दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 डिसेंबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 15 अग्रहायण शके 1947; तिथि : द्वितीया 21:26; नक्षत्र : मृगशीर्ष, आर्द्रा 08:48, 30:12
- योग : शुभ 23:45; करण : तैतिल 11:08
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:57; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कोणाशीही वाद होणार नाही, याची काळजी घ्या. एखाद्या फायदेशीर कामात सक्रिय असाल. आज काही प्रमाणात एकाग्रता निर्माण होईल. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आराम आणि विश्रांतीवर परिणाम होईल. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. आज समाजातील काही प्रतिष्ठित लोकांकडून पाठिंबा मिळेल. भावा-बहिणींमधील प्रेम वाढेल.
वृषभ – कामे सुरळीतपणे होतील, पण आजचा दिवस नकारात्मक परिणामांचा असेल, हे लक्षात ठेवा. ज्यांना हितचिंतक समजता तेच तुमच्या नकळत नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकला. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने आणि समन्वयाने काही बाबतीत तुमचे काम सोपे होईल.
मिथुन – कठोर परिश्रमाने ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास फायदा होईल. गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आधी घेतलेल्या कठोर परिश्रमाचे आज फायदे मिळतील. उत्पन्न आणि खर्च यांच्यात ताळमेळ राहील. आर्थिक लाभासाठी केलेल्या कामाचे तात्काळ फळ मिळेल. मात्र अलिप्त राहण्याची वृत्ती सोडून द्या.
कर्क – आरोग्य उत्तम राहील. व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. काम सुलभ सोपे करून प्रगती साधणे शक्य होईल. कामातील अडथळे दूर होतील. प्रवासामुळे दीर्घकालीन फायदे मिळतील. आराम आणि काम यात समन्वय राखल्याने प्रगती होईल. जुन्या मित्राच्या भेटीगाठी होतील आणि भूतकाळात रमाल.
सिंह – फायदेशीर कामासाठी जोरदार प्रयत्न कराल आणि आज नफा मिळू शकतो. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ होईल. एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. तब्येतीची काळजी घ्या, पथ्ये सांभाळा.
हेही वाचा – शीख युवकाने पगडी उतरवली… अज्ञात व्यक्ती शांतच होती!
कन्या – व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. सकाळी एखाद्या महत्त्वपूर्ण कामगिरीनंतरही दिवसभर निरुउत्साही असाल. मात्र समाधानी राहिलात तरच यश मिळेल. कौटुंबिक समस्या वाढतील. काही प्रतिकूल परिस्थितीमुळे संपूर्ण दिवस त्रासात जाईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
तुळ – सर्व महत्त्वाची कामे पूर्ण कराल. एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्याप्रति आदर वाढेल. तुमची प्रतिष्ठा वाढवणारे एखादे सामाजिक कार्य पूर्ण होईल. आजचा दिवस मौजमजेचा आणि आनंदाचा असेल. व्यवसायात प्रगती देखील शक्य होईल. चांगला परतावा मिळेल, अशी गुंतवणूक कराल.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी तसेच व्यावसायिक स्थिती साधारण राहील. विरोधकांची भीती, मुलांबद्दल चिंता लागून राहील. अनावश्यक खर्चात वाढ होईल. अशावेळी प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरतील. आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. आरोग्याच्या छोट्या कुरबुरी राहतील.
धनु – व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. मेहनतीचे आज फायदे होतील. कामातील अडथळे दूर होतील. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. तुम्हाला कुटुंब आणि सहकारी सतत पाठिंबा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात उदासीनता राहील… शुभ कामांमुळे फायदेशीर परिणाम मिळतील.
मकर – आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. धार्मिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. व्यावसायिक परिस्थिती थोडीशी खराब आणि आव्हानात्मक असेल. आरोग्याच्या लहान कुरबुरी राहतील. शुभ कार्यांमध्ये सहभागी व्हाल. काही चांगल्या बातम्या देखील येतील. समाधानी राहिल्याने यश मिळेल.
कुंभ – आज मातुल बाजूने मोठा फायदा होईल. उत्पन्न आणि खर्च यात सुसंगती असेल. आपल्या कामांचा पुनर्विचार करा. विचारपूर्वक केलेला संघर्ष यश मिळवून देईल. मात्र मनात असंतोष कायम राहील. एखाद्या माहितीच्या आधारे मोठे निर्णय घेता येईल. बाहेरील अन्न, फास्ट फूड खाणे टाळा.
मीन – प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. उशिरा हाती आलेली कामे वेळेत पूर्ण करू शकाल. कामाच्या ताणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. बैठका आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी झाल्यास तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. आईकडून आज विशेष लाभ मिळतील.
हेही वाचा – सर्दीयों में हूं मसीहा, तो बारिशों में गालिब-ए-शेर हूं मैं…
दिनविशेष
मराठी विनोदकार आणि नाटककार वसंत सबनीस
टीम अवांतर
मराठीतील विनोदकार आणि नाटककार वसंत सबनीस यांचा जन्म 6 डिसेंबर 1923 रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते रघुनाथ दामोदर सबनीस. शासकीय नोकरीत असतानाच ते साहित्य निर्मितीकडे वळले. त्यांच्या कविता ‘अभिरूची’ सारख्या दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे विनोदी लेखक म्हणून ते प्रसिद्धीला आले. त्यांनी लिहिलेली अनेक मराठी नाटके रंगभूमीवर गाजली. ‘पानदान’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह 1958 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांपैकी चिल्लरखुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात हे लेखसंग्रह वाचकप्रिय ठरले. आत्याबाईला आल्या मिशा, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्यासी हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाले. याशिवाय निळावंती, म्हैस येता घरा, सौजन्याची ऐशी तैशी, घरोघरी हीच बोंब, मामला चोरीच, कार्टी श्रीदेवी, गेला माधव कुणीकडे ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली काही नाटके. विच्छा माझी पुरी करा या त्यांच्या लोकनाट्याने यशाचा नवा विक्रम केला. हे लोकनाट्य सगळ्यात आधी वीणा मासिकातून ‘छपरी पलंगाचा वग’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. तमाशा या लोककलाप्रकाराला आधुनिक रूप देण्याचा पहिला महत्त्वाचा प्रयत्न म्हणून हा वग उल्लेखनीय ठरतो. दादा कोंडके, राम नगरकर या अभिनेत्यांची सबनीसांच्या उत्कृष्ट, चुणचुणीत संवादांना समर्थ साथ मिळाली. मार्मिक राजकीय भाष्य आणि हजरजबाबी संवाद हे या लोकनाट्याचं वैशिष्टय ठरलं. लोकनाट्याला नवी परिमाणे देणाऱ्या विच्छा… चे ‘सैंया भये कोतवाल’ हे हिंदी रूपांतरही लोकप्रिय झाले. या लोकनाट्याच्या बतावणीत सुरुवातीला स्वतः सबनीस काम करीत असत. याशिवाय अदपाव सुतार, पावशेर न्हावी आणि सवाशेर शिंपी हे त्यांचे विच्छा … च्या आधीचे लोकनाट्य. प्रेक्षकांनी क्षमा करावी आणि चिलखतराज जगन्नाथ हे त्यांच्या एकांकिकांचे संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या दोन विनोदी नाट्यकृतींना 1963 आणि 1972 चे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. पुढे काही वर्षे ते किशोर मासिकाचे संपादक होते. 15 ऑक्टोबर 2002 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.


