माधुरी साने
पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचे मिश्रण. आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने पंचामृत बनवले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते तीर्थ म्हणून दिले जाते. आता आपण ढोबळी मिरचीचे पंचामृत कसे बनवले जाते, ते जाणून घेऊया.
साहित्य
- ढोबळी मिरच्या – 2 मध्यम आकाराच्या
- बटाटे – 2
- धणे – पाव वाटी
- जिरे – पाव वाटी
- लाल मिरच्या – 4 ते 5
- सुके खोबरे किस – अर्धी वाटी
- भिजवलेले शेंगदाणे – अर्धी वाटी
- भिजवलेले काजू – अर्धी वाटी
- दालचिनी – 1 इंच
- काळीमिरी – 4 ते 5
- लवंग – 2 ते 3
- मसाला वेलची – 2
- तीळ – पाव वाटी
- खसखस – 2 चमचे
- चिंचेचा कोळ – पाव वाटी
- शेंगदाण्याचे कुट – 4 चमचे
- गूळ – पाव वाटी
- तेल – फोडणीसाठी
- हिंग – 1 टी-स्पून
- बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
- मीठ – चवीनुसार
हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत
कृती
- ढोबळी मिरच्या मोठ्या आकारात कापून घेणे.
- बटाटे सोलून मोठ्या आकारात कापून घेणे.
- जिरे, धणे, खोबरे, काळीमिरी, दालचिनी, तीळ, लवंगा, मसाला वेलची, खसखस हे सर्व भाजून घ्यावे. (फार भाजू नयेत.)
- हे सर्व पदार्थ गार झाल्यावर त्यात मिरच्या टाकून वाटून घ्यावे.
- गॅसवर भांडे ठेऊन त्यात तेल टाकावे. तेल तापले की, हिंग टाकून त्यावर ढोबळी मिरच्या, बटाटे, भिजवलेले शेंगदाणे आणि काजू घालावेत. (त्याआधी दोहोंमधील पाणी काढून टाकावे.)
- नंतर त्यात 3 वाट्या गरम पाणी घालावे.
- ढोबळी मिरच्या आणि बटाटे जास्त शिजवू नयेत. अर्धे शिजले की, त्यात तयार केलेले वाटण आणि दाण्याचे कूट घालावे.
- चिंचेचा कोळ, गूळ व मिठ घालून एक वाफ येऊ द्यावी.
हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?
टीप्स
- पंचामृत तयार झाल्यावर वरून कोथिंबीर घालावी.
- आंबट-गोड चवीचे पंचामृत गरमगरम पोळी किंवा भाताबरोबर छान लागते.
एकूण कालावधी – 45 मिनिटे
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


