Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeफिल्मीमानो या ना मानो...

मानो या ना मानो…

नमस्कार मी हर्षा गुप्ते!

अभिनेत्री आहे. माझा एक छान अनुभव शेअर करायचाय. हा विषय श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असा धरूच नका.
एक मुलगा आहे… त्याचं असं म्हणणं आहे की, त्याला काही संकेत मिळतात. ते तो सगळ्यांना नाही सांगू शकत. पण मेसेज म्हणून तो मला फक्त काही शब्द पाठवतो आणि मी अंदाजाने वाक्य बनवते. खूप भयानक गोष्टी असतात त्या.
उदाहरण द्यायचंच झालं तर…

  1. ऋषी कपूर गेले तेव्हा, त्यांचा आत्मा तो मृत्यू स्वीकारायला तयारच नव्हता.
  2. इरफान खान गेला तेव्हा, त्यांचा आत्मा थोडासा गोंधळलेला… की हे काय झालं! पण तेवढ्यात त्याला त्याच्या ओळखीचे काही आत्मे दिसले आणि त्याने त्याचा मृत्यू लगेच स्वीकारला.

बरं, हा विषय असा आहे की, पटकन कोणाचा विश्वास कसा बसेल?

एक दिवशी मला त्याचा मेसेज आला की, ‘ताई, तुम्हाला श्रीखंड खूप आवडतं ना?’

मी म्हटलं, ‘अगदीच तसं काही नाही, पण मला सगळेच अन्नपदार्थ आवडतात. जे जसं मिळेल, तसं मी हादडते.’ (Yes, I am food lover)

तो म्हणाला की, ‘सध्या रिमा लागू माझ्याकडे आल्या आहेत (म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा).’ त्यांना मी दिदी म्हणायचे… तर, तो म्हणे, ‘दिदीने सांगितलं की मला श्रीखंड खूप आवडतं. गोव्यात आम्ही दोघींनी मिळून खूप सारं श्रीखंड ओरपलं होतं! आताही हर्षाला श्रीखंड खायला सांग अन् माझ्याकडून कॉग्रॅच्युलेशन सांग!’

आता या दोन गोष्टींची सांगड कशी घालावी? पण बरं म्हटलं, आणूयात श्रीखंड. मी ते बोलणं विसरूनसुद्धा गेले. 10-12 दिवसांनी मला ते आठवलं. मग श्रीखंडाचे दोन डबे घेऊन आले. फ्रीजमध्ये ठेवले आणि विसरले. ते डबे हळूहळू मागे गेले. डब्यांच्या पुढे अजून काहीबाही ठेवलं गेलं… आणि ते डबे पुढचे 8-10 दिवस विस्मरणात गेले. एकेदिवशी अचानक आठवलं आणि तो डबा काढला. मस्तपैकी मोठ्या वाटीभर श्रीखंड चापलं. मन:शांती झाली.

त्याच रात्री मला एक फोन आला… ‘ताई, हिंदी सिनेमा आहे. रेणुका शहाणे दिग्दर्शन करणारायत. प्रमुख भूमिकेत काजोल आहे. तिच्या मावशीचा रोल आहे. तुम्ही available आणि interested आहात का?’ मी कसलाही विचार न करता ताबडतोब हो म्हणाले आणि मला ‘त्रिभंगा’ नावाचा सिनेमा मिळाला.

हर्षाला श्रीखंड खायला सांग आणि माझ्याकडून अभिनंदन… याचं कनेक्शन कळालं. दिदीचं खूप प्रेम होतं माझ्यावर. तिने ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाच्या वेळी माझी खूप काळजी घेतली होती. अगदी माझ्या लांबसडक केसांच्या रोज वेण्या घालयाची. मी वेळेत जेवले की नाही, अभ्यास करते ना… याकडे तिचं लक्ष असायचं.

ही घटना जेव्हा मी रेणुका शहाणे यांना सांगितली, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘असं होऊ शकतं.’

‘त्रिभंगा’ Jio Hotstar वर बघायला मिळेल, एक उत्तम सिनेमा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!