Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 16, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू मटर, पीठ पेरून भाजी, टोमॅटो प्युरी, बटाट्याची भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू मटार, पीठ पेरून भाजी करताना या टिप्स वापरून पाहा.

    • पीठ पेरून करावयाच्या भाजीबरोबर हरभरा डाळीचे पीठ प्रथम तेलावर चांगले भाजून घ्या. चार चमचे पिठासाठी दोन चमचे तेल, तूप पुरे. पीठ तुपामध्ये भिजलेले दिसले पाहिजे. भाजी धुऊन, चिरून आणि कुकरमध्ये शिजवून घ्या. फोडणीला कमी तेल लागेल. जिरे, मोहरी, बुडण्यापुरते अर्धा चमचा तेल पुरे. फोडणीमध्ये चिरलेला कांदा, लसूण घालून चांगले परता. नतंर शिजवलेली भाजी आणि भाजलेले पीठ, मीठ, मसाला, तिखट, हळद मिसळून परता. भाजी मोकळी होईल.
    • टोमॅटो प्युरी करताना नेहमी टोमॅटो पाण्यात शिजवून त्याचे साल काढून नंतर पुरणयंत्रात किंवा मिक्सरमधून रस काढतो. त्याऐवजी टोमॅटोचे वरचे टोक जरासे कापावे आणि देठाकडील भाग हातात धरून टोमॅटो किसावा. साल तसेच बिया वर राहतात आणि गर केवळ खाली पडतो. तो भाजीत (पनीर मटर, राजमा किंवा मटण, चिकन) सरळ घालू शकतो. त्यामुळे वेळ तर खूपच वाचतो; गॅसही वाचतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…

    • लाल भोपळ्याचे रायते करताना भोपळा जर चिरून कुकरमध्ये लावला तर जास्त शिजतो. नंतर दही घालून कालवताना फोडी फुटून त्याचा लगदा होतो. त्याऐवजी जर भोपळ्याच्या बेताच्या आकाराच्या फोडी करून, त्या थोड्या तुपावर पातेल्यात टाकून थोड्या परतून घेतल्या आणि वर झाकण ठेवले तर, त्या थोड्या वेळात बेताच्या शिजतात.
    • आलू-मटरचा रस्सा करताना पिकलेले लाल टोमॅटो चिरून घेऊन मिक्सरमधून काढून घ्यावेत. फोडणी केल्यावर त्यात हा टोमॅटोचा गर टाकून चांगले परतावे. नंतर नेहमीप्रमाणे आपल्या आवडीचा सर्व मसाला घालून आलू-मटार टाकून रस्सा करावा. यामुळे रस्सा चांगला दाट होतो. टोमॅटोमुळे रंगही छान येतो आणि चवही चांगली लागते.

    हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा

    • बटाट्याची भाजी कधी कधी फारच तेलकट होते. त्या वेळी थोडेसे डाळीचे पीठ लावावे, म्हणजे तेल कमी होते आणि भाजीही चांगली होते. बटाटे शिजताना त्यात थोडे मीठ घालावे म्हणजे बटाटे फुटत नाहीत.
    • गाजर, मुळा, कोबी, बटाटा, दुधी, लाल भोपळा यांची कोफ्ता करी करावयाची असल्यास त्यांचा कीस करून तो कीस गाळणीत घालून चांगला पिळून घ्यावा. मग त्यात बाइंडर म्हणून थोडे कॉर्नफ्लोअर आणि थोडे बेसन मिसळून आवश्यक तो मालमसाला घालून कोफ्ते तळावेत. ग्रेव्ही करून त्यात सोडावेत. वरील पद्धतीने कोफ्ते चांगले होतात. बाइंडर थोडेच घालावे लागते. पिळून काढलेला रस ग्रेव्हीमध्ये घालता येतो.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn