Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधभारतातील शक्तिपीठे

भारतातील शक्तिपीठे

सुनीता मुकुंद

श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन शक्तिपीठे आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली.

  1. किरीट शक्तिपीठ – लालबाग, पश्चिम बंगाल; शीरोभूषण किरीट (जगन्नाथ पुरी, ओडिशा)
    शक्ती – विमला / भुवनेश्वरी, भैरव – कोट / संवर्त.
  2. कात्यायनी शक्तिपीठ – भुतेश्वर, वृंदावन, मथुरा; केसकलाप.
    शक्ती – कात्यायनी, भैरव – भूतेश
  3. करवीर शक्तिपीठ – कोल्हापूर, महाराष्ट्र. त्रिनेत्र.
    शक्ती – महिषासूरमर्दिनी, भैरव – ज्योतीबा रवळनाथ
  4. श्रीपर्वत शक्तिपीठ – लडाख / आसाम / हिमाचल प्रदेश. सतीचे यज्ञकुंडातून काढलेले पूर्ण शरीर ठेवले.
    शक्ती – श्रीसुंदरी, भैरव-सुंदरानंद. (भैरव म्हणजे क्षेत्ररक्षक)
  5. विशालाक्षी शक्तिपीठ – मीरघाट, वाराणसी, उत्तर प्रदेश; उजवा कान कुंडलसहीत.
    शक्ती – विशालाक्षी, भैरव – काळभैरव
  6. गोदावरी शक्तिपीठ – कब्बूर, आंध्र प्रदेश; डावा गाल.
    शक्ती – विश्वेश्वरी / रुक्मिणी, भैरव – दंडपाणी
  7. शूचीन्द्रम शक्तिपीठ – कन्याकुमारी, तामिळनाडू; पृष्ठभाग (पाठ).
    शक्ती – नारायणी, भैरव संहार / संकूर.
  8. पंचसागर शक्तिपीठ – दात, सुळा.
    शक्ती – वाराही, भैरव – महारुद्र.
  9. ज्वालामुखी शक्तिपीठ – कांगडा, हिमाचल प्रदेश; जीभ.
    शक्ती – सिद्धीदा, भैरव – उन्मत्त.
  10. भैरव पर्वत शक्तिपीठ – गिरनार / उज्जैन, क्षीप्रानदी काठ; वरचा ओठ (अधर).
    शक्ती – अवंती, भैरव – लंबकर्ण.
  11. अटाहास शक्तिपीठ – लाभपूर, पश्चिम बंगाल; खालचा ओठ.
    शक्ती – फुल्लरा, भैरव – विश्वेश (विश्वेषा).
  12. जनस्थान शक्तिपीठ – पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र; गर्भाशय.
    शक्ती – भ्रामरी, भैरव – विक्रताक्ष.
  13. अमरनाथ शक्तीपीठ – काश्मीर. गळा (कंठ).
    शक्त्ती – महामाया, भैरव – त्रिसंधेश्वर.
  14. नंदीपूर शक्तिपीठ – सैन्थया, पश्चिम बंगाल; मान (गर्दन).
    शक्ती – नंदिनी, भैरव- निंदकेश्वर.
  15. श्री शैल शक्तिपीठ – कर्नूल, आंध्र प्रदेश; पडजीभ.
    शक्ती – महालक्ष्मी, भैरव – संवरानंद किंवा ईश्वरानंद.
  16. नलहटी शक्तिपीठ – बोलपूर, पश्चिम बंगाल. पोट.
    शक्ती – कालिका, भैरव – योगीश
  17. मिथिला शक्तिपीठ – जनकपूर, नेपाळ / समस्तीपूर, बिहार / सहरसा; डावा खांदा,
    शक्ती – उमा / महादेवी, भैरव – महोदराज / महोदर.
  18. रत्नावली शक्तिपीठ – चेन्नई, तामिळनाडू. कोपरापासून डावा हात.
    शक्ती – कुमारी, भैरव – शीव
  19. अंबाजी शक्तिपीठ – जुनागड, गिरनार पर्वत, गुजरात; उदर.
    शक्ती – चंद्रभागा, भैरव – वक्रतुंड
  20. जालंधर शक्तिपीठ – जालंधर, पंजाब; डावा स्तन.
    शक्ती – त्रिपुरमालिनी, भैरव – उग्र
  21. रामगिरी शक्तिपीठ – चित्रकूट, उत्तर प्रदेश / मैहेर मध्य प्रदेश. रामटेक महाराष्ट्र; उजवा स्तन.
    शक्ती- शिवानी, भैरव – चंड.
  22. वैद्यनाथ शक्तीपीठ – देवघर, गिरीडीह, झारखंड; ह्रदय.
    शक्ती – जयदुर्गा, भैरव – वैद्यनाथ.
  23. वक्रेश्वर शक्तिपीठ – सैन्थेया. मन.
    शक्ती – महिषासुरमर्दिनी, भैरव – वक्रनाथ
  24. कन्याकुमारी शक्तिपीठ – तीन समुद्रसंगम, तामिळनाडू. पाठ.
    शक्ती – शर्वाणी / नारायणी, भैरव – निमषी / स्थाणू
  25. बहुला शक्तिपीठ – केतूग्राम, पश्चिम बंगाल; डावा खांदा.
    शक्ती – बहुला, भैरव – भीरुक

क्रमश:

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!