Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 20, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी, उरलेल्या भाजीचे कटलेट्स, कोबीची भजी, रस्सा भाजी, रसभाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना गृहिणी आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टिप्स देत आहोत. पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स करताना या टिप्स वापरून पाहा.

    • वर्षभरासाठीच्या पापड-कुरडया करून आपण डब्यात भरून ठेवतो. शेवटी पापड, कुरडया संपल्यावर डब्यात चुरा शिल्लक राहतो. हा चुरा स्वच्छ करून थोड्या तेलात तळून घ्यावा. त्या चुऱ्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी बारीक चिरून टाका. चवीप्रमाणे मीठ, साखर, तिखट, जिरेपूड, शेंगदाण्याचे कूट टाकून एकजीव करावे. त्यानंतर त्यात अर्धे लिंबू पिळावे. ही आगळीवेगळी कोशिंबीर लहान मुले फार आवडीने खातील. शिवाय कच्च्या भाज्या खाण्यात येतात म्हणून ती पौष्टिकही असते.

    हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना…

    • हिरव्या कच्च्या केळ्यांची भाजी करताना साल काढून फोडी करेपर्यंत हात आणि भाजी दोन्हींना राप येतो. केळी काळी पडतात त्यामुळे भाजीचा रंग बदलतो. अशावेळी सोपा उपाय म्हणजे भाजीची केळी कुकरमध्ये प्रथम दहा मिनिटे वाफ देऊन घ्यावीत. नंतर थंड झाल्यावर सोलून बटाट्याप्रमाणे फोडी करून भाजी करावी. बटाट्याच्या भाजीप्रमाणेच पांढरी होते.
    • कुठलीही रसभाजी किंवा रस्सा भाजी करताना कांदा खरपूस परतणे आवश्यक असते. त्यासाठी खूप वेळ, गॅस, तेल खर्च होतो. त्यासाठी भरताच्या वांग्याप्रमाणे तेलाचा हात लावून अख्खा कांदाच गॅसवर अगदी काळा होईपर्यंत भाजावा. वापरायच्या वेळी वरचे टरफल काढून टाकायचे की, आत चांगला खरपूस भाजलेला कांदा मिळतो. तो लगेच वाटला जातो. त्यामुळे पदार्थाला आपोआप तेल सुटते आणि पदार्थाची चव अधिक रुचकर होते
    • फरसबी किंवा फ्लॉवर यांची आदल्या दिवशीची भाजी उरली असल्यास त्यात उकडलेले बटाटे, गाजर किसून आणि ब्रेडच्या स्लाइस, आलं-लसूण घालून चांगले मळणे. (लसणीची चटणी असल्यास) आलं-लसूण न घालता चटणी आयत्या वेळी घातली तरी चालेल. त्याचे गोळे रव्यावर थापून मस्तपैकी कटलेट बनवावे. मुलांच्या डब्यात तसेच जेवताना खावयास द्यावेत.

    हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स

    • कोबी अर्धा कापून शिल्लक ठेवला तर, तो थोडा खराब होतो. त्याऐवजी कोबीची आपणास हवी तेवढी पाने सुटी करून घ्या आणि जुळवून कापा. ही पद्धत सोपी पडते. उरलेला गड्डा आतला, जो अगदी कोवळा असतो तो कोशिंबीर, सलाड करायला अगदी छान असतो आणि अख्खा असल्याने निश्चितच बरेच दिवस टिकतो.
    • उन्हाळ्यामध्ये भाज्यांमध्ये नारळ घातलेला असेल, तर भाजी लवकर खराब होते. म्हणून भाजी फोडणीत टाकायच्या आधी नारळ फोडणीत टाकून परतावा आणि नंतर भाजी फोडणीला टाकावी.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn