हर्षा गुप्ते
भाताचे कटलेट
पुरवठा संख्या – 4 माणसांसाठी
एकूण कालावधी – अर्धा तास
साहित्य
- शिजवलेला भात – दीड वाटी
- रवा – अर्धी वाटी
- दही – अर्धी वाटी
- हिरव्या मिरच्या – चवीनुसार
- लसूण – 5-6 पाकळ्या
- आले – अर्धा इंच
- कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली)
- चिरलेला कांदा – 1 वाटी
- गाजर – 2 मध्यम
- सिमला मिरची – 1 मध्यम
- स्वीट कॉर्न – 1 लहान वाटी
- कढीपत्ता – 4-5 पाने
- हिंग – चिमुटभर
- मोहरी – 1 लहान चमचा
- तेल – फोडणीपुरते
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- इनो – एक चमचा
कृती
- भात, रवा, दही, मीठ, साखर एकत्र कालवून घ्यावे.
- गाजर, सिमला मिरची, कांदा, मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर चिरून घेईपर्यंत रवा नीट उमलून येईल.
- सगळ्या भाज्या आणि कालवलेला भात एकत्र करून त्यात एक चमचा इनो टाकावे.
- गरज लागल्यास थोड पाणी घालून हे मिश्रण मळून घ्यावे.
- नंतर त्याचे छोटे गोळे करून वाफवून घ्यावेत.
- कढईमध्ये तेल घेऊन त्यात तेल गरम करावे.
- नंतर हिंग, मोहरी, कढीपत्ता, चिरलेली हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी.
- त्यात हे कटलेट ठेवावेत आणि थोड्या वेळानंतर उलटून सोनेरी रंगाचे झाल्यावर बाहेर काढावेत.
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
टीप
- टोमॅटो सॉस, मेयोनिज आणि रेड चिली सॉस मिक्स करून त्यासोबत गरम गरम कटलेट खावेत.
- या मिश्रणात अजून काही आवडीच्या भाज्या चिरून घालू शकता.
दही ब्रेड
पुरवठा संख्या – दोन माणसांकरिता
बनविण्यासाठी कालावधी – अर्धा तास
साहित्य
- ब्रेड – 8 स्लाइस
- घट्ट आंबटसर दही – 1 मोठी वाटी
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- हिंग – चिमुटभर
- मोहरी – 1 लहान चमचा
- कढीपत्ता – 4-5 पाने
- हिरव्या मिरच्या – 2 मोठ्या
- लसूण – 5-6 पाकळ्या (आवडत असेल तर)
- तेल – 1 मोठा चमचा
कृती
- एका मोठ्या वाडग्यात दही काढून घ्यावे.
- त्यात दोन-तीन चमचे पाणी घालून घट्ट फेटून घ्यावे.
- त्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी.
- कढीपत्ता, मिरची आणि लसूण चांगले कुटून घ्यावे
- तव्यावर थोडे तेल गरम करून हिंग, मोहरी, फोडणी तसेच कुटलेली मिरची-लसूण याची फोडणी करावी आणि ती दह्यात घालावी.
- फोडणी नीट मिसळल्यावर दह्यात ब्रेड घोळवून तव्यावर गरम तेलावर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यावेत.
हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…
टीप
- दही ब्रेड सॉस, चटणी किंवा नुसताही खायला रुचकर लागतो.
- सकाळचा झटपट नाश्ता होऊ शकतो.
- ब्रेड थोडा शिळा असेल तर आणखी चांगले.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


