दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 02 डिसेंबर 2025; वार : मंगळवार
भारतीय सौर : 11 अग्रहायण शके 1947; तिथि : द्वादशी 15:57; नक्षत्र : अश्विनी 20:51
योग : वरियान 21:08; करण : कौलव 26:14
सूर्य : वृश्चिक; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:54; सूर्यास्त : 17:59
पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
भौमप्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका. तुमच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षणांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिकबाबतीत महत्त्वाचे निर्णय चांगलं फळ देणारे ठरतील. अर्थार्जनासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. विवाहोत्सुक जातकांचा विवाह ठरण्यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे.
वृषभ – कामाच्या ठिकाणी आनंदी आणि निर्मितीक्षम जीवन जगा. सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि वरिष्ठही तुमच्या कामाने आनंदी होतील. व्यावसायिक व्यवसायात नफा कमाऊ शकतो. आज आर्थिक समृद्धी हा एक महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा असेल. आरोग्य चांगले राहील. तथापि, मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.
मिथुन – व्यावसायिक यश शक्य आहे. आर्थिक समृद्धीमुळे गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अतिशय योग्य आहे. आज तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. आपल्या करिअरसंबंधीचे निर्णय स्वत:च घ्या, त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. हितचिंतक आणि विरोधकांना ओळखण्यात गल्लत करू नका.
कर्क – चांगले परिणाम दिसावे यासाठी कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारा. आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जोडीदाराच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. जवळच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा.
सिंह – आर्थिक व्यवस्थापन सुज्ञपणे करा. आज तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास जाणवणार नाही. तुम्हाला समस्यांशी चार हात करायला आवडते, कारण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतात. नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जाणून घ्या.
हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!
कन्या – कठीण परिस्थितींचा विचार करा. लपवून ठेवलेली माहिती शोधण्याची तुमची क्षमता या वेळी विशेषतः फायदेशीर ठरेल. संशोधन, नियोजन किंवा इतरांसोबत काम करण्याची आवश्यकता असलेल्या नोकरीतील पदांचा विचार करा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका.
तुळ – काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे अस्वस्थ व्हाल. परंतु त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांवर काम करा. तुमच्या प्रेम जीवनात अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. ते कसे सोडवायचे याला प्राधान्य द्या.
वृश्चिक – दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसा जसा दिवस पुढे सरकेल तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. समृद्धी तुम्हाला योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करू शकते. तुमचे आरोग्यही चांगले राहील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. कौटुंबिक समस्या सोडवण्यावर भर द्यावा.
धनु – व्यावसायिकदृष्ट्या तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी कामातील आव्हानांवर मात करा. यशस्वी व्यावसायिक जीवनाचा आनंद घ्या. आर्थिक परिस्थितीही चांगली राहील. कामाच्या ठिकाणी दिवस उत्तम जावा, यासाठी आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. जोडीदाराची चांगली काळजी घेण्याची गरज आहे.
मकर – आर्थिकदृष्ट्या, गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ शकतात. कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस बदल करा. कार्यालयातील राजकारणाबाबत अतिशय हुशारीने पावले उचला. जीवनातील वास्तवावर लक्ष केंद्रित करा. निरोगी जीवनशैली स्वीकारून त्यानुसार काम करत असल्याची खात्री करावी.
कुंभ – कामाच्या ताणतणावामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. पथ्यपाणी सांभाळा. करिअर पुढे नेण्यासाठी कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या संधींचा फायदा घ्या. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवून त्यांना आनंदी ठेवा. घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील.
हेही वाचा – जयू आत्या… स्मृतीबंध!
मीन – आपल्यासाठी काय चांगले आहे, याचा विचार करा आणि ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. व्यावसायिक जीवनातील ताण कमी करण्यासाठी अत्यावश्यक कामांमध्येच सहभागी व्हा. तुमच्या भावनिक संतुलनावर परिणाम करणाऱ्या भूतकाळातील समस्या सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
दिनविशेष
लघुनिबंधकार अनंत काणेकर
टीम अवांतर
आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक आणि वृत्तपत्रकार म्हणून ओळख असणाऱ्या अनंत काणेकर यांचा जन्म 2 डिसेंबर 1905 रोजी मुंबईत झाला. बी.ए., एल्एल्.बी. झाल्यावर हायकोर्टाची वकिलीची सनदही त्यांनी मिळविली. मुंबईतील नाट्यमन्वंतर या प्रयोगशील नाटयसंस्थेचे ते एक संस्थापक होते. 1935 ते 1939 या कालावधीत त्यांनी मुंबईतील चित्रा या साप्ताहिकाचे संपादकपद भूषविले. 1941 ते 1946 पर्यंत मुंबईच्या खालसा महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात ते विभागप्रमुख होते. ‘चांदरात व इतर कविता’ हा त्यांचा एकमेव काव्यसंग्रह. तत्कालीन काव्यसंकेतांना टाळून लिहिलेल्या त्यांच्या कवितांत प्रादेशिक लोकगीतांचे, विडंबन काव्याचे, पुरोगामी सामाजिक आशयाचे आणि प्रेमभावनेच्या प्रसन्न आविष्काराचे वैशिष्टयपूर्ण दर्शन घडत असे. नाटयमन्वंतर या संस्थेमुळे काहीशा संक्रमणकालातील प्रयोगशील मराठी रंगभूमीशी त्यांचा संबंध आला. निशिकांतची नवरी, घरकुल, फांस ही त्यांची रुपांतरित नाटके प्रयोगशील रंगभूमीला उपकारक ठरली. ‘धूर व इतर एकांकिका’ यात त्यांच्या एकांकिका आहेत. पिकली पाने हा काणेकरांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. 1925 पासून मराठीत अवतरलेला हा नवीन गद्य साहित्यप्रकार सुस्थिर आणि संपन्न करण्याचे कार्य फडके – खांडेकरांबरोबरच काणेकरांनीही केले. शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघड्या खिडक्या, विजेची वेल हे त्यांचे अन्य लघुनिबंधसंग्रह. याशिवाय धुक्यातून लालताऱ्याकडे!, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर तांबडी माती, रक्ताची फुले, खडक कोरतात आकाश, सोनेरी उन्हात पाचूची बेटे आणि गुलाबी प्रकाशत बोलक्या लेखण्या ही त्यांची प्रवासवर्णनपर पुस्तके प्रकाशित झाली. जागत्या छाया, मोरपिसे, दिव्यावरती अंधेर, काळी मेहुणी व इतर गोष्टी हे त्यांचे कथासंग्रह वाचकप्रिय ठरले. 1957 साली औरंगाबादच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1965 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. 1971 मध्ये सोव्हिएट देश नेहरु पारितोषिकाचे ते मानकरी ठरले. 4 मे 1980 रोजी त्यांचे निधन झाले.


