Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, March 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वो भी क्या दिन थे…
    अवांतर

    वो भी क्या दिन थे…

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरMarch 29, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, बालपणाच्या आठवणी, वाशिमच्या आठवणी, शाळेच्या सुखद आठवणी, मोबाइलविना आयुष्य, शालेय जीवनाच्या आठवणी, शाळेतील यश,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    विदर्भामध्ये वाशिम या छोट्या गावात आम्ही राहात होतो. आमचं बालपण तिकडेच गेलं. पाचवी ते 11वी म्हणजे मॅट्रिकपर्यंत सरकारी शाळेत शिक्षण झाले. त्यावेळी शाळेची फी, माझ्या आठवणीप्रमाणे, 13 आणे होती. शाळा घरापासून बऱ्यापैकी लांब होती. शाळेत चालत जायचे आणि चालत परत यायचे. सायकल, रिक्षा हे त्यावेळी आटोक्याबाहेरचे होते. स्कूल व्हॅन हा प्रकार तर तेव्हा अस्तित्वातच नव्हता!

    शाळेत जाण्याकरिता दोन हाफ पॅन्ट आणि दोन बुशशर्ट… आणि इतर वेळी वापरण्याकरिता एक जास्तीची हाफ पॅन्ट आणि शर्ट एवढेच कपडे असायचे. बूट मोजे हा प्रकार देखील आमच्या ऑटोक्यामधला नव्हता. पायात साधी चप्पल असायची. पण यामध्येच आम्ही मस्त असायचो आणि एन्जॉय करायचो… घराच्या आसपास राहणारे मित्र देखील असेच आमच्याप्रमाणे मस्त एन्जॉय करायचे!

    घरी कोणी पाहुणे आले तर जाताना ते खाऊ करता म्हणून चार आणे (म्हणजेच 25 पैसे) द्यायचे. ते मी जपून ठेवायचो आणि भाऊबीजेकरिता त्याच पैशांमधून मामे बहिणीसाठी छोटं खेळणं घेऊन यायचो.

    हेही वाचा – फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!

    तेव्हा टीव्ही नव्हता, मोबाइल नव्हता… आपापसांमध्ये संवाद असायचे, विनोद असायचे, फिरक्या घेणे असायचे आणि त्यामध्ये एक वेगळीच मजा असायची आनंद असायचा… अशा खूप मजेशीर आठवणी आहेत. खरा आनंद घरच्या सगळ्यांशी छान संवाद, योग्य शिस्त, घरचे जेवण, महिन्यात एखादा घरी केलेला गोड पदार्थ असायचा. 1965 मध्ये मॅट्रिकला मी पूर्ण शाळेतून पहिला आलो होतो, म्हणून आईने मला हेन्री सँडॉजचं घड्याळ मला बक्षीस दिलं होतं.

    वो भी क्या दिन थे… असं वाटतं अधून मधून त्या भूतकाळातून एक मस्त फेरफटका मारून यावा आणि तो आनंद पुन्हा पुन्हा घ्यावा.

    हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    March 27, 2026 अवांतर

    घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…

    March 27, 2026 अवांतर

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 27, 2026

    यावर्षी नागपूरच्या रेशीमबाग येथे भरलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ या प्रदर्शनात जाण्याचा योग तीन वर्षांनी आला. तीन…

    घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…

    March 27, 2026

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    March 29, 2026

    Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…

    March 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 251
    • अवांतर 178
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 366
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 518
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn