Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितमुंबई माझी लाडकी

मुंबई माझी लाडकी

सुहास गोखले

(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)

मी अगदी 1960च्या दशकापासून मुंबईत फिरतो आहे. त्याकाळी मुंबईत गर्दी फार कमी होती. दर रविवारी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी लांब दांड्याच्या ब्रशनी रस्ते धुवायचे. 1975 ते 1978 या काळात कॉलेजला असताना मुंबईचे वेगळे रूप पाहिले. 1988 ते 2015 या कालावधीत मुंबईत विविध पोलीस ठाण्यांत आणि क्राइम ब्रँच, अंमलीपदार्थ विरोधी कक्षातही काम केले आणि मुंबई नेहमीच fascinating वाटली.

हेही वाचा – …आणि पोलीस दलात जाण्याचा निश्चय केला!

मुंबईचे वैशिष्ट्य म्हणजे या 603.4 किमी क्षेत्रफळात, एक नाही तर अनेक मुंबई वसलेल्या आहेत. एक नोकरदारांची मुंबई, एक बिझनेसमेनची मुंबई, एक गँगस्टरची मुंबई, एक कोट्यधीशांची मुंबई, एक राजकारण्यांची मुंबई, एक चित्रपट कलाकारांची मुंबई, एक झोपडपट्टीवाल्यांची, एक भिकाऱ्यांची, एक वारांगनांची, एक बारबालांची, एक गर्दुल्यांची… अशी अनेक शहरे या एकाच क्षेत्रफळात वसलेली आहेत. यातल्या कोणत्याही एका मुंबईचा दुसऱ्या मुंबईशी संबंध नसतो.

1992-93मध्ये जेव्हा सामान्य मुंबई जळत होती, तेव्हा मलबार हिल, पाली हिलवासीयांना काहीच फरक पडलेला नव्हता. गंमत म्हणजे, एकच व्यक्ती या सर्व मुंबईतून सारख्याच निर्वेधपणे फिरत असते, ती व्यक्ती म्हणजे मुंबई पोलीस.

म्हणूनच मी पोलीस सेवेच्या आकंठ प्रेमात बुडालेलो आहे…

पोलीस दलातील सेवा हा धर्मच झाला

नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी जातीय दंगलीत मारला गेला. गटारात पत्र्याखाली लपवलेल्या त्याच्या देहावर डोक्यापासून कमरेपर्यंत 36 घाव होते. भावाचे अंत्यसंस्कार 20 मे 1984 रोजी झाले आणि 2 नोव्हेंबर 1984 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. केवळ पाच महिने हातात असल्याने दु:ख बाजूला ठेवून मी तयारीला लागलो आणि 31 ऑक्टोबर 1984ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. राष्ट्रीय दुखवटा, शीखविरोधी दंगल अशा अस्थिर वातावरणातच एमपीएससीच्या परीक्षेला बसलो. परीक्षेनंतर निकालाच्या प्रतीक्षेचा कालावधी अक्षरश: प्राण कंठाशी आणणारा वाटत होता आणि अखेर निकाल जाहीर झाला… महाराष्ट्रात 25व्या आणि नासिक जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने मी उत्तीर्ण झालो होतो.

मायक्रोबॉयॉलॉजीची पार्श्वभूमी असलेला अन् माझे प्राणप्रिय छंद विसरून, मी खाकी युनिफॉर्म परिधान केला आणि लोकांच्या सेवेसाठी  पोलीस दलात प्रवेश केला… पुढची 30 वर्षं ती नोकरी न रहाता, माझा धर्मच झाला.

हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!