Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर बनवताना हे करून पाहा…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर बनवताना हे करून पाहा…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 10, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, कोबीची भाजी, मसालेभात, पालक पनीर, शेवग्याच्या शेंगा, पुदिन्याचे दही, मेथीची पावडर,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर, पुदिन्याचे दही करताना या टिप्स वापरून पाहा.

    • लिंबं सुकू नयेत म्हणून ती वाळूत ठेवावीत आणि उन्हाळ्यात त्यावर थोडे पाणी शिंपडावे म्हणजे लिंबं ताज्यासारखी राहतात.
    • पावशेर दुधात 5-6 पुदिन्याची पाने वाटून घालून त्याचे दही लावावे. उन्हाळ्यात हे हिरवे दही घेतल्यास जेवण पचण्यास त्याचा उपयोग होतो.
    • कुठल्याही भाजीत, मसालेभातात आणि सार, पिठले वगैरेत जिरे, खोबरे घालताना एक वाटी खोबरे किसून वा चिरून घ्यावे. त्यात एक चमचा जिरे, धणे आणि कढीलिंबाची थोडी पाने कढईत भाजावीत. खोबरेही किंचित गरम करावे. एकत्र कुटून बरणीत भरावे. प्रत्येक वेळी कुटण्याचा त्रास वाचतोच आणि पदार्थांना स्वादही चांगला येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : मसाल्याच्या रस्सा भाज्या, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी…

    • कांद्याचे साल लवकर निघत नसल्यास, तो थोडा वेळ गरम पाण्यात आणि नंतर थंड पाण्यात बुडवावा. सालं लवकर सोलली जातात.
    • पालक-पनीर करताना पालकाची पाने थोडे दूध घालून, न चिरता शिजविल्यास पालकाचा हिरवा रंग शेवटपर्यंत टिकून राहतो. कृत्रिम रंग लागत नाही. तसेच, पनीर तुपात मंद आचेवर गुलाबी-सोनेरी तळून लगेच गरम पाण्यात टाकले असता अतिशय लुसलुशीत राहते आणि चविष्ट लागते.
    • मेथीची भाजी स्वस्त असताना निवडून कडकडीत उन्हात वाळवून पावडर करून ठेवावी. आयत्या वेळी दहीवडा आणि रस्साभाजीत वरून भुरभुरावी. चव वेगळीच आणि छान लागते.
    • भाजी किंवा पुलावात पनीरचा उपयोग करते वेळी फोडणीत तळलेले पनीर घालावे आणि दोन-तीन चमचे दूध घालावे. पनीर मऊ आणि स्पंजी होते.
    • पानकोबीच्या भाजीत आंब्याच्या लोणच्याचा मसाला पावशेर भाजीला चहाचा दीड चमचा भरून किंचित ओलसर करून फोडणीत टाकावा आणि लागलीच भाजी करावी. फोडणीत हळद अगदी थोडी टाकावी. थोडीशी साखर पण टाकावी. दुसरा कोणताही मसाला घालू नये. भाजी चवदार होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर…

    • शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये उकडल्यास त्या फुटतात; पण उकडायला ठेवताना छोटासा गुळाचा तुकडा घालावा आणि शेंगाना मीठ चोळून ठेवावे म्हणजे शेंगेत मीठ शिरते, चव चांगली येते आणि गुळामुळे शेंगा शिजतात, पण फुटत नाहीत.
    • कसुरी मेथी विकत आणण्याऐवजी आपण जेव्हा मेथीची भाजी आणतो, त्यातलीच निवडून दोन मुठी पाने पॅनमध्ये थोडी शेकवून सावलीत वाळवावीत. लागेल तेव्हा पाने पंजाबी डिशेस अथवा व्हेज, नॉनव्हेज बिर्याणीमध्ये कसुरी मेथी (चिमूटभर) पाने म्हणून वापरावीत.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026 पंचांग आणि भविष्य

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    By Team AvaantarApril 3, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 256
    • अवांतर 179
    • आरोग्य 95
    • पंचांग आणि भविष्य 372
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 190
    • मैत्रीण 17
    • ललित 531
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026
    Most Popular

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.