Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 03 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 03 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 03 डिसेंबर 2025; वार : बुधवार
  • भारतीय सौर : 12 अग्रहायण शके 1947; तिथि : त्रयोदशी 12:26; नक्षत्र : भरणी 18:00
  • योग : परिघ 16:57; करण : गरज 22:33
  • सूर्य : वृश्चिक; चंद्र : मेष 23:14; सूर्योदय : 06:55; सूर्यास्त : 17:59
  • पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – जोडीदार आणि संततीकडून उत्तम सहकार्य मिळेल. कामात सुलभता आणल्याने प्रगती होईल. अंगभूत मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कामकाजाच्या ठिकाणी यश मिळेल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. प्रवासामुळे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील.

वृषभ – परदेशातील व्यापाराशी संबंधितांना आज मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरदारांना आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करता येईल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. प्रवास फलदायी होईल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.

मिथुन – पूर्वनियोजित कार्यक्रम सहजपणे पूर्ण होतील. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. वाटाघाटीद्वारे यश मिळविण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल. गैरमार्गाने केलेल्या कामाचा भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हळूहळू, नफ्याचा मार्ग मोकळा होईल; योग्य वेळेची वाट पाहा.

कर्क – उत्पन्नाच्या चांगल्या संधी असतील. सामंजस्याने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल. तब्येतीची कुरबूर लक्षात घेऊन लांबचे प्रवास टाळा. कामाचा आवाका लक्षात घेऊन वरिष्ठ प्रभावित होतील. त्यामुळ आत्मविश्वासात वाढ होईल. एखादा जुना मित्र भेटेल. भावंडांमधील प्रेम वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. दैनंदिन सुखसोयी वाढतील.

सिंह – अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी, कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबाचा पाठिंबा आणि समन्वय यामुळे नियोजन सोपे होईल. इतरांच्या मदतीने भविष्यातील योजनांवर काम करणे सुरू करा. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला वाद आजच मिटवा, उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. समाजातल्या वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील.

हेही वाचा – कोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप

कन्या – सरकारी कार्यक्रमांमधून, वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभाचे संकेत. भूतकाळातील चुकांबद्दल पश्चात्ताप होईल. जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत भागीदारीत काम केल्यास फायदा होईल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. शुभ कार्यक्रमांसाठी खर्च होईल. पाहुण्यांचे आगमन होईल.

तुळ – नफ्यात अनपेक्षित वाढ निश्चित आहे, याचसाठी नकारात्मक दृष्टिकोन टाळा. आशा आणि उत्साहामुळे काम करण्याची इच्छा वाढेल. समाजात आदर वाढेल. उत्पन्न आणि खर्चात सातत्य राहील. व्यवसाय आणि व्यापाराकडे लक्ष दिल्याने यश मिळेल. महत्त्वाच्या लोकांना भेटाल. मुलांच्या यशाचा अभिमान वाटेल.

वृश्चिक – प्रत्येकाचें सांगणे ऐका, कदाचित त्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल, इतरांच्या कामात अडकण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिक समृद्धी देखील शक्य होईल.

धनु – आज प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाचा ताण तुमच्या आराम आणि विश्रांतीवर परिणाम करेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना  समाजातील मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे फलदायी परिणाम होतील.

मकर – व्यावसायिक प्रवास तूर्तास पुढे ढकला. उत्पन्न आणि खर्च संतुलित राहील. ज्यांना हितचिंतक मानता तेच लोक पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. सावधगिरी बाळगा. मर्यादित कामे पूर्ण होतील. पैसे उधार घेणारे वेळेवर परतफेड करणार नाहीत. एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कुंभ – व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची घाई असेल. सरकारी कामातून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा फायदा होईल. व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकलू नका. शैक्षणिक कामे सहज पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

हेही वाचा – सचिनच्या जिद्दीची कहाणी!

मीन – व्यवसायाला बळ देण्याची गरज आहे. ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तथापि, सध्या फक्त आश्वासनांवर समाधान मानणे चांगले अशी परिस्थिती आहे. उत्पन्न आणि खर्च समान राहील. आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात.


दिनविशेष

श्रेष्ठ भारतीय चित्रकार नंदलाल बोस

टीम अवांतर

श्रेष्ठ भारतीय चित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदलाल बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1883 रोजी बिहारमधील खरगपूर या खेड्यात झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी 1905 मध्ये कलकत्त्याच्या सरकारी कला विद्यालयातून चित्रकलेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर जोडासाँको येथील अवनींद्रनाथ टागोरांच्या घरी त्यांनी नोकरी केली. बऱ्याच रेखाचित्रांच्या त्यांनी प्रतिकृती तयार केल्या. टागोर परिवारातील मुलांचे कलाशिक्षक म्हणून ते काम पाहू लागले. 1907 मध्ये भारतीय प्राच्यकलासंस्थेने आयोजित केलेल प्रदर्शनात नंदलाल बोसांच्या शिवसती या चित्रास पारितोषिक मिळाले. 1911 मध्ये काही महिने अजिंठ्याला राहून तेथील चित्रांच्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्या. रवींद्रनाथ टागोरांनी 1918 साली ‘विश्वभारती’ची स्थापना केली. 1919 मध्ये तिच्या ‘कला भवन’ शाखेचे प्रमुख म्हणून नंदलाल यांची नेमणूक झाली. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी शांतिनिकेतनमध्ये अध्यापन केले आणि अनेक चित्रकार तयार केले. नंदलाल बोस हे अवनींद्रनाथ टागोरांच्या शिष्यपरंपरेतील होते. रवींद्रनाथांचाही त्यांच्यावर प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कलात्मक निर्मितीत स्थूलमानाने तीन प्रवाह दिसून येतात – प्राचीन भारतीय परंपरा, राष्ट्रीय विचारसरणी आणि आधुनिकांची तांत्रिक प्रयोगशीलता. त्यांच्या मनाला असलेली प्राचीन भारतीय संस्कृतीची आणि परंपरेची ओढ प्रामुख्याने रामायण, महाभारत यांवर आधारलेली चित्रे-अग्नी, नल-दमयंती, कुरुक्षेत्र, अर्जुन, स्वर्णकुंभ इत्यादी चित्रांतून दिसते.  भारतीय लोकजीवनातील अत्यंत साध्यासुध्या घटकांना त्यांनी चित्ररूप दिले. लोकसंगीतकार, कारागीर, शेतकरी अशी व्यक्तिचित्रे त्यातून आढळतात. नटीर पूजा, शांतिनिकेतनमधील चिनी भवनाच्या भिंतीवरील भित्तिलेपचित्रे ही त्यांच्या शैलीच्या प्रगल्भतेची साक्ष देतात. त्यांची चित्रे कलकत्ता येथील ‘इंडियन म्युझियम’, ‘अशुतोष म्युझियम ऑफ इंडियन आर्ट’, ‘शांतिनिकेतन’, म्हैसूरच्या जगमोहन प्रासादातील चित्रविथी अशा ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत. 16 एप्रिल 1966 रोजी शांतिनिकेतन येथेच त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!