लीना जोशी परुळेकर
मागच्या लेखात आपण काही घरगुती उपाय पाहिले, आता या लेखात सुद्धा आपण अजून काही घरगुती उपाय पाहू.
बदाम, खसखस, चंदन या साहित्यापासून बनवलेले mask हे पूर्वापार वापरले जातात. या mask चा उपयोग Whitening आणि Nourishing साठी जास्त होतो. बदाम हा तेल, दूध, पावडर, उगाळून या कुठल्याही प्रकारे Mask मध्ये वापरता येतो. बदाम, खसखस यांच्या वाटलेल्या मिश्रणात भरपूर तेल आणि प्रथिने असतात. तर, चंदनाचा लेप हा थंडाव्यासाठी वापरला जातो. या तिघांची पावडर समप्रमाणात घेऊन त्यात दूध / साय / मध / तूप हे घालून चेहऱ्याला लावावे. कोरडे झाले की, चेहरा धुवून टाकावा. चेहऱ्याची त्वचा तजेलदार होऊन मुलायम व्हायला मदत होते.
काही mask त्वचेला toning effect देतात. म्हणजेच हे mask चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचेचा सैलपणा थोडा कमी होऊन, त्वचा घट्ट आणि टवटवीत होते. ‘Melon’ या प्रकारामध्ये मोडणाऱ्या फळे आणि भाज्यांपासून हे Mask बनवता येतात. जसे की, काकडी, कलिंगड, खरबूज, एवढेच नव्हे, दूधी या फळांचे आणि भाज्यांचे रस किंवा गर चेहऱ्याला लावावेत. या रसांमध्ये किंवा गरांमध्ये काहीही दुसरे घालण्याची गरज नसते. हे रस किंवा गर चेहऱ्यावर लावल्यानंतर जसजसे वाळत जाईल, तसतशी त्वचा आकसत जाईल. हा mask घट्ट झाल्यावर धुवून टाकावा.
टॉमेटोचा गर किंवा रस चेहऱ्याला उजळपणा देण्यास मदत करतो.
जायफळाबरोबर दुधात किंवा लिंबाच्या रसात आंबेहळद उगाळून केलेला mask हा रक्तशुद्धी करणारा आहे. या mask मुळे चेहऱ्यावरील काळसरपणा (tan) किंवा डाग fade होण्यास मदत मिळते.
तांबडा मुळ्याचा रस आणि दही किंवा दह्याचे पाणी यांचे मिश्रण करून ते पाणी कापसाच्या बोळ्याच्या मदतीने चेहऱ्यावर लावले तर, चेहऱ्यावरचे मुरुमांचे डाग कमी होण्यास मदत मिळते. पण हा mask चेहऱ्यावर लावताना काळजी घ्यावी, कारण हा Mask अतिशय तीव्र असतो. Mask लावल्यावर जर चेहऱ्याची अतिशय आग झाली किंवा itching होऊ लागले तर, हा Mask त्वरित काढून टाकावा आणि चेहऱ्यावर बर्फ फिरवावा.
हेही वाचा – Skin Care : पारंपरिक घरगुती उपाय
आपण पूजेसाठी जे पंचामृत बनवतो, त्यातील सर्व पदार्थ, साखर सोडून, त्वचेला स्निग्धता देण्यासाठी आणि तिच्यातला ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात.
बटाट्याचा रस tan कमी करण्यासाठी उपयोगात येतो. अंड्याचा उपयोग करून सुद्धा Mask बनवता येतात. अंड्याचा पांढरा भाग हा तेलकट त्वचेसाठी चांगला तर पिवळ्या बलकामध्ये स्निग्धपणा असल्यामुळे कोरड्या त्वचेसाठी चांगला तर संपूर्ण अंड हे मिश्र त्वचेसाठी उत्तम.
केशर, हळद, गुलाब पाणी इत्यादीचा वापर आपण कुठल्याही Mask मध्ये करू शकतो.असे अनेक विविध Mask आपल्याला बनवता येतात. आजकाल online, Mask बनवायची विविध पद्धती आपल्याला सहज उपलब्ध असते. हल्ली कॉफीच्या मदतीने बनवायचे Mask, online बघायला मिळतात. Coffee मध्ये tan कमी करण्याची क्षमता आहे.
जेव्हा आपण घरगुती पारंपरिक mask वापरतो तेव्हा काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.
प्रत्येक व्यक्तिची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे एकच उत्पादन किंवा एकाच प्रकारचे ingredient दोन व्यक्तिच्या त्वचेवर वेगवेगळा परिणाम करू शकते. जरी आपण घरगुती ingredient चा वापर करणार असू तरी ते वापरल्यावरच आपल्याला कळणार आहे की, ते आपल्याला suit होत आहे की, नाही. Online दाखवल्या गेलेल्या सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवू नये. कित्येक वेळा उत्पादन किंवा घरगुती Mask वापरायच्या आधी आणि नंतर असे फोटो किंवा video टाकलेले असतात. खूप वेळा त्यात नंतरच्या फोटो किंवा video मध्ये आधीच्या फोटो किंवा video च्या तुलनेत प्रचंड तफावत असते. कुठलेही उत्पादन किंवा घरगुती ingredients च्या बनवलेल्या Mask मुळे एवढा drastic difference कधीच होत नाही. मुळात त्वचा गोरी दिसते आहे म्हणजे त्या उत्पादनाचा किंवा घरगुती ingredients चा एवढा परिणाम होत आहे, असे नसते. कित्येक वेळा आधी आणि नंतर हा फरक दाखवण्यासाठी विविध filters चा उपयोग केलेला असतो. Photo editing, video editing चा वापर करून हे बनवलेले असते.
हेही वाचा – Skin Care : मिश्र, संवेदनशील त्वचा आणि त्यावर वापरायची उत्पादने
थोडक्यात कुठलेही बाजारातले उत्पादन किंवा घरगुती ingredient आधी वापरून पहावे. ते आपल्या त्वचा प्रकाराला suit होत आहे की, नाही हे बघावे आणि मगच त्याचा continuous उपयोग करावा.
पुढच्या भागात आपण काही ingredients बद्दल माहिती घेऊ.
(क्रमश:)