Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रिय आज्जो… वडीलधाऱ्यांच्या प्रेमाला भुकेल्या रत्ना अन् विभा!
    ललित

    प्रिय आज्जो… वडीलधाऱ्यांच्या प्रेमाला भुकेल्या रत्ना अन् विभा!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 4, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, प्रिय आज्जो, विलासच्या बाबांचे दु:ख, विलासच्या बाबांचे एकटेपण, अनंताचं बाबांबद्दलचे प्रेम, विभाचे पितृसुख, रत्नाचे आजोबांशी स्नेहबंध, आजोबांचे रत्नावर प्रेंम,
    फोटोसौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रदीप केळुस्कर

    भाग – 1

    अनंताने विलासच्या घरासमोर स्कूटर उभी केली आणि जोराने हॉर्न वाजवला. त्याचा हॉर्न ऐकून आतून विलासने ‘आलो.. आलो..’ म्हणत ओ दिली. अनंताचे लक्ष गॅलरीकडे गेले, तेथे विलासचे बाबा उभे होते. त्याने बाबांना हात दाखवला… बाबांनी त्याला हात दाखवला.

    “ये आत ये… दोन मिनिटे गप्पा मारू…” बाबा म्हणाले.

    “नाही ओ… आधीच उशीर झालाय, रविवारी येतो…”

    “दोघेही या, वाट पहातो…”

    “हो येतो…”

    तेवढ्यात विलास आतून आला आणि त्याच्या स्कूटरवर मागे बसला. गाडी चालवता चालवता अनंता बोलू लागला…

    “बाबा गप्पा मारायला बोलवत होते.”

    “त्त्यांचा वेळ जात नाही. सरोज शाळेत गेली म्हणजे घरी कोणी नसतं. पूर्वी आई होती तेव्हा दोघांचा वेळ जायचा…”

    “मला रविवारी बोलावलंय गप्पा मारायला, विभाला पण बोलावलंय…”

    “रविवारी आम्ही नसणार घरी. सरोजच्या आईला भेटायला जायचं असतं…”

    “बाबा असले म्हणजे झालं. घर उघड असणार…”

    अनंताची स्कूटर बँकेकडे आली, तसे दोघे उतरले आणि बँकेत शिरले.

    रविवारी अनंत आणि विभा विलासच्या घरी आले. विलासच्या बाबांना आवडतात म्हणून विभाने उकडीचे मोदक सोबत घेतले.

    “ये ये… अनंता, बरे झाले विभाला सोबत आणलेस.”

    “हो. विलास आणि सरोज नाहीत वाटतं?”

    “अरे, ती दोघे सरोजच्या आईकडे गेली असावी बहुदा. म्हणजे मला सांगत नाहीत कुठे जातात ती, पण माझा अंदाज आपला…”

    हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध

    “पण तुम्हाला का सांगत नाहीत? घरातल्या माणसाला कळायला नको, कोण कुठे जातो ते?” विभा मधेच म्हणाली.

    “हे असंच असतं विभा… ते तरुण आहेत आणि मी म्हातारा, त्यात विधुर. दोन वेळ जेवण घालतात, त्याचे उपकार मानायचे. तसा मी आर्थिकदृष्टया त्यांच्यावर अवलंबून नाही. हेडमास्तर म्हणून निवृत्त झालो… हे घर मीच बांधलं आणि मला पेन्शन आहे… पण काय असतं, पैसे म्हणजे सर्व काही नव्हे. दोघेही नोकरी करतात. मुलगा आणि मुलगी म्हणजे माझी नातवंडे पुण्यात शिकतात. त्त्यांचा खर्च आणि इतरही खर्च वाढलेत. म्हणून नोकरी करायलाच हवी, असे त्यांचे म्हणणे. त्यामुळे घराकडे आणि माझ्याकडे दुर्लक्ष होतेच. मी या घरात असल्याने दोघांना एकदम कुठे जाता येत नाही दोनचार दिवसांसाठी… कारण, माझ्या एकट्यावर घर ठेवून जाता येत नाही. अशाच अनेक कारणांमुळे कायम चिडचिड होत असते सरोजची…”

    “अरे, हे मला माहीतच नव्हते. विलास भावोजी बोलले असते तर, मी म्हटले असते, बाबांना आमच्याकडे ठेवा निर्धास्थ… आणि जाऊन या कुठेही!”

