Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe :  मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण
    फूड काॅर्नर

    Recipe :  मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मिसळीचे वरण, मिश्र डाळींचे वरण, मिक्स डाळीचे वरण, थंडीत डाळींचे वरण, थंडीत डाळींचे सूप,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    मिसळीचे वरण किंवा मिश्र डाळींचे वरण हे महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्याच भागात घरोघरी बनत असेल. तूर, मूग, मसूर, उडीद, चणाडाळ आणि असेल तर चवळीची डाळ असे मिश्रण असलेले खमंग तसेच आले-लसूण पेस्ट, खोबरे, शेंगदाणे, खसखस, तमालपत्र, दालचिनी वापरून केलेले मसालेदार वरण ज्वारीच्या भाकरीसोबत भुरके मारून खाताना किती खातोय ते समजतच नाही. आज मी खूप दिवसांनी हे वरण केले; कारण नागपूरमध्ये सध्या थंडीने परत एकदा जोर पकडला आहे, त्यामुळे अशा वातावरणात हे तडकेदार वरण आहारात असलं तर  सहजच शरीरात उर्जा निर्माण होते. थंडीमध्ये असे गरम पदार्थ चालून जातात. हे वरण थोडे पातळसरच करावे, त्यामुळे तुम्हाला ते बाऊलमध्ये घेऊन सूप म्हणूनही त्याचा आस्वाद घेता येतो. सर्व प्रकारच्या डाळींमुळे या मिसळीच्या वरणाची चव अफलातून लागते…

    साहित्य

    • तूरडाळ – 1 छोटी वाटी
    • मसूरडाळ – 1 छोटी वाटी
    • चणाडाळ – 1 छोटी वाटी
    • मूगडाळ – 1 छोटी वाटी
    • उडदडाळ – 1 छोटी वाटी
    • चवळी डाळ – 1 छोटी वाटी (ऐच्छिक)
    • सुक्या लाल मिरच्या – 2 ते 3
    • खसखस – 1 छोटी वाटी
    • खोबरे – 1 छोटा तुकडा
    • आले – 1 इंच
    • धने – 1 छोटा चमचा
    • जिरे – 1 छोटा चमचा
    • लसूण – 6 ते 7 पाकळ्या
    • तमालपत्र – 1
    • दालचिनी – 1 तुकडा
    • तिखट – चवीनुसार
    • मीठ – चवीनुसार
    • गरम मसाला – 1 लहान चमचा
    • हळद – 1 लहान चमचा
    • कांदा – 1 (बारीक चिरलेला)
    • बारीक चिरलेली कोथिंबीर – मुठभर
    • तेल – फोडणीकरिता

    हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का?

    कृती

    1. सर्व डाळी एकत्रितपणे स्वच्छ धुऊन प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात.
    2. कढईमध्ये प्रथम अगदी थोड्या तेलावर कांदा, धणे, खोबरे, खसखस, जिरे, लाल सुक्या मिर्च्या परतून घ्याव्यात आणि मिश्रण थंड झाले की, मिक्सरमध्ये याची छान पेस्ट करून घ्यावी.
    3. आले आणि लसणाचीही पेस्ट करून घ्यावी.
    4. प्रेशर कुकरची वाफ गेल्यावर डाळी काढून घेऊन त्या व्यवस्थित घोटून घ्याव्यात.
    5. कढईत पळीभर तेल टाकून मोहरी, जिरे तडतडवून घ्यावे, थोडा हिंग टाकावा आणि त्यातच तमालपत्र तसेच दालचिनीचा तुकडा टाकावा.
    6. नंतर वाटलेला मसाला त्यात मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतावा.
    7. आले, लसणाची पेस्ट टाकून तीपण मसाल्यात छान परतून घ्यावी.
    8. त्यामध्ये एक चमचा हळद, दोन छोटे चमचे तिखट, एक चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकावे आणि थोडे पाणी टाकून मसाल्याचा सुगंध येऊ द्यावा.
    9. नंतर त्यामध्ये घोटलेल्या सर्व डाळींचे मिश्रण टाकावे आणि छान मिक्स करावे.
    10. पाणी टाकून हे मिसळीचे वरण आपल्याला पाहिजे तेवढे दाटसर किंवा पातळसर करावे आणि उकळू द्यावे.

    हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!

    टिप्स

    • या वरणासोबत भाकरी, लाल मिरचीचा ठेचा घ्यावा. भाकरीचा कुस्करा करावा त्यावर हे मिसळीचे गरमागरम वरण घ्यावे, वरून लसूण आणि लाल मिरचीचे तेल घ्यावे. हा कुस्करा मस्त कालवावा आणि सोबतीला कांदा, मुळा, मेथी घ्यावे.
    • लाल मिरचीचा ठेचा तोंडी लावण्यापुरता घेऊन या वरणाचा आस्वाद घ्यावा.
    • मधेच हे वरण सुपसारखे वाटीने प्यावे की, ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.
    • डाळीच्या मापाकरिता नैवेद्याची छोटी वाटी वापरावी.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn