Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 24, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, बाजरीची उसळ, आगळेवेगळे रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ, मेथीच्या दाण्यांचा वापर, मेथीच्या दाण्यांची पूड,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बाजरीची उसळ, आगळेवेगळे रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.

    • भात शिजवताना, तसेच डाळ शिजतानाही पाणी जास्त झाल्यास ते पाणी एका सॉसपॅनमध्ये एकत्र करून त्याला तांबड्या मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंब, हिंग, मिठाची चरचरीत फोडणी द्या. उकळत असतानाच त्यात टोमॅटो साँस अथवा रॉ मँगो पल्प घाला. आमटीऐवजी हे ‘रसम’ खूपच स्वादिष्ट लागते.
    • मेथीच्या दाण्यांचा उपयोग आपण रोजच्या आहारात करतो. कारण मेथी औषधी आहे. आमटीला मेथीचा वास चांगला लागतो; पण कुणाकुणाला फोडणीतील मेथीचे दाणे आमटीवर तरंगलेले आवडत नाहीत. लहान मुले तर हे काळे काळे आणि कडू घातलं आहे, म्हणून पदार्थ बाजूला सारतात. तेव्हा डाळ शिजतानाच त्यात पाव टीस्पून मेथी घालावी. डाळीबरोबर मेथी चांगली शिजते. आमटीला वास तर येतो; पण मेथी वेगळी लागत नाही. त्याप्रमाणेच मेथीची बारीक पावडर करून ठेवल्यास वेळेवर कढी, लालभोपळ्याची भाजी अथवा भरताच्या फोडणीत हिंगाबरोबर हिंगाच्या प्रमाणात मेथी पावडर घातल्यास त्या पदार्थाची खुमारी वाढते. फोडणीत सर्वांत शेवटी मेथी पावडर घालावी. कारण मेथी पावडर लगेच लाल होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : भज्यांची भाजी अन् सँडविच टोस्टरमधली भरली कारली…

    • अर्धी वाटी मेथी दाणे थोड्याशा तेलात खमंग भाजून मिक्सरवर जाडसर पूड करावी. भाजी-आमटीसाठी फोडणी करताना पाव चमचा त्यात टाकल्यास भाजी. आमटीला छान चव येते. विशेषतः, पातळ भाजीला छान स्वाद येतो.
    • आपल्या घरात काही वेळा थोडी थोडी कडधान्ये उरतात. अशा वेळी ती सर्व एकत्र भिजत घालून चांगले मोड येऊ द्यावेत. मोड आलेली धान्ये स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावीत. फक्त एकच शिट्टी होऊ द्यावी. नंतर कडधान्ये गार करावीत. मग त्यावर लाल तिखट, मीठ, धणे, जिरे यांची पावडर घालावी. नंतर ओला नारळ, कोथिंबीर, बारीक शेव घालून मिसळ तयार करावी. आवडत असल्यास लिंबू किंवा दही घालावे. ही मिसळ फार चविष्ट होते. तेल, तूप काही नसल्यामुळे पौष्टिक आहे.

    हेही वाचा – Kitchen Tips : अशा प्रकारे पालक परोठे अन् कोबीची थालिपीठ भाजी करून पाहा…

    • रात्री बाजरी धुऊन पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी पाण्यातून उपसून स्वच्छ फडक्यात बांधून ठेवावी. साधारणतः एका दिवसात बाजरीस मोड येतात. (हिवाळ्यात मोड येण्यास दोन दिवस लागतात.) पांढरे मोड मोड आलेली बाजरी कुकरमधून वाफवून घ्यावी. वाफ येण्यास इतर कडधान्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. वाफवलेल्या बाजरीवर मीठ, लिंबू पिळून खायला दिल्यास, त्याची चव अगदी कोवळ्या हुरड्यासारखी लागते किंवा मटकीची उसळ जशी करतात, त्याप्रमाणे बाजरीची उसळ करावी. इतर उसळींपेक्षा ही वेगळी आणि रुचकर लागते.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn