Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक
    आरोग्य

    त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 4, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    आणि, अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, त्वचा, त्वचेचीनिगा, कोरडीत्वचा, चुकीचीउत्पादने, Skin, Skincare, DrySkin, WrongProducts
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    लीना जोशी परुळेकर

    मागच्या लेखात आपण त्वचा आणि तिचे प्रकार पाहिले. यावेळी आपण, त्वचेवर कुठल्या गोष्टी परिणाम करतात, ते पाहू. आपल्या त्वचेवर अंतर्गत आणि बाह्य गोष्टींचे परिणाम होत असतात. यातील अंतर्गत बदल हे मुख्यत्वे करून Hormones च्या बदलामुळे होत असतात, या बदलांमुळे तुमची त्वचा अतितेलकट होऊन त्यावर मुरुमे येऊ शकतात किंवा त्वचा अतिकोरडी होऊन Hyperpigmentation सारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागू शकते. Hormones मध्ये होणाऱ्या बदलाला Puberty, गरोदरपणा, menstrual cycle (मासिक पाळी), menopause इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. अपुरी झोप, चुकीची जीवन शैली, सतत बाहेरचे खाणे, आजारपण या आणि अशा विविध गोष्टी त्वचेवर विपरित परिणाम करतात.

    बाह्य गोष्टींमध्ये ऋतू बदल, पाणी, वातावरण तसेच चुकीच्या उत्पादनांचा वापर यांचा समावेश असतो.

    ऋतू बदल : जसे ऋतू बदलतात, त्याप्रमाणे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होत असतो. उन्हाळ्यात त्वचा जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. तर, पावसाळ्यात ती बऱ्यापैकी Balance असते आणि थंडीत त्वचा कोरडी होण्याची शक्यता जास्त असते.

    पाणी : आपण कुठे राहतो, त्याप्रमाणे पाणी आपल्या त्वचेवर परिणाम करीत असते. हलके पाणी जे मुख्यत्वे समुद्रसपाटीला आढळते, ते तुमच्या त्वचेवर कुठलाही residue सोडत नाही. तेच, जड पाणी जे डोंगराळ भागात किंवा उंच पठारांवर सापडते, त्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. असे पाणी त्वचेवर एक अदृश्य असा residue सोडते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. जलतरण तलावातील पाण्यात क्लोरिन घातलेले असते, त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अगदी पावसाचे पाणी हे गुणधर्माने mildly acidic असते, त्यामुळे सुद्धा त्वचा कोरडी पडू शकते.

    हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार

    वातावरण : सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा कोरडी पडून त्वचेवर सुरकुत्या, सूक्ष्म रेषा तसेच Pigmentation चे प्रमाण वाढू शकते.

    • प्रदूषणामुळे काहीवेळा त्वचा कोरडी होऊन तिचे premature aging होऊ शकते. तसेच, तेलकट त्वचेवर मुरुमांचे प्रमाण वाढते. त्वचेवर allergic reaction होऊ शकते.
    • तापमानात होणारे बदल आणि हवेतील आर्द्रता सुद्धा त्वचेतील moisture level imbalance करते. थंड हवा त्वचेला कोरडेपणा आणि flakiness देते. तर, गरम हवा त्वचा अतितेलकट करून मुरुमांचे प्रमाण वाढवू शकते. काहीवेळा त्वचेला fungal infection चा सुद्धा सामना करायला लागू शकतो.

    चुकीची उत्पादने : आपण कित्येकदा आपली त्वचा कुठल्या प्रकारची आहे, याचा विचार न करता आपल्याला आवडतील ती, बाजारात कुठला trend सुरू आहे हे बघून, नवीन उत्पादन आले आहे म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून… अशा अनेक कारणांनी विविध उत्पादने घरी आणतो आणि वापरतो. ती उत्पादने आपल्या त्वचेला नेहमीच suit होतील असे नाही. कित्येकदा आणलेली उत्पादने महाग असतात म्हणून ती suit होत नसून सुद्धा वापरली जातात. अशावेळी आपण आपल्या त्वचेचे अधिकाधिक नुकसान करत असतो. म्हणूनच कुठल्याही मोहाला बळी न पडता आपली त्वचा कुठल्या प्रकारची आहे, याचा विचार नक्कीच करावा.

    हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान

    माझ्या मागील लेखामध्ये त्वचेचे प्रकार आणि प्रस्तुत लेखामध्ये त्वचेवर होणाऱ्या आंतरबाह्य घटकांचे परिणाम याविषयी आपण जाणून घेतले. आता आगामी लेखात आपण जाणून घेऊया की, त्वचेची काळजी कशी घ्यावी.

    (क्रमश:)

    lee.parulekar@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 21, 2026 आरोग्य

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेMarch 21, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास, प्राणायामाची आवश्यकता आणि पूर्वतयारी, विविध प्रकार तसेच प्राणायामाचे आरोग्य…

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn