Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 08 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 08 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 08 डिसेंबर 2025; वार : सोमवार
  • भारतीय सौर : 17 अग्रहायण शके 1947; तिथि : चतुर्थी 16:03; नक्षत्र : पुष्य 26:52
  • योग : ब्रह्मा 17:00; करण : कौलव 27:09
  • सूर्य : वृश्चिक; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:58; सूर्यास्त : 18:00;
  • पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. कामातील अडथळ्यांवर मात करता येईल. योग्य सोयी आणि समन्वय यामुळे कामात प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करण्यास मदत होईल. काही कामांसाठी प्रवास करणे आवश्यक ठरेल. प्रवासामुळे दीर्घकालीन फायदे मिळतील.

वृषभ – व्यवहारात संदिग्धता चांगली नाही. दुपारपूर्वीचा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न कराल. तुमची इच्छित कामे यशस्वी होतील. इतरांच्या  बाबींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन – अनेक दिवसांची स्वप्ने सत्यात उतरतील. परस्परसंवादातून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल. कामात योग्य सोयीसुविधा मिळवल्याने प्रगती होईल. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल.

कर्क – घरातील वादविवाद संपतील. एखादी चांगली बातमी कुटुंबात आनंद आणेल. समस्या आपोआप नाहीशा होत आहेत, असे वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रूची निर्माण होईल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. जोडीदाराचा सल्ला आज फायदेशीर ठरेल. व्यवसायात, कार्यालयात आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.

सिंह – कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळेल. कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा, यश मिळेल. प्रियजनांचाही पाठिंबा राहील. प्रतिष्ठा वाढवणारे काही सामाजिक कार्य साध्य होईल. आरोग्य उत्तम राहील. शैक्षणिक काम सहज पूर्ण होईल.

हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!

कन्या – आज सहकाऱ्यांकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही. तथापि, एखाद्याने केलेल्या स्तुतीने फुशारून जाणे हिताचे ठरणार नाही. वर्तन आणि बोलणे नियंत्रित ठेवा. कौटुंबिक समस्या वाढतील. अभ्यासात लक्ष द्या, अन्यथा इतरांपेक्षा मागे पडाल. मात्र प्रतिकूल परिस्थितीत देखील फारसे नुकसान होणार नाही.

तुळ – व्यवसाय आणि व्यापाराची परिस्थिती चांगली राहील. आळस सोडून दिल्यास यश मिळण्यास जास्त वेळ लागणार नाही. आर्थिक लाभ चांगला होईल. आर्थिक व्यवहारात संदिग्धता चांगली नाही. शैक्षणिक कामांमध्ये रस वाढेल. आरोग्य चांगले राहील. जोडीदार आणि मुलांकडून पाठिंबा मिळेल.

वृश्चिक – वेळ अनुकूल असेल. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न कराल. इतरांच्या मदतीने तुमचे काम पूर्ण होईल. सौदेबाजी करून काम करण्याचा प्रयत्न टाळणे हिताचे ठरेल. विवेकबुद्धीने वागा. धार्मिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. आज जुनी मैत्रीण किंवा मित्र भेटेल.

धनु – सरकारी कामातून लाभ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळेल. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य स्थापित होईल. भूतकाळातील चुकांबद्दल आज पश्चात्ताप होईल. घरी अनपेक्षितपणे पाहुणे येतील. मेहनतीचे चीज झाल्याचे विद्यार्थ्यांना अनुभवास येईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कौटुंबिक सहकार्य आणि समन्वयामुळे काम सोपे होईल.

मकर – आज जोडीदार किंवा मित्रांसोबत एकत्र काम करणे फायदेशीर ठरेल. काम सुरळीत होईल आणि पुढे जाण्याचा मार्गही सुकर होईल. इच्छित कामे पूर्ण होतील. कार्य क्षेत्रात विरोधक आज तुमच्याविरुद्ध कट रचू शकतो. तथापि, हुशारीने वागून संघर्ष आणि वाद टाळा. अधिक उदारपणे वागत असाल तर, जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – सिया आणि रामची भेट घडविण्याचा शिवचा निर्धार!

