दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 09 जुलै 2025, वार : बुधवार
भारतीय सौर : 18 आषाढ शके 1947, तिथि : चतुर्दशी 25:36, नक्षत्र : मूळ 29:49
योग : ब्रह्मा 22:08, करण : गरज 13:11
सूर्य : मिथुन, चंद्र : धनु, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे सहकाऱ्यांवर तुमचा प्रभाव राहील. प्रवासामुळे नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील. अनपेक्षित स्रोतांद्वारे मिळकत होईल.
वृषभ – क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.
मिथुन – करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. संवाद कौशल्य प्रभावी ठरेल. योग्य बचत करू शकाल. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, कुटुंबाचा पाठिंबा अनुकूल असेल.
कर्क – आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस असेल. एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवी आघाडी सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे. मात्र, अध्यात्मिकतेलाही तितकेच महत्त्व द्या.
सिंह – भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन सोडावे लागतील. प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. घरातील कार्यक्रमासाठी खर्च करावा लागू शकतो. अफवा आणि निरर्थक चर्चेपासून दूर राहा.
कन्या – पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका.
हेही वाचा – आकाशातील चित्रा आणि स्वाती नक्षत्र
तुळ – व्यावसायिक प्रगती होईल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीवर भर द्या. ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. तुमच्यातील मूल जागे होईल आणि एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल.
वृश्चिक – सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि बॉसही तुमच्या कामाने खूश होईल. व्यावसायिकांना व्यवसायात नफा होऊ शकतो. ध्यानधारणा आणि योगाचा फायदा होईल. व्यावसायिकांनी पैसे मागून परत न करणाऱ्या जवळच्या व्यक्तींपासून दूर राहा.
धनु – संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्या तसेच कामात उत्साह आणि चिकाटी दाखवलीत तर फायदा होईल. काही मित्रांच्या भेटीगाठी होतील, पण व्यसनांपासून दूर राहा. घऱच्यांशी सल्लामसलत करून गुंतवणुकीचे पर्याय निवडा, त्यातून आर्थिक लाभ संभवतो.
मकर – कामामध्ये मर्यादेपलीकडे ताण घेऊ नका. योग्यवेळी विश्रांती घ्या. व्यावसायिक उद्दीष्टे गाठण्यासाठी आंतरिक उर्जेचा योग्य वापर करता येईल. ज्येष्ठ नातेवाईकांना तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील आणि त्यादृष्टीने प्रयत्न कराल.
कुंभ – देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून मन:शांती लाभेल. हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी राशीतील शुभ ग्रहांमुळे आर्थिक चणचण जाणवणार नाही. मान्यवरांबरोबर केलेल्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील.
मीन – दिवसाची सुरुवात योग साधनेने करू शकता, त्यामुळे पूर्ण दिवस उत्साह राहील. खर्च वाढले तरी, वाढलेले उत्पन्न हा भार कमी करेल. यश मिळण्याची खात्री होईपर्यंत संकल्पना कोणालाही सांगू नका. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील.
हेही वाचा – नक्षत्र… मघा, फाल्गुनी, हस्त!
दिनविशेष
सिनेनिर्माते, दिग्दर्शक, अभिनेते गुरुदत्त
प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 रोजी झाला. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहीब, बीबी और गुलाम’ असे अजरामर चित्रपट देणारे गुरुदत्त यांचे खरे नाव, वसंतकुमार शिवशंकर पदुकोण. एक अस्वस्थ कलावंत-दिग्दर्शक अशीच त्यांची ओळख राहिली. गुरूदत्त यांनी कलकत्त्यात नोकरीचा राजीनामा देऊन थेट मुंबईची वाट धरली. पुण्याच्या प्रभात फिल्म स्टुडिओत त्यांच्या काकांनी त्यांना नोकरीस लावले. तिथे त्यांना अभिनेते रहमान आणि देव आनंद हे भेटले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. प्रभात फिल्म कंपनीत चित्रपट निर्मितीचे धडे घेतलेल्या गुरुदत्त यांनी प्रभातच्या ‘लाखाराणी’ चित्रपटात भूमिका आणि प्रथमच दिग्दर्शन सहाय्य केले. 1953मध्ये ‘बाज’ या चित्रपटातून नायक म्हणून चित्रसृष्टीत पदार्पण केलेल्या गुरुदत्त यांनी स्वतःच्या ‘गुरुदत्त फिल्मस्’मार्फत तयार केलेल्या ‘आरपार’ या चित्रपटातून निर्माता, दिग्दर्शक, नायक म्हणून सुरुवात केली. पुढे ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘बहुराणी’ असे एकाहून एक सरस चित्रपट काढले. ‘कागज के फूल’ हा त्यांचा चित्रपट पहिला भारतीय सिनेमास्कोप चित्रपट होता. कला केवळ सौंदर्याकरिता नसून, ती जगण्याचाच एक भाग असते, ही जाणीव गुरुदत्त यांनी सातत्याने दिली. टाइम या मासिकानुसार 1923पासूनच्या सर्वोत्कृष्ट 100 चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे. अशा या मनस्वी दिग्दर्शक, अभिनेत्याचा 10 ऑक्टोबर 1964 रोजी मृत्यू झाला.