दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 13 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वादशी 28:07; नक्षत्र : उत्तराषाढा 23:43
- योग : सौभाग्य 15:20; करण : बव 16:19
- सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51
- पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वामन जयंती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस आनंदाचा असेल. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, त्यामुळे मनोबल वाढेल. नवीन नोकरीच्या संधीही फायदेशीर ठरतील. काही व्यवसायांमधील जातकांना चांगला नफा मिळू शकेल, परंतु काही शत्रू काम बिघडवण्याचा प्रयत्नही करतील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ – दिवस फारसा चांगला जाणार नाही. नुकसान होण्याची शक्यता आहे. काही बाबतीत संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. बोलण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात, त्यामुळे सांभाळून निर्णय घ्या. आर्थिक परिस्थितीत मात्र काही ठळक बदल दिसून येतील. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये खूप विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
मिथुन – आज नवीन संधी उपलब्ध होतील. कामामुळे दिवसभर व्यग्र रहाल. नफ्याच्या संधी वाढतील, पण अनावश्यक खर्च टाळावे लागतील. नोकरदार जातकांसाठी प्रगतीचे चांगले संकेत आहेत. कोणीतरी आर्थिक मदत मागण्यासाठी येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.
कर्क – दिवस चांगला असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीचा फायदा मिळू शकतो. आज भागीदारी करणे टाळा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांना नवीन करार मिळू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सिंह – दिवस अनुकूल असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळतील. आर्थिक परिस्थितीत लक्षणीय बदल होईल. परंतु व्यवहाराच्या बाबतीत डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील. ज्यांना अनेक दिवसांपासून परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होईल. संध्याकाळी जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवू शकता.
कन्या – दिवस खूप शुभ ठरेल. नफ्याच्या संधींमध्ये वाढ होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप अनुकूल असेल. विवाहोत्सुकांसाठी चांगले स्थळ चालून येईल. आरोग्य चांगले राहील. मात्र खाण्यापिण्यातला निष्काळजीपणा टाळा. ज्यांच्यावर काही कर्ज आहे , आज त्यातून मुक्त होऊ शकतात.
हेही वाचा – नात्यांची दिवाळी
तुळ – आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. काही नवीन प्रकल्प मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जोडीदाराचा भक्कम पाठिंबा मिळेल. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी सुरू राहतील. सामाजिक संपर्क वाढेल, त्यांचा भविष्यात फायदा होईल.
वृश्चिक – आज एखाद्याशी जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. शत्रूपक्ष वर्चस्व गाजवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत सगळ्याच बाबतीत खूप विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. अर्थात, धैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाबतीतही विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धीचा अनुभव येईल.
धनु – वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. अनेक दिवसांपासून जे काम पूर्ण होत नव्हते, ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याच्या संधी वाढतील. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर, आता त्यातून सुटका होईल. नात्यांमधील प्रेम अबाधित राहील.
मकर – नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.
कुंभ – नवीन संधी मिळतील. नोकरदार जातकांना पदोन्नती मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल. मात्र खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च टाळावे लागतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. संततीच्या मागण्यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
मीन – आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. नवीन संधी मिळण्याची प्रक्रिया सुरू राहील. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकते. नोकरदार जातकांना काही अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागेल.
हेही वाचा – मुकी होत चाललेली घरे
दिनविशेष
हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती
टीम अवांतर
आधुनिक हिंदी साहित्यिक आणि धर्मयुग या हिंदी साप्ताहिकाचे 27 वर्षे संपादकपद सांभाळणारे धर्मवीर भारती यांचा जन्म 25 डिसेंबर 1926 रोजी अलाहाबाद येथे झाला. 1945 मध्ये बी. ए. परीक्षेत हिंदी विषयात सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘चिंतामणी घोष पदक’ मिळवले. 1947 मध्ये ते प्रथम श्रेणीत एम्. ए. झाले. पुढे धीरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिद्ध साहित्य’ या विषयावर संशोधन करून त्यांनी पी. एचडी. मिळवली. अभ्युदय पत्रिकेत अर्धवेळ नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतले. प्रयाग विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1960 पर्यंत तेथे कार्य केल्यावर धर्मयुग या प्रसिद्ध साप्ताहिकाचे संपादक म्हणून ते मुंबईस आले आणि तेव्हापासून पुढे 27 वर्षे धर्मयुगमध्येच प्रमुख संपादक या नात्याने कार्यरत होते. धर्मवीर भारती बहुमुखी प्रतिभेचे लेखक होते. मात्र मुख्यतः ते कवी म्हणून प्रख्यात होते. 1955 साली त्यांनी लिहिलेले नाटक ‘अंधायुग’ हिंदी साहित्यात एक मैलाचा दगड मानले जाते. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या अंतिम युद्धाची समाप्ती आणि त्यानंतरची जीवनात आलेली मूल्यभ्रष्टता तसेच दारुण दुःख ही या पद्यनाटकाची पार्श्वभूमी आहे. पण यातून भारतींनी स्वातंत्र्यानंतर भारतात निर्माण झालेल्या दारुण आणि शोकजनक परिस्थितीचा वेध घेतला आहे. तर कनुप्रियामध्ये राधेच्या उत्कट प्रणयभावनेतील वेदना व्यक्त करण्यात त्यांच्यातील कवीला कमालीचे यश लाभले. याखेरीज, मुर्दों का गांव, चांद और टूटे हुए लोग, बंद गली की आखिरी मकान हे तीन कथासंग्रह, ऐन पंचविशीत लिहिलेली गुनाहों का देवता किंवा त्यानंतरची सूरज का सातवां घोडा या कादंबऱ्यांमुळे त्यांच्यातील प्रयोगशील लेखकाची नवी ओळख वाचकांनी झाली. ठेले पर हिमालय, कहनी अनकहनी, पश्यंती हे त्यांचे निबंध संग्रहही वाचकप्रिय झाले. धर्मवीर भारतींनी हिंदी साहित्यातील नव्या वैचारिक तसेच साहित्यिक चळवळीत सक्रिय भाग घेतला आणि नव्या साहित्याच्या प्रतिष्ठापनेसाठी विचारांची बैठक प्राप्त करून दिली. अशा या साक्षेपी साहित्यिक, संपादकाचे 4 सप्टेंबर 1997 रोजी निधन झाले.