद मिळेल. व्यावसायिकांना लहान प्रवासाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन ऑफर किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. संततीकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल.
वृषभ – सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणाऱ्या संधी चालून येतील. आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षित व्हाल, ज्यामुळे मनःशांती मिळेल. जोडीदाराच्या वर्तनात आमूलाग्र बदल होणार आहे. लहान व्यवसायिकांना अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळू शकतो.
मिथुन – आजचा दिवस व्यग्र राहील. कामातील बदल आणि नवीन जबाबदाऱ्यांमुळे तुमचाच फायदा होईल. कौटुंबिक जीवनात काही तक्रारींना तोंड द्यावे लागू शकते. जोडीदार एखाद्या गोष्टीमुळे नाराज असू शकतो. बहिणीच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर, त्या दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांना इच्छित निकालांमुळे आनंद होईल.
कर्क – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. मालमत्तेशी संबंधित वाद तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. कुटुंबातील सदस्य पाठिंबा आणि प्रोत्साहन देतील. प्रवास करताना काळजी घ्या, विशेषत: मौल्यवान वस्तूंकडे लक्ष द्या. वाहनावर खर्च होण्याची शक्यता आहे.
सिंह – आज आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सुस्ती आणि एकाग्रतेचा अभाव यामुळे कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. व्यवसायात छुप्या शत्रूंपासून सावध रहा. नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल असेल. दिवसाच्या शेवटी एखाद्या प्रकरणात काही प्रमाणात दिलासा मिळेल.
हेही वाचा – रणांगण… काळाची बंधने नाकारणारी साहित्यकृती
कन्या – आजचा दिवस सामान्य राहील. खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्यात वेळ जाईल, ज्यामुळे काही महत्त्वाची कामे चुकू शकतात. कामात अपेक्षित निकाल न मिळाल्यास निराशा येऊ शकते. संध्याकाळ जोडीदारासोबत आगामी योजनांवर चर्चा करण्यात जाईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते.
तुळ – या राशीच्या जातकांना मानसिक शांती मिळेल. पालकांच्या आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे चिंता कमी होतील. मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवता येतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद राहील.
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या जातकांच्या सामाजिक प्रभावात आणि शक्तीत वाढ होईल. व्यवसायात नवीन बदल करण्यासाठी हा शुभ काळ आहे. शहाणपणा आणि विवेकबुद्धीने घेतलेल्या निर्णयांमुळे फायदा होईल. कोणाच्याही सल्ल्यानुसार कृती करण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करा. वाहन खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
धनु – आजचा दिवस धनु राशीला आर्थिक दिलासा देणारा असेल. कर्जाचे हप्ते थकले असेल तर ते फेडण्यात यशस्वी व्हाल. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आखाल. जोडीदाराकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे नाते मजबूत होईल. संततीचे एखाद्या महत्त्वाच्या कामातील यश आनंद देईल.
मकर – मकर राशीच्या जातकांना आज त्यांच्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करावा लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस एक चांगली संधी आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक तणाव कमी होतील. विवाहोत्सुक जातकांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
कुंभ – आजचा दिवस संमिश्र परिणामांचा असेल. आज वैयक्तिक कामे पूर्ण कराल. स्वतःसाठी काही खरेदी देखील कराल. कुटुंबातील काही सदस्य तुमच्या प्रगतीचा हेवा करतील, परंतु तुमचा आत्मविश्वास अबाधित राहील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी एकाग्रता राखण्याची आवश्यकता असेल.
हेही वाचा – पंचनामा : झाडाकडे पाहून धनगर दिनूची बोबडीच वळली…
मीन – आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. जुन्या प्रयत्नांचे फळ आज मिळेल, त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. पैसे गुंतवणे फायदेशीर ठरेल. वडिलांसोबत एखाद्या गोष्टीवर केलेली कौटुंबिक चर्चा उपयुक्त ठरेल. राजकारण आणि समाजसेवेत गुंतलेल्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल आणि त्यांची प्रतिष्ठा वाढेल.
दिनविशेष
हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार गोविंदराव टेंबे
टीम अवांतर
हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायकनट आणि साहित्यिक अशी ओळख असणाऱ्या गोविंदराव टेंबे यांचा जन्म 5 जून 1881 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे येथे झाला. गायनाच्या कार्यक्रमात जाऊन त्यांना हार्मोनियमची आवड निर्माण झाली. प्रत्यक्ष या वाद्यवादनाचे रीतसर शिक्षण त्यांनी घेतले नव्हते; मात्र स्वप्रयत्नाने त्यांनी या वादनात प्रावीण्य मिळवले. भास्करबुवा बखले यांच्या साथीला गोविंदराव असायचे. याशिवाय, अनेकवेळा त्यांनी हार्मोनियम वादनाचे एकपात्री प्रयोग केले. बर्कतुल्ला सितारिये यांचे ते नंतर गंडाबंद शागीर्द बनले. 1911 ते 1913 या कालावधीत ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त प्रमुख गायकनट म्हणून तर 1913 ते 1915 या काळात ‘गंधर्व नाटक मंडळी’त सुरुवातीचे भागीदार आणि नट म्हणून त्यांनी काम केले. 1917 मध्ये त्यांनी स्वत:च्या ‘शिवराज नाटक मंडळी’ या संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. यासाठी त्यांनी नवी नाटके लिहिली, पदे रचली आणि संगीतही दिले. ‘धैर्यधर’ (मानापमान), ‘कच’ (विद्याहरण), ‘चारूदत्त’ (मृच्छकटिक) या त्यांच्या काही प्रमुख गाजलेल्या भूमिका. त्यांनी मानपमान या नाटकास संगीतही दिले. नाटकास संगीत देण्याच्या निमित्ताने त्यांनी रागदारी संगीत, ठुमरी बाज इत्यादी पहिल्यांदाच संगीत रंगभूमीवर आणले. 1930च्या सुमारास त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आणि प्रभात, इंपीरियल, ईस्ट इंडिया, मिनर्व्हा, नटराज इत्यादी संस्थांच्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटात ते नायकाच्या प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचे संगीतदिग्दर्शनही त्यांनीच केले होते. माझा संगीत–व्यासंग, माझा जीवन विहार (आत्मचरित्र), खाँसाहेब अल्लादियाखाँ यांचे चरित्र, जीवनव्यासंग ही त्यांची महत्त्वाची ग्रंथनिर्मिती. संगीतावर रसाळ आणि आस्वाद्य लेखन करणाऱ्या लेखकांत त्यांचे स्थान अग्रगण्य मानले जाते. भारत नाट्य संमेलन, मराठी रंगभूमी शतसांवत्सरिक उत्सव, नागपूर, मराठी साहित्य परिषद, बडोदे येथे झालेल्या उत्सवांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषविली. कोल्हापूरातील गायन समाज देवल क्लब या संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते या संस्थेचे काही काळ संचालकही होते. 9 ऑक्टोबर 1955 साली गोविंदरावांचे दिल्ली येथे निधन झाले.


