दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 01 डिसेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 10 अग्रहायण शके 1947; तिथि : एकादशी 19:01; नक्षत्र : रेवती 23:18
- योग : व्यतिपात 24:58; करण : वणिज 08:20, बव 29:32
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मीन 23:18; सूर्योदय : 06:53; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
मोक्षदा एकादशी / मौनी एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दुपारपूर्वीचा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यापारात नफा बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धार्मिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. इतरांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. सौदेबाजीद्वारे काम करण्याचा प्रयत्न करणे अनुचित ठरेल.
वृषभ – हा काळ नकारात्मक परिणाम देणारा आहे. हितचिंतक मानले जाणारे लोक तुमच्या पाठीमागे तुमचेच नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि समन्वय यामुळे परिस्थिती गंभीर बनणार नाही. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य स्थापित होईल. विवेकाने वागा. काळानुरूप पावले उचला.
हेही वाचा – सियाबद्दलची ‘ती’ माहिती कळताच, शिव आणखी भडकला
मिथुन – दुपारनंतर फायदेशीर कामातील अडथळे दूर होतील. कामे सुरळीत होतील आणि भविष्यासाठी मार्गही मोकळा होईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे व्यावसायिक अडचणीत येऊ शकतात. नोकरदारांना कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.
कर्क – कामाच्या प्रगतीत अडथळा जाणवेल. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. अडकलेले पैसे परत मिळविण्यात परिचिताकडून अनपेक्षित मदत मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांशी मतभेद होऊ शकतात.
सिंह – कामातील अडथळे दूर होतील, प्रगतीचा मार्ग उपलब्ध होईल. कामात सहजता आल्याने प्रगती होईल. समाजात तुमच्याप्रति आदर वाढेल. नवीन जबाबदाऱ्या अंगावर येण्याची शक्यता आहे. कलात्मक क्षेत्रातील जातकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल.
कन्या – चांगल्या कामासाठी मार्ग मोकळा होईल. व्यवसायातील काही अडथळे मानसिक अशांतता निर्माण करतील. प्रवासामुळे दीर्घकालीन परिणाम मिळतील. सोयी आणि समन्वयामुळे कामात प्रगती होईल. यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करण्यास मदत होईल. शुभ कार्यक्रमांचे आयोजन कराल.
तुळ – स्वतःच्या कामाकडे लक्ष केंद्रीत करा. आरोग्य सुधारण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हींची गरज लागेल. व्यवहारात अस्पष्टता चांगली नाही. व्यावसायिक कामात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे लाभ मिळेल.
वृश्चिक – दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. आळस सोडून द्या. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य निर्माण होईल. मित्रांसोबत सहकार्य केल्याने नफा मिळेल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील.
धनु – कामात समाधानकारक यश मिळेल. प्रियजनांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. व्यवसाय आणि व्यापाराची स्थिती अनुकूल असेल. नोकरदारांना पदोन्नती शक्यता आहे. स्वार्थी मित्रांपासून चार हात लांब राहणे चांगले. प्रवास फायदेशीर ठरेल. शैक्षणिक कामगिरी अपेक्षेनुसार होईल, यात शंका नाही.
मकर – आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक वाद टाळा. व्यवसाय आणि नोकरीतील परिस्थिती चांगली असेल. कामातील अडथळे दूर होतील, प्रगतीचा मार्ग सापडेल. समर्पणाने केलेले काम तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवेल. संततीकडून आणि जोडीदाराच्या बाजूने तुम्हाला फायदा होईल.
कुंभ – व्यवसायात प्रगती होईल. सहकाऱ्यांकडून तुम्हाला हवा तसा पाठिंबा मिळेल. एखाद्या प्रकल्पाला किंवा कल्पनेला भावंडांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसेल. आरोग्य मध्यम राहील. स्वतःच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या. प्रवासाची शक्यता आहे.
मीन – जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. प्रयत्न सुरू ठेवा, यश मिळण्यास जास्त वेळ लागणार नाही. आर्थिक लाभ चांगला होईल. शैक्षणिक कामांमध्ये रस वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमाबद्दल चर्चा होईल. आरोग्य चांगले राहील.
हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध
दिनविशेष
भारतीय सीमा सुरक्षा दल
टीम अवांतर
सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवून सीमेचे शांतता काळात संरक्षण करण्यासाठी नेमलेले सैन्यदल म्हणजे सीमा सुरक्षा दल किंवा बॉर्डर सिक्युअरिटी फोर्स. 1 डिसेंबर 1965 रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली. भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी के. एफ्. रुस्तमजी यांची पहिले दलप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत या दलाचे कार्य चालते. काही अशांत आणि संवेदनशील सीमांवर सैन्यदलांच्या तुकड्यांची उपस्थिती अपरिहार्य असली, तरी बाकीच्या सीमांवर पॅरामिलिटरी फोर्सची योजना करणे, हे सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरते. या दलांचे किंवा पोलीस दलाचे प्रमुख काम हे सीमोल्लंघन रोखणे तसेच तस्करीविरोधी स्वरूपाचे असते. 1947 ते 1965 या काळात भारताच्या धोकाविरहित सीमापट्ट्यांवर संबंधित राज्यांच्या जबाबदारीखाली राज्य सशस्त्र पोलिसांच्यआ तुकड्या तैनात केल्या जात असत. जम्मू आणि काश्मीरमधील काही भाग वगळता बाकी सर्व सीमा या पोलीस दलाच्या अधिक्षेत्राखाली होत्या. पाकिस्तानने कच्छ विभागातील सरदार पोस्ट, छाड बेट आणि बेरिया बेट या गुजरात राज्यातील सशस्त्र पोलिसांच्या चौक्यांवर 9 एप्रिल 1965 रोजी अचानक हल्ले चढवल्यानंतर राज्य सशस्त्र पोलीस दल शत्रूच्या सैन्याकडून होणाऱ्या पद्धतशीर हल्ल्यांचा प्रतिकार करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले. यातूनच पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर एका विशेष, शत्रूच्या हल्ल्याचा समर्थपणे प्रतिकार करू शकणाऱ्या पोलीस दलाची आवश्यकता असल्याचे केंद्र शासनाच्या लक्षात आले आणि सीमा सुरक्षा दल या विशेष पोलीस दलाची रचना करण्यास मान्यता देण्यात आली. भारताच्या सीमांची सुरक्षितता आणि त्याच्याशी निगडित असलेले विषय ही सीमा सुरक्षा दलाची प्राथमिक भूमिका होय. भारत-पाक यांच्यामधील 1971 चे बांगलादेश युद्ध आणि 1999 चे कारगिल युद्ध या दोन्हींमधील त्यांची कामगिरी प्रशंसनीय आहे. या दलाच्या तुकड्या संयुक्त राष्ट्रांमार्फत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी विविध देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.


