दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 जानेवारी 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 19 पौष शके 1947; तिथि : सप्तमी अहोरात्र; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 13:39
- योग : शोभन 16:54; करण : विष्टी 19:38
- सूर्य : धनु; चंद्र : कन्या; सूर्योदय : 07:13; सूर्यास्त : 18:15
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात चांगला नफा मिळेल, भौतिक सुखसोयी वाढतील. इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य देऊन, त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर फायदा होईल. गैरसमाजातून उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. कायदेशीर खटले जिंकू शकता. विद्यार्थ्यांचा दिवस आनंदी असेल, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील.
वृषभ – भागीदारीत एखादा प्रकल्प सुरू कराल, ज्यामुळे भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण कराल, ज्यामुळे इतर प्रकल्पांमध्ये पुढे जाता येईल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी भेट देऊ शकता. महत्त्वाच्या कामात काही बदल होतील, त्याचे सकारात्मक परिणाम आनंद देतील. घर किंवा कार्यालय यांचे नूतनीकरण करण्याचा विचार होऊ शकतो.
मिथुन – नोकरीच्या शोधात असणाऱ्या जातकांचा शोध आज संपेल. चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. इतर जातकांनी ऑफिसच्या कामात इतरांचा सल्ला घेणे टाळा. जवळच्या मित्राची मदत घेणे योग्य ठरेल, कारण यामुळे गोष्टी सोप्या होतील. कौटुंबिक संबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेर खाणे टाळा.
कर्क – व्यावसायिक व्यवहारात घाई करू नका. काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल; एखाद्याला उधार दिलेल्या पैशांची परतफेड आज होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी असेल आणि मुले तुम्हाला आनंदी राहण्याची आणखी कारणे देतील. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करू शकतात किंवा मुलाखतीचे बोलावणे येईल.
सिंह – सामाजिक कार्यात व्यग्र रहाल. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची भेट होऊ शकते. घराच्या सजावटीसाठी आवश्यक घरगुती उपकरणे देखील खरेदी करू शकता. महिला आज एखादा प्रकल्प सुरू करू शकतात, ज्याला त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा, कारण यामुळे वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
कन्या – आजचा दिवस अत्यंत अद्भुत असेल. स्वतःला सर्जनशील कामांमध्ये गुंतवून घ्याल. कठोर परिश्रम आणि चांगले वर्तन तुम्हाला योग्य फायदा प्राप्त करून देईल. तुमच्या योजना गुप्त ठेवा, अन्यथा विरोधक फायदा घेऊ शकतात. कौटुंबिक आनंद आणि शांती मिळेल आणि जोडीदाराशी नाते अधिक सुसंवादी होईल.
तुळ – व्यवसायात लक्षणीय लाभ होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी उत्तम यश मिळेल. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, त्यासाठी उत्तम दिवस आहे. घराची साफसफाई करताना हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळू शकते.
वृश्चिक – कठोर परिश्रम आणि समर्पणाने एखादे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे पालकांना अभिमान वाटेल. जवळच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. गरजूंना मदत कराल आणि त्यांचे आशीर्वाद मिळतील. ऑफिसमधील काम सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी कोणतीही घाई टाळा. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
हेही वाचा – …अशांना 21 तोफांची सलामी !
धनु – आज तुमच्या बदलीची बातमी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर, आजच ते करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. हॉटेल व्यवस्थापनात काम करणारे एखादा नवीन पदार्थ तयार करतील, ज्याचे खूप कौतुक होईल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता.
मकर – दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्यासाठी आतुर असाल. व्यवसायातील बदलांवर चर्चा होऊ शकते. ऑफिसमध्ये सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळेल. आज नशीब तुमच्या बाजूने असेल, सर्व योजना यशस्वी होतील. आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची आवश्यकता आहे; बदलत्या हवामानात स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या.
कुंभ – नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी थोडे अधिक काम करावे लागेल, परंतु त्यासाठी सहकाऱ्यांकडून मदत देखील मिळू शकते. परदेशी कंपनीकडून नोकरीची ऑफर देखील मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज सर्जनशील कामांमध्ये अधिक रस असेल. तुमच्या कामाने प्रत्येकजण प्रभावित होईल. एखाद्या संस्थेत सामील होण्याची संधी मिळेल.
मीन – तुमचे लक्ष नवीन गोष्टींकडे आकर्षित होईल आणि काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा मिळेल. कोणतीही योजना आखताना जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. बाजारात अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे काम पुढे जाण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ असेल. शिक्षकांकडून प्रशंसा होईल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.
दिनविशेष
भारतीय वंशाचे अमेरिकी जैवरसायनशास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा
टीम अवांतर
भारतीय वंशाचे अमेरिकी जैवरसायनशास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा यांचा जन्म 9 जानेवारी 1922 रोजी मुलतान-पंजाबमधील रायपूर (सध्या पाकिस्तान) येथील एका गरीब कुटुंबात झाला. भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त करून ते संशोधनासाठी इंग्लंडला गेले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर खुराणा पुन्हा भारतात परतले, मात्र येथे काम करण्यासाठी योग्य संधी न मिळाल्याने ते पुन्हा इंग्लंडला परतले.
हेही वाचा – Education : शिकण्याची नेमकी गरज काय?
खुराणा यांनी 1960 मध्ये विस्कॉन्सिन, मॅडिसन येथील इन्स्टिट्यूट फॉर एन्झाइम रिसर्च केंद्राच्या सह-संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. नंतर ते जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. या ठिकाणी त्यांनी आरएनए आणि प्रथिनांच्या संश्लेषण यंत्रणेचा अभ्यास केला. याच कामाबद्दल त्यांना 1968 साली नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. रासायनिक पद्धतीने ऑलिगोन्यूक्लिओटाईड तयार करणारे खुराणा हे पहिले शास्त्रज्ञ होते. खुराणा यांनी पहिले कृत्रिम जनुक (gene) तयार केले. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील त्यांचे माजी सहकारी त्यांना रासायनिक जीवशास्त्राचे जनक, असे गौरवितात.
नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त खुराना यांना इतर अनेक पुरस्कार मिळाले. विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठ आणि भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खुराणा प्रोग्राम राबवला जातो. याचा उद्देश भारत आणि अमेरिका या देशांमध्ये वैज्ञानिक, उद्योजक आणि सामाजिक उद्योजक यांची एक अखंड साखळी तयार व्हावी, हा आहे. काँकॉर्ड मॅसाच्युसेट्स येथे 9 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांचे निधन झाले.


