Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितआईची लंडनवारी!

आईची लंडनवारी!

मंदार अनंत पाटील

मी अगदी गेली 18 वर्षं या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण आणि नंतरचे तीन महिने, त्यात साठवलेले अविस्मरणीय क्षण… शब्दांकित करायचा हा एक प्रयत्न!

भाग – 1

मनघरणी

साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? आणि आकाशाला गवसणी घातल्याचा भास झाला. कारण काही वर्षांपूर्वीच हा प्रश्न विचारणे मीच बंद केले होते. त्यामागे बरीच कारणे होती आणि मुख्य कारण मोठ्या वहिनींचे आजारपण आणि आईने तिची केलेली सुश्रुषा आणि देखभाल, हेच होते. दुर्दैव असे की, मोठया वहिनीला 2023च्या नोव्हेंबर महिन्यात देवाज्ञा झाली. यानंतर साधारण 2024च्या फेब्रुवारी महिन्यात भारत भेटीचा योग आला. थोडंसं दडपणच आले होते विचारताना की, लंडन ट्रिपला कधी येशील? पण लगेचच उत्तर आले की, आला आहेस तर माझा व्हिसा करूनच जा…

लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन पटापट सगळी कागदपत्रं जमवली आणि धावतच यूके ऐंबसी गाठली आणि आईला कुठलाच त्रास होऊ नये म्हणून अगदी उत्तम अशी अपॅाइंटमेंट मिळवली आणि स्वत: तिला घेऊन गेलो. अगदी लगेचच सगळे एप्लिकेशन प्रोसेस झाले आणि आठ दिवसांत घरपोच व्हिसा आला. तिथेच शिक्कामोर्तब झाले की, आता लंडनवारी नक्की !

पण अजून दिल्ली दूरच होती… कारण कधी यायचे, किती दिवस मुक्काम करायचा हे अजूनही नक्की होत नव्हते, कारण अजूनही मनाची तयारी होत नाही, असंच जाणवत होते. पहिल्यांदा तर मी फक्त 15 दिवसच येईन, त्यापेक्षा जास्त जमणार नाही, असे निक्षून सांगितले गेले आणि माझा चांगलाच हिरमोड झाला. तेव्हा जरा जास्तच चिडचिड झाली आणि मग रागाच्या भरात बडबडलो की, इतकंच असेल तर व्हिडीओ फोनवरच लंडन आणि घर दाखवितो म्हणजे इथे यायचा प्रवास आणि वेळ वाचेल… इथे पल्लवीचा संयम आणि प्रकरण हाताळायची कला उपयोगास आली. तिने फोन करून आईला माझ्या मनाची खरी परिस्थिती सांगितली आणि आईची अस्वस्थता समज़ून घेतली. तिला असलेली धाकधूक नेमकी पल्लवीला समजली की, इतका लांबचा विमान प्रवास तो पण एकट्याने करायचा? त्यात भाषेचा प्रश्न, सामान, हवामानातील बदल आणि वय (81 वर्ष)!

मग लगेच विचारमंथन सुरू केले मी आणि पल्लवीने… पहिला पर्याय होता की, मी किंवा पल्लवीने जाऊन आईला घेऊन यायचे, पण तो नीट नाही जमला… कारण वार्षिक सुट्टी संपली होती आणि आई येणार म्हणून थोडी सुट्टीसाठी (यूके भ्रमण) ठेवायची होती.

दुसरा पर्याय असा होता की, एअर लाइन्सकडून स्पेशल एरेंजमेट करून घ्यायची, पण तोही विचार बारगळला. कारण, व्हीलचेअरचीच सोय होत होती, पण प्रवास एकटीलाच करावा लागणार होता.

तिसरा पर्याय असा होता की, ओळखीच्या व्यक्तीबरोबर प्रवास करायचा… इथे एक मित्र मंदार झुंझारराव जो अगदी रेग्युलर लंडनला येतो त्याला विचारले, पण त्याचे येणे त्याच्या कंपनी कामावर अवलंबून होते आणि अगदी एक-दोन दिवसांत येणे होणार किंवा काही महिने पण प्रलंबित होणार होते… इकडे धाकधूक वाढतच होती आणि व्हिसा येऊन देखील दोन महिने उलटले होते. पण म्हणतात ना ‘देर आये दुरुस्त आये…’ आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश बापट आणि मिसेस अश्विनी बापट यांची लंडन ट्रिप ठरली आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला. कारण, आई अगदी घरच्या लोकांबरोबर अगदी डोअर टू डोअर येणार होती. मग क्षणाचाही विलंब न करता तिचे विमानाचे तिकीट बुक केले आणि मग सुरू झाले लंडन ट्रिप चे प्लॅनिंग…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!