दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 मार्च 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 12 फाल्गुन शके 1947; तिथि : पौर्णिमा 17:07; नक्षत्र : मघा 07:31
- योग : सुकर्मा 10:24; करण : बालव 28:54;
- सूर्य : कुंभ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:58; सूर्यास्त : 18:43;
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
धूलिवंदन
खग्रास चंद्रग्रहण
करीदिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा
टीम अवांतर
भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी नुसीरवानजी टाटा यांचा जन्म 3 मार्च 1839 रोजी गुजरातच्या नवसारी या छोटया गावामध्ये झाला. भारताचे पहिले उद्योगपती म्हणून देखील ते ओळखले जातात. जमशेदजी टाटा यांनी मुंबईत येऊन वयाच्या 14 व्या वर्षी एका छोट्या व्यवसायातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांची बुद्धिमत्ता आणि हुशारी पाहून कॉलेजने त्यांना भरलेली पूर्ण फी परत केली होती. 1858 मध्ये पदवीधर होऊन वडिलांच्या व्यवसायात ते सह्भागी झाले. त्यावेळी इंग्रज सरकारने 1857 चा उठाव मोडून काढला होता. टाटांनी अशा परिस्थितीतही व्यापारातच आपली कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला.
1859 मध्ये ते हॉंगकाँगला गेले. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी पुढच्या चार वर्षात तिथे टाटा ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यालय सुरु केले. टाटा कंपनीचा आशियात विस्तार करणासाठीचे ते पहिले पाऊल ठरले. पुढे 1863 पर्यंत जपान आणि चीनमध्येही कंपनीच्या शाखा सुरू झाल्या. तिथून त्यांनी युरोपात प्रवास करायचे ठरवले.
आशियामध्येही टाटा ग्रुपला मोठे नुकसान सहन करावे लागले. नंतर तिशीत येईपर्यंत जमशेदजींनी वडिलांसोबतच काम केले. 1868 मध्ये त्यांनी एका कंपनीची सुरुवात केली. कॉटन मिल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लंडनमधील गिरण्या पाहून त्यांनी फक्त कापसाचा व्यापार न करता उत्पादनक्षेत्रात शिरावे, असा विचार केला होता.
त्यानंतर त्यांनी त्यांनी 1874 मध्ये नागपूरला मिल स्थापन केली. त्यात त्यांना मोठा नफा मिळाला. व्हिक्टोरिया राणीच्या नावावरून त्यांनी आपल्या मिलचे नाव महारानी मिल ठेवले. पुढे नागपुरची ही मिल त्यांनी मोठ्या किमतीला विकली. जमशेदजींनी ‘अलेक्झांड्रा’ आणि 1877 मध्ये नागपूरला ‘एम्प्रेस मिल’ सुरू केली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच मुंबईत ‘स्वदेशी मिल’, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली आणि उत्तमरीत्या चालवली.
हेही वाचा – माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!
पोलाद उद्योगात उतरण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे 1882 मध्ये त्यांनी कारखाना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मयूरगंज संस्थानात लोखंड आणि कोळशाचे साठे मिळाले, म्हणून त्यांनी तिथेच कारखाना काढण्याचं ठरवलं. त्या काळी त्यांनी 2 कोटी 32 लाख रुपयांचं भांडवल ‘शेअर्स’ विकून उभं केलं. पण दुर्दैवानं ते लोखंडाची निर्मिती पाहण्यासाठी हयात राहिले नाहीत. 3 डिसेंबर 1903 मध्ये त्यांनी मुंबईत समुद्रकिनारी ताज हॉटेलची स्थापना केली. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारं ते एकमेव हॉटेल होतं. 19 मे 1904 ला त्यांचे निधन झाले. मात्र तोपर्यंत ते भारतीय उद्योगजगताचे पितामह म्हणून जगभर विख्यात झाले होते.
आजचे राशीभविष्य
मेष – बाहेर जाण्याची योजना आखू शकता. नोकरीच्या ठिकाणी कामाचे आऊटपूट नेहमीपेक्षा कमी असेल. तुमच्या योजना पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो. ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. रागावर आणि खर्चावर ताबा ठेवा. आरोग्य चांगले राहील, उन्हात फिरताना योग्य ती काळजी घ्या.
वृषभ – दुपारनंतर नोकरी करणाऱ्यांची प्रगती होऊन नफा मिळू शकतो. व्यावसायिकांनी त्यांच्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जोडीदाराशी वाद घालणे टाळा, प्रश्न सामंजस्याने सोडवा. मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी परिस्थिती आणि व्यक्ती यांच्याशी अंतर राखा.
मिथुन – आज व्यवसायाची भरभराट होईल. चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमच्या कौशल्यांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पावले उचला. पुरेसा व्यायाम आणि संतुलित आहार यांची सांगड घालून योग्य अशा दिनचर्येचे पालन करा. तब्येत व्यवस्थित राहील.
कर्क – वरिष्ठांबाबात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुम्ही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू शकता. त्यामुळे ऑफिसच्या राजकारणापासून चार हात लांबच रहा. कनिष्ठांकडून काही सूचना आल्या तरी त्याकडे दुर्लक्ष न करता, त्याबाबत गांभार्याने विचार करा. एखादी सूचना भविष्यात फायदेशीर ठरू शकते.
सिंह – आरोग्याची विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. एकंदर आजचा दिवस समाधानकारक असेल. कठोर परिश्रमामुळे तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल.
कन्या – दिवसाची सुरुवात चांगली होईल पण शेवट अनपेक्षित होईल. नोकरी-व्यवसायात आज अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. तुमची आर्थिक परिस्थिती अपेक्षेप्रमाणे स्थिर राहील, मात्र काही अनपेक्षित खर्चामुळे ताण येऊ शकतो. पालकांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असेल.
हेही वाचा – अक्षता… अतिशय डोळस निर्णय!
तुळ – वरिष्ठांकडून आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असेल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. यातून भविष्यात चांगला नफा मिळेल. आज बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. पाणी आणि इतर द्रवपदार्थ यांचे पुरेसे सेवन करा.
वृश्चिक – भागीदारीत सुरू असणाऱ्या व्यवसायात मतभेद निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भागिदारांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. अनपेक्षित घटनांमुळे कामाचा वेग मंदावू शकतो. सामंजस्याने प्रश्न सोडवा . आज पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक ती सर्व काळजी घ्या.
धनु – व्यायाम आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करा. मानसिक तणावापासून दूर रहा. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. आळसात वेळ न घालवता हातात असलेली सगळी कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.
मकर – ध्येय साध्य करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. व्यवसायात तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. काही नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर परिस्थितीवर मात करता येईल. संततीच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कुंभ – मानसिक तणाव टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुमचे करिअर आणि आर्थिक जीवन सामान्य राहील. बोलणे आणि खाणे याबाबतीत जिभेवर ताबा ठेवा, सात्विकतेवर भर द्या.
मीन – अज तुमच्या कारकिर्दीत काही चढ-उतार येतील. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा, स्वतःची काळजी घ्या. आज खर्च वाढू शकतात. त्यामुळे आर्थिक परिस्थितीबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. संततीच्या आरोग्याबाबत सावध रहा. उन्हाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.


