मागील तीन लेखांत आपण बालशाळेतील गणित शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. आता आपण टप्प्याटप्प्याने बालशाळेतील विज्ञान शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत. या लेखात आपण खेळगटातील विज्ञान शिक्षण याविषयी माहिती घेऊयात.
वास्तविक खेळगटातील मुलं एवढी लहान असतात की, या वयात त्यांना विज्ञान हा विषय काय शिकवणार, असा प्रश्न साहजिकच पडतो आणि हे खरंही आहे. या गटातील मुलांना खेळ, गाणी, गप्पागोष्टी याबरोबरच भाषा, गणित आणि हस्त व्यवसाय या विषयांची ओळख करून देण्यात येते.
खेळगटातील विज्ञान शिक्षण अभ्यासक्रम
विज्ञानासारखा विषय मुलांनी शिकणे अपेक्षित नाही. पण विज्ञान शिक्षणास उपयुक्त अशा काही संज्ञा मुलांना माहीत करून दिल्या जातात. तसेच मुलांना शरीरातील अवयवांची नावे सांगून ओळख करून दिली जाते.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण
विज्ञान उपयुक्त संज्ञा आणि पद्धती
संज्ञा सांगितल्यावर मुलांना समजण्यासाठी ते तोंडी भाषेत सांगितले जाते. उदाहरणार्थ, काही संज्ञा सांगता येतील.
1. जवळ – लांब
माझ्या जवळ ये
दोन मुलांनी एकमेकांपासून लांब उभे रहा.
2. खाली – वर
चेंडू टेबलावर ठेव.
बॅट खुर्चीखाली ठेव.
3. पुढे – मागे
दोन मुलांना उभे करून पहिला दुसर्याच्या पुढे आणि दुसरा पहिल्याच्या मागे असे समजावता येते.
4. आत – बाहेर
वर्गाच्या आत आणि वर्गाच्या बाहेर, हे कृतीतून दाखवता येते.
5. गार – गरम
माठातील गार पाणी.
गार बर्फ.
गरम दूध.
गरम पोळी.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील गणित शिक्षण
अवयव ज्ञान
- मुलांना शरीरातील अवयवांची नावे सांगून ओळख करून दिली जाते, जसे की डोके, हात, पाय, पोट इत्यादी.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, खेळगटातील विज्ञान शिक्षण म्हणजे शिशुगटातील मुलांच्या विज्ञान शिक्षणाचा पाया होय.
पुढील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


