लीना जोशी परुळेकर
मेकअप (Make-up) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. आपण रोजच्या रोज पूर्ण Make-up नाही केला तरी, lipstick चा वापर नक्कीच करतो. Make up मुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. व्यक्तिमत्व अधिक खुलते. सणासुदीला, लग्नकार्यात साग्रसंगीत केलेला Make – Up सौंदर्य अधिक खुलवतो.
आजकाल Online Portal वर कित्येक make-up tutorial आढळतात. त्यात आपल्याला उत्तमोत्तम Make up उत्पादनांची माहिती प्रात्यक्षिकाबरोबर बघायला मिळते. Make-up ही एक कला आहे, त्यामुळे ती जमण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना सरावाची गरज असते.
Make-up करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काही basic गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जसे की, चेहऱ्याचा आकार, त्वचेचा रंग, कुठल्या कारणासाठी तसेच कुठल्या वेळवर Make up हवा आहे इत्यादी.
आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगवेगळा असतो. जागतिक स्तरावर चेहऱ्याचा ‘अंडाकृती आकार’ हा आदर्श आकार मानला जातो. त्यामुळे जाहिरातींमध्ये असणाऱ्या models, Fashion show मध्ये असणाऱ्या models, नट्या यांना अशा प्रकारे make – up केलेला असतो की, त्यांचे चेहरे अंडाकृती असल्याचा आभास निर्माण होईल.
हेही वाचा – Skin Care : पारंपरिक घरगुती उपाय
आपल्या रोजच्या जीवनात आपण एवढा make-up करत नाही. आपण जो make-up करतो तो Basic Make असतो.
Make – up करायच्या काही पायऱ्या आहेत त्या अशा –
- Cleansing
- Moisturizing
- Primer
- Concealer
- Foundation
- Powder
- Blush, Bronzer आणि Highlighter
- Eye make-up – Eye Shadow, Eyeliner, Mascara
- Lip liner, lipstick
- Setting Spray
हेही वाचा – Skin Care : त्वचेचा ओलसरपणा टिकवणारे ‘पंचामृत’
आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ.
- Cleansing : चेहरा cleanser ने स्वच्छ झाला पाहिजे. ज्यामुळे चेहऱ्यावरची धूळ स्वच्छ झाली, excess oil कमी झाले की, चेहरा make-up साठी तयार होतो.
- Moisturizing : Moisturizer मुळे चेहऱ्याची त्वचा Hydrate रहाते आणि make-up मुळे चेहऱ्याला कोरडेपणा येणे टळू शकते.
- Primer : Primer चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्याची त्वचा smooth होते आणि Make-up साठी एक प्रकारचा base तयार होतो. Make-up चेहऱ्यावर छान बसतो.
- Concealer: हे डोळ्याखालची काळी वर्तुळे, Pigmentation, मुरुमांचे डाग, त्वचेचा uneven रंग इत्यादी झाकण्यासाठी वापरले जाते.
- Foundation : यामुळे त्वचा एकसारखी दिसते आणि पुढील Make – Up साठी त्वचा तयार होते.
- Powder : Powder ही Foundation च्या shade ची वापरली जाते. त्यामुळे concealer आणि foundation Set व्हायला मदत मिळते.
- Blush : हे Cheekbone पासून temporal bone (डोळ्यांच्या बाजूला) पर्यंत लावले जाते, जे नैसर्गिक लालीचा effect देते.
- Bronzer आणि Highlighter हे सामान्यतः cheekbone, नाक, कपाळ अशा ठिकाणी वापरले जातात. थोडक्यात, चेहऱ्यावर ऊन पडल्यावर, चेहऱ्याच्या ज्या भागावर सर्वात आधी ऊन पडेल ते भाग… जे भाग चेहऱ्यावर थोडे पुढे आलेले असतात.
- Eye Make-up : यात सर्वप्रथम Eye Shadow ही पापण्यांवर लावली जाते. मग Eyeliner हे पापण्यांचे वरचे केस असतात त्याला लागून तसेच, पापण्यांच्या खालचे केस असतात त्याला लागून लावतात. ज्यामुळे डोळ्याचा आकार उठून दिसण्यास मदत मिळते. नंतर Mascara हा पापण्यांच्या वरच्या आणि खालच्या केसांना लावला जातो. ज्यामुळे पापण्यांचे केस लांब आणि भरीव दिसतात.
- Lip liner : हे ओठांच्या कडांना लावले जाते ज्यामुळे ओठांचा आकार उठून दिसतो.
- Lipstick : