दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 जानेवारी 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 13 पौष शके 1947; तिथि : पौर्णिमा 15:33; नक्षत्र : आर्द्रा 17:28
- योग : ब्रह्मा, ऐंद्र 09:04, 29:15; करण : बालव 25:58
- सूर्य : धनु; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 07:11; सूर्यास्त : 18:12
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
शाकंभरी पौर्णिमा
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. कामाचा खूप ताण असेल. आज प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया दिली जाणार नाही, याची काळजी घ्या. एक अयोग्य शब्द संपूर्ण दिवस खराब करू शकतो. तुम्हाला कामावर पुढाकार घ्यावा असे वाटेल आणि ते योग्य आहे, परंतु प्रथम परिस्थिती पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
वृषभ – आज तुमची सर्वात मोठी ताकद संयम आहे. जे घाईघाईने वागतील त्यांच्याकडून चुका होतील आणि तुम्ही मात्र त्यातून शिकाल. पैशाबद्दल जास्त विचार कराल. एखादा जुना खर्च किंवा जबाबदारी यांची आठवण होईल. कुटुंब किंवा जवळच्या मित्राची साथ मनाला शांती देईल. आज कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करू नका; सगळ्या गोष्टी वेळेवर आपोआपच सुटतील.
मिथुन – एकाच वेळी अनेक गोष्टींबद्दल विचार कराल आणि अनेक गोष्टी कराव्यात, असे तुम्हाला वाटेल. पण प्रत्यक्षात तसे होणार नाही. त्यातच गोष्टी अपूर्ण ठेवण्याची तुमची सवय नुकसान करणार नाही, याची काळजी घ्या. आज संभाषण प्रभावी असेल, मात्र शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. एखाद्यासोबत किरकोळ गैरसमज निर्माण होऊ शकतात, जे वेळेत दूर करा.
कर्क – आज मन थोडे उदास असेल. एखादी जुनी समस्या अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. ती समस्या धीराने सोडविण्याचे प्रयत्न कराल. त्यात काही प्रमाणात यशही येईल. कुटुंब किंवा प्रियजनांचा सहवास आज खूप दिलासा देणारा असेल. विश्वासू व्यक्तीशी तुमच्या भावना शेअर करणे चांगले.
सिंह – आज तुमचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येईल. लोक तुमच्याकडे मॉडेल म्हणून पाहतील आणि तुमचे ऐकतील. फक्त हा आत्मविश्वास अहंकारात बदलू नये, याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी प्रशंसा किंवा आदर मिळू शकतो. तुमच्यावर काही जबाबदारी येऊ शकते, जी उत्तम प्रकारे पार पाडाल. मोकळेपणाने संवाद साधल्याने नात्यांमधील अंतर कमी होईल.
कन्या – आज जबाबदाऱ्या कदाचित भारी वाटतील, पण सत्य हे आहे की, तुम्ही त्या पूर्ण करण्यास पूर्णपणे सक्षम आहात. काम करताना धीर धरा. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ लगेच दिसणार नाही, तरीही मार्ग योग्य आहे. स्वतःला कमी लेखू नका. तब्येतीची काळजी घ्या.
तुळ – आज सर्व कामे व्यवस्थित पूर्ण व्हावीत, असे वाटेल. मात्र, परिपूर्णतेच्या मागे लागणे तुम्हाला थकवू शकते. कामाच्या ठिकाणी बारकाईने लक्ष देणे फायदेशीर ठरेल, त्याचवेळी किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करायला शिका. तुमच्या आरोग्याकडे आणि दिनचर्येकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि अनियमित खाण्याच्या सवयी टाळा.
वृश्चिक – आज तुमचे विचार थोडे वेगळे असतील. तुम्हाला अशा गोष्टी दिसतील ज्या इतरांना पटकन दिसत नाहीत. तुम्हाला मित्रांकडून किंवा तुमच्या टीमकडून पाठिंबा मिळेल. फक्त हट्टीपणा टाळा. तुमचे विचार व्यक्त करा, पण इतरांचेही ऐका. आजचे नवीन विचार भविष्यात अधिक महत्त्वाचे ठरू शकतात.
धनु – आज मन संतुलन साधण्याचा प्रयत्न करेल. योग्य बाजूची निवड करणे कठीण वाटू शकते, परंतु निर्णय पुढे ढकलणे ही चांगली कल्पना नाही. कोणीतरी एखाद्या विषयावर तुमचे मत विचारेल, मात्र बोलण्यापूर्वी विचार करा. कला, संगीत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या इतर गोष्टींमध्ये वेळ घालवल्याने तुमचे मन हलके आणि आनंदी राहील.
हेही वाचा – आराध्याने सांगितली, आपल्या आईवडिलांची कहाणी
मकर – आज तुमच्या आत बरेच काही चालू असेल, पण तुम्हाला सर्व काही दाखवायचे नाही, हे ठीक आहे. कामावर लक्ष केंद्रित केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. संध्याकाळी थोडा वेळ एकांतात घालवणे किंवा आत्मनिरीक्षण करणे तुम्हाला बरे वाटण्यास मदत करेल.
कुंभ – आज तुमचे मन सकारात्मक असेल. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची, काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्याची किंवा कुठेतरी बाहेर जाण्याची इच्छा होईल. जर ते आत्ता शक्य नसेल तर किमान तशी एखादी योजना बनवा. आशा आणि सकारात्मक विचार तुम्हाला साथ देतील, परंतु जास्त आश्वासने देणे टाळा. तुम्ही जे देऊ शकता तेच बोला.
मीन – एखाद्या गोष्टीमुळे आज भावना खोलवर दुखावल्या जातील. एखाद्याचे शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतात. गरजू व्यक्तीला तुम्हाला मदत करावीशी वाटेल, पण लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांचा भार उचलण्याची गरज नाही. आज स्वतःसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. संगीत, ध्यान किंवा शांत बसणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या बळकट करेल.
दिनविशेष
भारतीय अवकाश शास्त्रज्ञ सतीश धवन
टीम अवांतर
भारतीय अवकाश अभियंता आणि अवकाश शास्त्रज्ञ सतीश धवन यांचा जन्म 25 सप्टेंबर 1920 रोजी श्रीनगर येथे झाला. धवन यांनी श्रीनगर येथूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे पंजाब विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (मॅथेमॅटिक्स अँड फिजिक्स), एम.ए. (इंग्लिश लिटरेचर) आणि बी.ई. (मेकॅनिकल इंजिनियरिंग) अशा पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी बंगळुरु येथे स्थित भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान उत्पादक कंपनीत वर्षभर म्हणून काम केले.
पुढे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथून त्यांनी वैमानिक अभियांत्रिकी या शाखेत एम.एस. करून त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथून वैमानिक अभियंता ही पदवी मिळवली. याशिवाय त्यांनी वैमानिक अभियांत्रिकी आणि गणित हे विषय घेऊन आपली पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर ते भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरु येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झालेत. 1962 मध्ये त्यांची संचालकपदी नियुक्ती झाली. साधारणपणे पुढील दोन दशके जे याच संस्थेत कार्यरत होते. याच काळात ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज़ेशन; इस्रो) येथे संचालक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनीच भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांमध्ये रूपांतरित केले.
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
डॉ. विक्रम साराभाई यांच्यानंतर धवन यांची तेथेच अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी ‘इंडियन स्पेस प्रोग्रॅम’ची धुरा अध्यक्ष म्हणून सांभाळली. धवन यांनी इस्रोमध्ये भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आणि देशातील पहिले प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन SLV-3 विकसित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोने नंतरच्या काळात भारतीय राष्ट्रीय उपग्रह दूरसंचार प्रणाली INSAT, भारतीय दूरसंचार उपग्रह IRS आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV विकसित केले. 1981 मध्ये भारताचा पहिला एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट APPLE प्रक्षेपित झाल्यामुळे दुर्गम भागात दूरदर्शन आणि रेडिओ प्रसारणाचा पाया घातला गेला.
धवन यांना भारत सरकारद्वार पद्मभूषण आणि पद्मविभूषण प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारत सरकारने त्यांना इंदिरा गांधी पुरस्काराने देखील सन्मानित केले. 3 जानेवारी 2002 त्यांचे निधन झाले. त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील शार या अंतराळ केंद्राचे ‘सतीश धवन स्पेस सेंटर शार’ असे नामकरण करण्यात आले.