कुंभ – कामातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग सापडेल. तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. नवीन उपक्रमांच्या संधी वाढतील, ज्यामुळे अनेक दिवसांपासूनच्या इच्छा पूर्ण होतील. नातेवाईकांशी असणारे काही गैरसमज दूर होतील. सुसंवाद साधून तुमचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मीन – स्वतःच्या कृतींचा पुनर्विचार करा. वैचारिक संघर्ष आणि असंतोष कायम राहील. तुमच्या निर्णयांचा कामावर मोठा परिणाम होईल. एखादी आर्थिक समस्या येऊ शकते, ती मार्गी लावण्यासाठी पिता किंवा कुणी ज्येष्ठ व्यक्तीकडून सल्ला घ्या. उत्पन्न आणि खर्च समान राहतील. अविचाराने केलेली कृती मोठा आर्थिक फटका देणारी असेल.


दिनविशेष

इस्रायलच्या “आर्यन लेडी” गोल्डा मेअर

टीम अवांतर

इस्रायलच्या शिल्पकार, मुत्सद्दी आणि  चौथ्या पंतप्रधान गोल्डा मेअर यांचा जन्म 3 मे 1898 रोजी आताच्या युक्रेनमधील कीव्ह येथे झाला. त्यांचे मूळ नाव गोल्डी मॅबोव्ह्यिच होते. पुढे त्यांचे कुटुंब मिलवॉकी (विस्कॉन्सिन) येथे स्थलांतरित झाले. महाविद्यालयात शिकत असतानाच, मॉरिस मेअरसोन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतरही त्या मिलवॉकी येथील ज्यू मजूर पक्षाचे काम करीत असत. 1921 मध्ये त्या आपल्या नवऱ्यासह पॅलेस्टाईन येथे स्थायिक झाल्या. तेथील हिस्टाड्रट या प्रमुख कामगार संघटनेतील स्त्री-कामगार आघाडीच्या नेत्या म्हणून तसेच अमेरिकेतील ‘पायॉनिअर वुमन’ या संघटनेचे काम सांभाळू लागल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यूंच्या पुनर्वसनासाठी केवळ अमेरिकेतून त्यांनी 50 मिलियनपर्यंतच्या देणग्या जमा केल्या. पुढे 1948 साली इस्रायलची स्थापना झाली आणि पहिले पंतप्रधान झालेल्या बेन गुरियन यांच्या मंत्रिमंडळात गोल्डा मिनिस्टर ऑफ लेबर बनल्या. पुढे 1956 साली त्या परराष्ट्रमंत्री बनल्या. इतर देशांसोबत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, औद्योगिक, तांत्रिक, संरक्षण क्षेत्रात सहकार्याने काम करणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. 1966 मध्ये राजकारणातून निवृत्त व्हायचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 1969 साली तत्कालीन पंतप्रधानांचे अकाली निधन झाले आणि गोल्डा यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्या जनतेच्या लाडक्या पंतप्रधान बनल्या. देशात राजकीय स्थिरता येत असतानाच 1973 साली योम किप्पुर वॉर झाले. इजिप्त आणि सीरियाने इस्रायलवर अनपेक्षितपणे हल्ला केला. या युद्धात 2 हजार 700 सैनिक मृत्युमुखी पडले. इस्रायलसारख्या छोट्या देशाला हा फार मोठा धक्का होता. सैनिकांच्या मृत्यूला गोल्डा यांना जबाबदार धरले गेले, एका क्षणात संपूर्ण देश त्यांच्या विरुद्ध झाला. त्यामुळे 1974 साली त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. मात्र जनतेने आपल्याला नाकारले याचे शल्य गोल्डा यांच्या मनाला कायमचे लागले. अखेर 8 डिसेंबर 1978 साली इस्रायलच्या या “आर्यन लेडी”चे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!