Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधदेशविदेशातील शक्तिपीठे

देशविदेशातील शक्तिपीठे

सुनीता मुकुंद

श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा, त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली. मागील भागात आपण 25 शक्तिपीठांची माहिती घेतली होती. आता उर्वरित 26 शक्तिपीठे….

हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे

26. उज्जयनी शक्तिपीठ : उज्जैन, क्षिप्रानदी तट, मध्य प्रदेश; उजवी कुशी.
शक्ती – हरसिद्धी / मंगला / चंडिका, भैरव – मांगल्य / कपिलाम्बर

27. मणिवेदिका शक्तिपीठ : पुष्कर, राजस्थान; हाताची मनगटे.
शक्ती – गायत्री, भैरव – सर्वानंद / शर्वानंद.

28. प्रयाग शक्तिपीठ : अलाहाबाद, अक्षयवट / मीरापूर, अलोपी; हाताची बोटे.
शक्ती – ललिता, भैरव – भव. (शाकांभरी देवी मंदिर)

29. उत्कल शक्तिपीठ : जगन्नाथपुरी, याजपूर, ओडिशा; नाभीस्थळ.
शक्ती – विमला / रुख्मिणी, भैरव – जगन्नाथ / पुरुषोत्तम / घन:श्याम

(जगन्नाथपुरीची रथयात्रा आषाढ शुद्ध बीज द्वितीयेला निघते. नंतर पंधरा दिवस मंदिर बंद असते, कारण त्या तिन्ही भावंडांना मामाने (कंसाने) आजोळी बोलावलेले असते. त्याप्रमाणे समस्तीपूरला मावशीच्या गावाला एक दिवस राहून पुढे मथुरेला जाऊन (चौबे) पाहुणचार घेऊन आणि कंसवध करून परत आषाढ पौर्णिमेला परत येतात. मग मंदिर दर्शनासाठी खुले होते.)

वैशिष्ट्य – बीजेला रथ मंदिरात परत आल्यावर देवांना खिचडी, गवार-भोपळा भाजीचा नैवेद्य दाखविला जातो. प्रसाद तोच दिला जातो. अहमदाबाद येथेही रथयात्रा वरीलप्रमाणे निघते. फक्त पुरीला सिंहद्वारापर्यंत समुद्राचा आवाज येतो, आत प्रवेश केल्यावर समुद्राचा मागमूस लागत नाही.
अहमदाबादल द्रौपदीचे शेले पांघरून रक्षण केले, त्यासाठी 999 उपरणी स्वीकारली जातात. प्रत्येक भक्ताकडून एकच उपरणे स्वीकारले जाते.

30. कांची शक्तिपीठ : कांचीपूरम, तामिळनाडू; बरगडी.
शक्ती – देवगर्भा, भैरव – रुरु

31. कालमाधव शक्तिपीठ : स्थान निश्चित नाही. डावा नितंब.
शक्ती – काली, भैरव- असितांग.

32. शोण शक्तिपीठ : अमरकंटक, मध्य प्रदेश / सासाराम, बिहार. उजवा डोळा.
शक्ती – नर्मदा / शोणाक्षी, भैरव – भद्रसेन.

33. कामाख्या शक्तिपीठ : गुवाहाटी, आसाम. योनी.
शक्ती – कामाख्या, भैरव – उमानंद.

34. जयंती शक्तिपीठ : जयंतीया टेकडी, मेघालय. डावी जांघ.
शक्ती – जयंती, भैरव – क्रमदीश्वर.

35. मगध शक्तिपीठ : पाटणा, बिहार. उजवी जांध.
शक्ती – पाटनेश्वरी / सर्वानंदकरी, भैरव – व्योमकेश

36. त्रिस्तोता शक्तिपीठ : जलपायगुडी, पश्चिम बंगाल. डावा पायाच्या मांडीचा भाग. शक्ती – भ्रामरी, भैरव – ईश्वर.

37. त्रिपुर सुंदरी शक्तिपीठ : राधाकिशोर गाव, त्रिपुरा. डाव्या पायाचा गुडघा ते घोट्यापर्यंतचा भाग
शक्ती – त्रिपुर सुंदरी, भैरव – त्रिपूर / त्रिपुंड / सामल.

38. विभाषा शक्तिपीठ : मिदनापूर, पश्चिम बंगाल मिदनापूर. डाव्या पायाचा घोटा
शक्ती – कपालिनी (तंत्र-मंत्र) भैरव – सर्वानंद

39. कुरुक्षेत्र शक्तिपीठ : द्वैपायन सरोवर, कुरुक्षेत्र, हरयाणा. उजवा पाय.
(श्रीदेवी रूप – भद्रकाली शक्ती – साबित्री, भैरव – स्थाणू

40. युगद्या शक्तिपीठ : वर्धमान, क्षीरग्राम, पश्चिम बंगाल. उजवा पाय अंगठा.
शक्त्ती – युगंधरा / जुगाड्या, भैरव – क्षीरखंडक

41. विराट अंबिका शक्तिपीठ : वैराटग्राम, जयपूर, राजस्थान. उजव्या पायाची चार बोटे. शक्ती – अंबिका, भैरव – अमृत.

42. कालीघाट शक्तिपीठ : कोलकता, पश्चिम बंगाल. डावे पाऊल – सर्व बोटांसहीत.
शक्ती – कालिका, भैरव – नकुलेश.

43. मानस शक्तिपीठ : मानसरोवर, तिबेट. उजवा हात पंजा.
शक्ती – द्राक्षायणी, भैरव – अमर.

44. लंका शक्तिपीठ : श्रीलंका. उजवा घोटा, वैजणासहीत.
शक्ती – इंद्राक्षी / विमला, भैरव – रुद्रेश्वर / जगन्नाथ / पुरुषोत्तम.

45. गंडकी शक्तिपीठ : गंडकी नदी उगम, नेपाळ. कपाळ डावा भाग.
शक्ती – गंडकी, भैरव – चक्रपाणि / शाळीग्राम.

46. गुह्येश्वरी शक्तिपीठ : पशुपतीनाथ मंदिर, काठमांडू, नेपाळ. दोन्ही गुडघे.
शक्ती – महामाया भैरव – कपालेश्वर / कपाल.

47. हिंगलाज शक्तिपीठ : बलूचिस्तान; ब्रह्मरंध्र.
शक्ती – ज्वाला / जिव्हा, भैरव – भीमलोचन.

48. सुगंध शक्तिपीठ : खुलना सुगंध नदीकाळ, बांगलादेश. नाक.
शक्ती – सुगंधा / सुनंदा, भैरव – त्रयंबक.

49. कर्तोया शक्तिपीठ : भवानीपूर, बांगलादेश. वामतल्प.
शक्ती – अपर्णा, भैरव – शीव / वामन.

50. चट्टल शक्तिपीठ : चितगाव, बांगलादेश. उजवा हात.
शक्ती – भवानी / रणचंडीका, भैरव – चंद्रशेखर.

51. यशोर शक्तिपीठ : जैसोर, खुलना, बांगलादेश. डावा पंजा.
शक्ती – यशोरेश्वरी, भैरव – चंद्र.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!