Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितगणेशोत्सवाचा उत्साह अन् वन-डे ट्रिप

गणेशोत्सवाचा उत्साह अन् वन-डे ट्रिप

मंदार अनंत पाटील

आई 18 जुले 2024 रोजी अखेर लंडनला आली. माझी 18 वर्षांची प्रतीक्षा संपली. ती येण्यापूर्वी लंडनदर्शनाचे नियोजनही केले होते. त्यानुसार स्वामी नारायण मंदिर, बकिंगहॅम पॅलेस, रॉयल म्युझियम, ग्रीन पार्क, लंडन आय, लंडन एक्वेरियम, लंडन ब्रीज अशा अनेक स्थळांना भेटी दिल्यावर सहजच मेडनहेड मत्स्यालयात जायचा योग आला. येथे घरातील मत्स्यालयासाठी लागणारे विविध सामान मिळते. तसेच येथे एक खूप मोठी पाण्याची टाकी आहे आणि कोय जातीचे मासे त्यात सोडले आहेत. आपण त्यांना खाणे टाकू शकतो. हे दुसरे मत्सालय होते.

आता गणपती आणि श्रावण मासाचे वेध लागले होते. आई येताना जिवतीचा कागद घेऊन आली होती. सोबत सत्यनारायणाची पूजा-पोथीही आणली होती. आपल्याकडे पहिल्यांदाच श्रावणातील व्रतवैकल्याबरोबरच पूजा होणार म्हणून मी आणि पल्लवी खूप आनंदीत झालो. श्रावणातील सणवार आणि सत्यनारायणाची पूजा यथावकाश आणि साग्रसंगीत पार पडले. पल्लवीने खूप उत्तम आयोजन केले होते आणि नैवेद्यदेखील!. एवढेच नव्हे तर, एका शनिवारी जाऊन गणपतीची मूर्तीही ठरवून आली होती.

गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू होती. या धामधूमीतच एक दिवसाची सहल ठरवली होती… जगप्रसिद्ध असा विंडसर कॅसल, रोमन बाथ आणि स्टोनहेंज. बसने सकाळी जाऊन संध्याकाळी परत… असा बेत होता. तिकिटं आधीच काढून ठेवली होती, जेणेकरून कुठलीही धावपळ होणार नाही. पूर्ण दिवसाची सहल असल्यामुळे पल्लवीने बराच खाऊ सोबत दिला होता.

पहिला स्टॉप हा विंडसर कॅसल होता. इसवी सन 1100 साली बांधलेला आणि विस्तृत परिसरात उभा असलेला हा दिमाखदार भव्य राजवाडा पाहून मन भरून आले. त्याचे उंच बुरूज इंग्लंडच्या उद्दाम आणि हुकुमशाहीची साक्ष देत होते. कुठेतरी मनात आतून आवाज येत होता की, कितीतरी निष्पाप लोकांचे जीव घेऊन ही रक्तरंजित इतिहास असलेली वास्तू उभारण्यात आली आहे. साधारणपणे अडीच तासांचाच अवधी असल्यामुळे ठराविक दालने आणि राणी एलिझाबेथ तसेच इतर रॉयल मेंबर्सची दफनभूमी बघून पुढच्या टूरला निघालो.

यथावकाश रोमन बाथला पोहोचलो. हा एक मानवनिर्मित गरम पाण्याचे झरे असलेला हा परिसर आहे. येथे रोमन काळातील बांधकामाचा वारसा जतन करून ठेवला आहे. येथील पाणी अगदी कडाक्याच्या थंडीत देखील गरम असते. येथे साधारणत: तासभर भटकंती केल्यावर, मग थोडी पोटपूजा केली. मग स्टोनहेंज (जे यूनिस्कोने हेरिटेज महणून घोषित केले आहे) तिथे पोहोचलो. जवळपास पाच ते दहा मिनिटाचा बस (शटल) प्रवास केल्यावर त्या स्थळी जाता येते. तिथे विशाल दगड एकमेकांवर कमानीप्रमाणे रचून ठेवल्यासारखे दिसतात. येथेही साधारण तासभर भटकंती केल्यानंतर माघारी परतलो. आतापर्यंत बरेचशी पर्यटनस्थळं पाहून झाली होती. आई सुद्धा प्रवासवर्णन लिहून ठेवत होती आणि माणिक ताईला पाठवत होती.

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!