Thursday, February 5, 2026

banner 468x60

HomeललितShrirang took a leave and surprised her

Shrirang took a leave and surprised her

मी मज हरपून बसले गं…

मयुरेश गोखले

आज पहाटे 5 वाजताच श्रीरंग जागा झाला. त्याला आज ऑफिसला लवकर जायचे होते. हलकी थंडी सुरू झाली होती, रोजच्या सवयीमुळे पंखा डोक्यावर फिरत होता. मी साखर झोपेत होते, पण त्याच्या उठण्याची चाहूल मला लागली होती. तो अचानक जवळ आला, मी झोपेत आहे हे पाहून अलगद माझ्या अंगावर ब्लॅंकेट टाकले. मी खूप सुखावले. पण आज तो सकाळी जाऊन रात्री उशिरा परत येणार होता, त्यामुळे मन थोडे उदास होते.

लग्न होऊन जेमतेम 4 महिने झाले असतील आणि याच्या ऑफिसची लगबग वाढतच होती. ऑफिस ही पहिली बायको आणि मी दुसरी असं वाटायला लागलं होतं. असो, आज श्रीचा मूड काही वेगळाच वाटत होता… नेमकं कळत नव्हतं. अंगावर चादर टाकून तो आवरायला गेला; पण माझी झोप उडवून गेला. मी लगेच उठून त्याच्यासाठी चहा बनवला. कडक आल्याचा गोड चहा त्याला खूप आवडतो, म्हणून अगदी त्याच्या आवडीचा चहा बनवत होते, तोच हे साहेब माझ्या मागे येऊन उभे…! त्याला वाटलं मला माहीत नाहीये, पण मला त्याच्या असण्याची ऊब जाणवत होती.

हेही वाचा – Social Media : डॅड से नो लेट नाइट पार्टी!

त्याला उशीर नको व्हायला म्हणून मी लगबगीने चहा करत होते. माझ्या कानाला त्याच्या श्वास जाणवू लागला, तेव्हा मी त्याला जबरदस्तीने आंघोळीला पाठवले. मनात अजिबात नव्हते की, त्याने जावे… पण पर्याय नव्हता, खूप महत्त्वाची असाइनमेंट होती आज त्याची…

श्री आंघोळीला गेल्यावर मी नेहमी प्रमाणे रेडिओ लावला. माझ्या मनातील बेचैनी कदाचित रेडिओला पण कळली की, काय माहीत नाही… आणखी बेचैन करण्यासाठी त्याने आशा भोसले यांचं “मी मज हरपून बसले गं…” हे गाणं लावलं!

गाणं ऐकत मी त्याच्या डब्याची तयारी करत होते. साहेब आंघोळ करून परत माझ्याभोवती घुटमळायला लागले. त्याचं असं रेंगाळण खूप आवडत होतं, पण उशीर झाला तर, पंचाईत झाली असती, म्हणून माझ्यातली गृहिणी जागृत झाली आणि मी त्याला तयारी करायला पिटाळले. शेवटी त्याची तयारी झाली आणि तो डबा घेऊन ऑफिसला निघाला…

रात्री त्याचा फोन आला की, तो घरी येऊन जेवणार आहे. स्वयंपाक करून मी त्याची वाट पाहात बसले होते… डोळे झोपेची वर्दी देत होते, पण श्री आल्यावर झोपमोड होईल आणि परत लागणार नाही, म्हणून झोपत नव्हते. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास हा आला. फ्रेश होऊन जेवायला बसला. ऑफिसचा कार्यक्रम छान झाला वगैरे डिटेल सांगत सांगत त्याने जेवण केले. मी त्याला म्हणाले की, उद्या सुट्टी घे आराम कर पण त्याने सुट्टी घेतली तर, ऑफिस नेहमीसाठी बंदच झाले असते ना त्याचे! त्यामुळे त्याने सरळ नकार दिला.

मी सकाळी उठल्यावर त्याच्या डब्याची तयारी सुरू केली, पण आज श्रीरंगशी अजिबात बोलायचं नाही, असं ठरवलं. माझा राग त्याच्या लक्षात आला होता. तो आंघोळ करून आला आणि माझा शर्ट कुठेय, रुमाल कुठेय… म्हणून उगाचच बोलायचा प्रयत्न करीत होता. एकतर आपल्या वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवायची सवय नाही, मग हे असंच होणार! मी न बोलताच त्याच्या सगळ्या गोष्टी काढून बेडवर ठेवल्या आणि स्वयंपाक घरात निघून गेले.

हेही वाचा – मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…

ओट्याजवळ येऊन रेडिओ सुरू केला आणि कामाला लागले… आणि अचानक श्री पाठीमागून आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. यावेळेस मला अजिबात त्याची चाहूल लागली नाही. मी क्षणभर गोंधळले. तो कानाजवळ येऊन म्हणे की, “अगं, मी आजची सुट्टी कालच मंजूर करून आलोय…”

…आणि असं म्हणून त्याने मिठी आणखी घट्ट केली. मला काय बोलावे कळतच नव्हते, मी कशीबशी त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवले आणि त्याच्याकडे लटक्या रागाने पाहत म्हणाली की, “ऑफिस बंद पडेल ना, तू गेला नाहीस तर?”

काहीच न बोलता त्याने जवळ खेचून, मला मिठीत घेऊन माझ्या नजरेला नजर भिडवली… आणि रेडिओवर आशाताई गात होत्या…

त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखलेऽ ग
दिसला मग तो देवकिनंदन अन्‌ मी डोळे मिटलेऽ ग…

आणि मी सुद्धा या शब्दांसोबत माझे डोळे अलगद मिटले…


मोबाइल – 9423100151

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!