Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : भाज्यांच्या सत्वयुक्त सालींचा वापर अन् टोमॅटोचे सार करण्याच्या टिप्स
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : भाज्यांच्या सत्वयुक्त सालींचा वापर अन् टोमॅटोचे सार करण्याच्या टिप्स

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 29, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, सत्वयुक्त साली, फळाच्या साली, भाज्यांच्या सत्वयुक्त साली, कारल्याचा कडूपणा, टोमॅटोचे सार, रस्सा भाजी, शेंगा भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    काही वेळेस पदार्थ बिघडतो, काहीतरी कमी जास्त होते किंवा खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. अशाच काही टिप्स आपण आज पाहुयात –

    • टोमॅटोचे नारळाच्या दुधातले सार करताना एक किलो टोमॅटो असतील तर, दीड वाटी ओले खोबरे घेऊन त्यात मुठभर सुके किसलेले खोबरे थोड्याशा पाण्यात भिजवून घालावे. नंतर हे सर्व खोबरे मिक्सरमधून काढून, पिळून त्या रसात एक वाटी साधे दूध आणि एक वाटी गोड ताक घालून नेहमीप्रमाणे सार करावे. त्यामुळे नारळाची बचत होतेच, शिवाय साराला छान चव येते.
    • टोमॅटोचे सार करताना टोमॅटो चिरून मग उकडून घेण्यापेक्षा, टोमॅटोत सुरी किवा काटा चमचा घालून टोमॅटो गॅसवर धरल्यास अगदी पटकन साल सुटते. साल काढून मिक्सरमध्ये वाटून घेतल्यास अगदी थोडा चोथा उरतो आणि त्याचा गर जास्त होतो. गॅस आणि वेळ या दोन्हींची बचत होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना…

    • भोपळ्याची सालासह भाजी करणे ही जीवनसत्वे राहण्यासाठी उत्तम पद्धत. पण सालासह भाजी म्हणून घरातल्यांना आवडत नसेल, तर भोपळ्याची साले किसणीवर किसून हा कीस भाजीत घालावा. यामुळे भाजी मिळून येते. सालीचा स्वाद मिळतो. खाणाऱ्याला समजतही नाही, की सालीचा किस आहे. सालही वाया जात नाही.
    • स्वयंपाकात सत्वयुक्त पदार्थ करण्याला जितकं महत्त्व आहे, त्यापेक्षा पदार्थ दिसायला मनपसंत, सुंदर झाला पाहिजे, याकडे हल्ली जास्त लक्ष दिले जाते आणि म्हणून फळांच्या-फळभाजीच्या साली, ज्यात भरपूर सत्व असतं, अशा साली काढून टाकल्याने खऱ्या सत्वला मुकतात. त्याला उपाय – त्या दिवशी भाजी-आमटीला पाणी लागेल ते स्टीलच्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्या दिवशी काढलेल्या फळांच्या-भाजीच्या साली, देठ- जसे काकडी, दोडके, भोपळा यांच्या साली, वांग्याचे देठ, कोथिंबीर, पालक वगैरे पालेभाज्यांच्या जाड निबर काड्या, सर्व उकळून नंतर गाळून ते पाणी स्वयंपाकात वापरावे. पदार्थ सत्वयुक्त, रुचकर, स्वादिष्ट होतो.
    • कारल्याची भाजी करताना थोडी तुरटी घालावी. कडूपणा कमी होतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स

    • गवार, दुधीभोपळा, शेवग्याच्या शेंगा या भाज्या शिजत असताना थोडे दूध घालावे. चव चांगली येते. त्याबरोबर थोडा ओवा, जिरे ठेचून घालावेत. दूध भाजीबरोबर शिजताना पनीर घातल्याची चव येते.
    • कुठलीही रस्सा भाजी करताना कांदा बारीक चिरून घालण्यापेक्षा तो कांदा आणि सुके खोबरे एकत्र वाटावे. रस्सा करताना हे वाटण तेलात परतून घ्यावे. नंतर हळद, तिखट घालून पाणी घालावे. यामुळे खोबरे कमी लागते आणि रस्साही दाटसर होतो.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn