Monday, August 4, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 04 ऑगस्ट 2025

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 04 ऑगस्ट 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 04 ऑगस्ट 2025; वार : सोमवार

भारतीय सौर : 13 श्रावण शके 1947; तिथि : दशमी 11:41; नक्षत्र : अनुराधा 09:11

योग : ब्रह्मा 07:04; करण : वणिज 24:30

सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12

पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

श्रावणी सोमवार
शिवामूठ : तीळ


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णयक्षमतेला खीळ बसते. म्हणून रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. बचतीचा पैसा आज कामी येऊ शकतो. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

वृषभ – दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी सर्वकाही अनुकूल असेल. अवघडेलपण, असुविधा मानसिक त्रास देऊ शकतात, मानसिक तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका.

मिथुन – प्रवास आणि लोकांमध्ये मिसळणे हेच आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. परंतु कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा. तसेच, तणावाकडे दुर्लक्ष करू नका. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ संभवतो.

कर्क – अवतीभवती काय घडतेय याकडे लक्ष द्या, आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या खचल्यासारखे वाटत असेल तर, थोडा आराम करा. सात्विक अन्नसेवन केल्यास ऊर्जा मिळेल.

सिंह – कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. मात्र, आपला स्वार्थासाठी वापर केला जात नाही ना, याकडे नोकरदारांनी लक्ष द्यावे. घरगुती काळजी बेचैन करेल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल.

कन्या – अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे, हे ठरविताना अडचणी येतील. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा.

हेही वाचा – Skin Care : कोरडी त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने

तुळ – नेहमीपेक्षा आज उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल, अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. आज तुम्हाला पैशांची निकड भासू शकते. कौटुंबिक आघाडीवर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक – व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी सारे लक्ष प्रयत्नांवर केंद्रित करावे. आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित अस्वस्थता जाणवेल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा.

धनु – तुमच्या विचारांवर ज्यांचा प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची मित्रामुळे ओळख होऊ शकते. आज धन प्राप्तीचा योग आहे. होऊ शकते व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे.

मकर – करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. पैसे कमाविण्याच्या नव्या संधी मिळतील.

कुंभ – आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. मनात काही दुविधा निर्माण झाल्याने एकाग्रता मिळणार नाही. गुंतवणुकीचा पुरेसा परतावा मिळण्याची शक्यता कमी आहे. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा.

मीन – घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तुंची बेफिकीरपणे हाताळणी करणे अडचणीत आणू शकते. व्याख्यान आणि परिसंवादाला उपस्थित राहिल्यास प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील.

हेही वाचा – Skin Care : मिश्र, संवेदनशील त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने


दिनविशेष

हरहुन्नरी किशोर कुमार

टीम अवांतर

हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलावंत किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. महान अभिनेते आणि गायक कुंदनलाल सहगल यांच्या गाण्यांचा किशोर कुमार यांच्यावर प्रभाव होता. त्यांना त्यांच्यासारखेच गायक व्हायचे होते. सहगल यांना भेटण्यासाठी किशोर कुमार वयाच्या 18व्या वर्षी मुंबईत आले. त्यावेळी त्यांचे मोठे बंधू अशोक कुमार आधीच मुंबईत अभिनेता म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले होते आणि दुसरे बंधू अनुप कुमार देखील चित्रपटांमध्ये काम करत होते. अशोक कुमार यांना किशोर यांनीही नायक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, असे वाटत होते. पण किशोर कुमार यांना पार्श्वगायक बनायचे होते. तथापि, त्यांनी कधीही कोणाकडूनही संगीताचे मूलभूत धडे घेतले नाहीत. बॉलिवूडमध्ये अशोक कुमार यांच्या ओळखीमुळे त्यांना अभिनेता म्हणून काम मिळत होते. अभिनेता म्हणून त्यांनी 1946 मध्ये आलेल्या ‘शिकारी’ या चित्रपटातून पदार्पण केले. किशोर कुमार यांना 1948मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिद्दी’ या चित्रपटासाठी गाण्याची पहिली संधी मिळाली. हा चित्रपट हिट झाला पण किशोर यांना या चित्रपटातून फारशी ओळख मिळू शकली नाही. 1953मध्ये प्रदर्शित झालेला ‘लडकी’ हा चित्रपट त्यांच्या अभिनेता म्हणून कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट होता. 1964मध्ये ‘दूर गगन की छाओं में’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. किशोर कुमार यांनी एकूण 81 चित्रपटांमध्ये काम केले आणि 18 चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. 1969मध्ये निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंता यांच्या ‘आराधना’ या चित्रपटाद्वारे किशोर कुमार पार्श्वगायनात आपला अमीट ठसा उमटवला. त्यांनी जवळजवळ चार दशकांच्या कारकिर्दीत विविध भारतीय भाषांमध्ये 2,500हून अधिक गाणी गायली. बॉलीवूडच्या अनेक आघाडीच्या कलाकारांचे ते आवाज बनले होते. किशोर कुमार यांना त्यांच्या गाण्यांसाठी आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!