हर्षा गुप्ते
शेंगा डाळ
साहित्य
- भिजवलेली तूरडाळ – अर्धी वाटी
- शेंगदाणे – 3 टी-स्पून
- जीरं – अर्धा चमचा
- लसूण – 7-8 पाकळ्या
- कोथिंबिर – पाव वाटी
- मीठ, लाल तिखट, लिंबू, साजूक तूप – चवीनुसार
- फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कढिपत्ता
पुरवठा संख्या – दोघांसाठी
कालावधी : साधारणपणे अर्धा तास (डाळ भिजायला वेळ लागतो.)
कृती
- तूरडाळ उकडून नीट घोटून घ्यावी.
- शेंगदाणे, लसूण, जिरं खमंग भाजून घ्यावेत. थोड्यावेळाने वरून कोथिंबिर घालून पुन्हा परतून घ्यावे. शेवटी लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि ते मिश्रण परतवा. कढई गरम असतेच आणि लाल तिखट जळत नाही.
- शेंगदाण्याचे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
- आता कढईमध्ये तेल घेऊन त्यात हिंग, मोहरी, कढिपत्त्याची फोडणी करावी. त्यात वाटलेला शेंगदाण्याचा मसाला घालून खरपूस परतून घ्यावा.
- त्यानंतर घोटलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतून घ्या. त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून उकळू काढावी.
टिप
- जेवताना लिंबू पिळून, साजूक तुपाची धार घालावी.
- भात, पोळी, भाकरी यासोबत ही शेंगा डाळ रुचकर लागते.
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
मिस्सी रोटी
साहित्य
- गव्हाचं पिठ – 1 वाटी
- बेसन – अर्ध्या वाटीपेक्षा कमी आणि पाव वाटीपेक्षा जास्त
- हळद – अर्धा चमचा
- ओवा – एक चमचा
- तेल, मीठ, जिरं पावडर (पर्यायी) – चवीनुसार
पुरवठा संख्या – दोघांसाठी
कालावधी : 10 ते 15 मिनिटे
कृती
- गव्हाचं पिठ, बेसन, हळद, मीठ, जिरं पावडर (पर्यायी) आणि हाताच्या तळव्यावर चोळून ओवा यांचं मिश्रण घ्यावं. (ओवा कशातही घालताना तळहातावर चोळून घातल्यास त्याचा स्वाद खुलून येतो.)
- सगळी कणिक थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून थोडावेळ झाकून ठेवावी.
- 15-20 मिनिटांनंतर या कणकेला तेल लावून पुन्हा नीट मळावी.
- आता त्याचे उंडे करून नेहमीप्रमाणे दोन घडीची पोळी (चपाती) करून तव्यावर भाजून घ्यावी.
- आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर सोडून ती खरपूस भाजून घ्यावी.
टिप
- वांग्याच्या भाजीसोबत ही मिस्सी रोटी मस्त लागते.
- कोणतीही रस्सा भाजी, जॅम, आलं घालून वाफाळलेल्या चहासोबतही मिस्सी रोटी छान लागते.
हेही वाचा – Recipe : झटपट स्वादिष्ट कॉर्न पुलाव
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.