    “हो, मलाही बोलला नाही विलास!”

    “पण आता तुम्ही विलास भावोजीना सांगा, तुम्हा दोघांना बाहेरगावी जायचे असेल तर, हवे तेवढे दिवस जा, बाबांना आमच्याकडे ठेवा. नाहीतरी मी नोकरी करत नाही, घरीच असते आणि आमची रत्ना, तिला कुणीतरी मोठे हवेच असतात.”

    “हो, मी सांगतो विलासला.”

    दीड तास बाबांशी विविध विषयांवर गप्पा मारून, त्याना मोदक खायला लावून, चहा घेऊन अनंत आणि विभा घरी आले… पण विभाचे मन विलास, सरोजच्या घरी होते… विलासचे बाबा किती प्रेमाने बोलत होते, पण त्या दोघांना त्त्यांची पर्वा नाही! खरेतर आपल्या घरी असे कोणी मोठे असते तर? संसारात प्रत्येक पावलावर अडचणी येतात, त्यावेळी कुणाला तरी विचारायचे, तर घरी कुणीतरी मोठे हवे ना! आपली आई आपण शाळेत असताना देवाघरी गेली. बाबा, माझ्या लग्नाच्या दुसऱ्या वर्षी… सासरी अनंताचे आईवडील पण नाहीत. तो पण पोरका. रत्नाला मोठी करताना पावलोपावली मोठ्या माणसाची आठवण येत राहिली… विलासच्या घरी त्याचे वडील आहेत, पण सरोजला त्त्यांची किंमत नाही…

    दुसऱ्याच दिवशी बँकेत जाताना अनंता विलासला म्हणाला, ‘विलास, तुम्हाला दोघांना कुठे बाहेरगावी जायचे असेल ना, त्यावेळी बाबांना आमच्या घरी ठेवायला हरकत नाही. आम्ही त्त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ.

    विलासला पण ते बरे वाटले, कारण त्या दोघांना राजस्थान ट्रिप करायची होती, पण बाबांमुळे ते शक्य होत नव्हते.

    पुढच्या महिन्यात विलास, सरोजने राजस्थान ट्रिप ठरवली आणि विलासचे बाबा अनंता-विभा यांच्या घरी आले. विलासचे बाबा आपल्या घरी आल्याने विभा खूश झालीच, पण त्त्यांची कॉलेजमध्ये जाणारी लेक रत्ना जास्त खूश झाली. तिने आपले आजी-आजोबां कधी पहिलेच नव्हते. त्यामुळे आजोबांच्या मांडीवर बसून गोष्ट ऐकण्याचा आनंद तिला कधी मिळालाच नव्हता… तिच्या मनात आले, आपले आजोबा असते तर, असे असते!

    अनंताच्या भाड्याच्या छोट्या बंगलीतील बाहेरील खोली विभाने बाबांना दिली. त्या खोलीतून बाहेर पडले की, त्त्यांचे छोटे गार्डन होते. या गार्डनमध्ये विभाने बरीच फुलझाडे लावली होती. ती छोटी बाग बघून बाबा खूश झाले. खोलीतच वॉशरूम आणि एक दार हॉलमध्ये उघडणारे. त्यांच्या खोलीला लागून रत्नाची खोली. हॉलच्या दुसऱ्या बाजूला अनंता, विभा यांची खोली आणि जोडून किचन…

    रत्ना इंग्लिश विषयात पदवीधर होत होती. त्यामुळे अनेक इंग्रजी आणि मराठी लेखक तिच्या लायब्रीत होते. विलासच्या बाबांनी इंग्लिश घेऊन एमए केलेले… त्यामुळे ही पुस्तके बघून ते खूश झाले. त्यांच्या मुलाच्या घरात असली पुस्तके नव्हती किंवा सरोजला पुस्तके विकत घेणे म्हणजे पैसे वाया घालवणे, असे वाटायचे.          

    घरात काही दिवसांकरिता आलेले आजोबांचा इंग्लिश, मराठी पुस्तकांचा व्यासंग मोठा आहे, हे कळताच रत्ना आजोबांशी अनेक पुस्तकाबंद्दल चर्चा करू लागली. साहित्याची आवड असलेली नात मिळाल्याने आजोबां प्रसन्न झाले.

    विभा ही मुळातच सुगरण… आई लवकर गेल्याने ती आजीच्या हाताखाली स्वयंपाक शिकली… अनेक पदार्थ करायला शिकली. नवीन नवीन पदार्थ करावेत आणि घरच्यांना खाऊ घालवेत, अशी तिची इच्छा. विलासचे बाबा म्हणजे जणू आपले वडीलच लेकीचा संसार बघायला आलेत, असे तिला वाटले. बाबांना त्त्यांचे आवडीचे पदार्थ करून घालण्यात तिला आनंद वाटू लागला.

    बाबांना मासे फार आवडतात, हे कळताच विभा एक दिवसआड मासे आणू लागली. तिचे माहेर सावंतवाडीचे, त्यामुळे सारस्वती पद्धतीने, भरपूर नारळ, तिरफळे घालून केलेली बांगड्याची किंवा पेडव्याची आमटी चाखताना बाबांना आपल्या आईची आठवण यायची. त्त्यांची पत्नी सांगलीची असल्याने तिला मासे तेवढे जमत नव्हते. पण विभाच्या हाताला चव होती… शिवाय सोलकढी रोजच असायची. सकाळी न्याहारीला काळ्या वाटण्याची उसळ, पुरी किंवा शिरवाळे असायचे. कधी उप्पीट.. कधी मोदक.. आठ दिवसांत बाबांनी अनेक पदार्थ खूप दिवसांनी खाल्ले.

    त्यांच्या सुनेला जेवण करण्याची फारशी आवड नव्हती. त्यात नोकरी… मुले शिकायला बाहेरगावी गेल्याने ती जेवण करायचा आळसच करायची.

    हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!

    अनंता सायंकाळी आला की, चौघांच्या गप्पा व्हायच्या. चहाचा दुसरा राऊंड आणि राजकारण, पुस्तके, रत्नाचा अभ्यास, खेळ असे अनेक विषय… सुट्टीच्या दिवशी अनंताने सर्वाना नाटकाला नेले. बाबांनी खूप दिवसांनी नाटक पाहिले.

    दहा दिवस संपले आणि विलास, सरोज ट्रिपवरुन परत आले. बँकेत विलास अनंताला भेटला तेव्हा म्हणाला,

    “अनंता, बाबा तुझ्याकडे बारा-तेरा दिवस राहिले ना, म्हणून आम्ही राजस्थानला जाऊ शकलो… विभाला त्रास झाला असेल…”

    “नाही रे… कसलाच त्रास नाही. एकतर बाबा कुणाला त्रास देत नाहीत आणि दुसरे म्हणजे विभाला, रत्नाला कुणीतरी मोठे आलेले आवडते. विभाची आई तिच्या लहानपणी गेली, बाबा पण गेले. माझे आईबाबा पण नाहीत, त्यामुळे तिला घरात कुणी वडीलधारे आलेले आवडते. रत्नाला पण आजी-आजोबां कधी दिसलेच नाहीत, त्यामुळे हे आजोबा घरात असल्याने ती पण खूश! उलट या तिघांचे खूप जमायचे.. आता बाबा परत गेले की, त्याना वाईट वाटणार.”

    “पण कधीतरी बाबांना त्यांच्या घरी यायलाच लागणार ना! ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, अशी म्हण आहे… बरं मी रविवारी येतो आणि बाबांना घेऊन जातो.”

    “बरं, ठीक आहे,” जड मनाने अनंता म्हणाला.

    क्रमश:


    मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026 ललित

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026 ललित

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाऊस असा रुणझुणता…

    By स्नेहा सुतारApril 18, 2026

    भाग – 10 अचानक आकाशात वीज काडाडली आणि जुईली भानावर आली. घाबरलीच ती… थरथरली… पाऊस…

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 271
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 388
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 561
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026
    Most Popular

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.