मागील लेखात आपण शिशुगटातील गणित शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. आता आपण या लेखात बालगटातील गणित शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बालगटातील मुलांकडून चित्रे वस्तू मोजून 1 ते 10 अंक लिहिण्याचा सराव करून घेण्यात येतो.
बालगटातील गणित शिक्षण अभ्यासक्रम
बालगटात संपूर्ण वर्षभरात 1 ते 100 अंक ओळीने म्हणणे – लिहिणे, गाळलेले अंक ओळखून लिहिणे तसेच वस्तू मोजून लिहिणे हा अभ्यासक्रम असतो.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील गणित शिक्षण
अभ्यासक्रमातील विविध मुद्दे आणि पद्धती
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने पुढील मुद्दे आणि पद्धतींचा अवलंब करण्यात येतो.
- मुलांकडून 1 ते 100 अंक म्हणून तसेच लिहून घेणे म्हणजेच तोंडी आणि लेखी हे दोनही अभ्यास बरोबरीने घेतले जातात.
- पहिल्या सत्रात 1 ते 50 अंक आणि दुसर्या सत्रात 1 ते 100 अंक असा अभ्यास घेतात.
- मुलांना अंक तोंडी म्हणणे आणि तेव्हाच लिहिणे अशी सवय लावली जाते. यामुळे अंक म्हणणे, लिहिणे आणि वाचणे या तीन क्रिया अंकांचे मुलांच्या मेंदूत व्यवस्थित दृढिकरण करतात.
- तोंडी अंक म्हणण्यासाठी मुलांचे तीन-चार गट करतात. एकामागोमाग एक गटाकडून 1 ते 10, 11 ते 20 असे 100पर्यंत अंक म्हणण्याचा सराव केला जातो.
- शिक्षिकेने अंक ओळीने म्हणताना मधला अंक मुद्दामून गाळावा आणि मुलं ओळखतात का, याची नोंद ठेवावी.
- लेखी गणित शिकवताना, शिक्षिकेने फळ्यावर अंक लिहिताना अधले-मधले अंक गाळावेत आणि मुलांकडून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात. असा खेळ सुरुवातीला 1 ते 20 अंकांचा आणि नंतर टप्प्याटप्प्याने 100पर्यंत घ्यावा.
- अंकाएवढी चित्रे काढून, ती मोजून मुलांना अंक लिहिण्यास सांगणे, याचा देखील अंक दृढिकरणासाठी छान उपयोग होतो.
- मुलांना अंक सांगून बरोबर तेवढ्या वस्तू बाजूला काढण्यास शिकवले जाते.
- मुलांना एकत्र उभे करून एखादा अंक उदाहरणार्थ 4 / 7 / 10 असं सांगून त्यानुसार गट करण्यास सांगण्यात येते. अशा खेळांतून देखील अंक शिक्षण दृढिकरणास सहाय्य होते.
- अंक गणित शिक्षणासह बालगटातील मुलांना त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ अशा आकृती ओळखण्यास शिकवले जाते आणि यातूनच भूमिती शिक्षण आरंभ होते.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील गणित शिक्षण
थोडक्यात सांगायचे झाल्यास, बालगटातील अंक शिक्षण मुलांच्या प्राथमिक शाळेतील गणित शिक्षणाचा पाया दृढ करते.
पुढील लेखात आपण बालशाळेतील विज्ञान शिक्षण याबाबत जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9881943593 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


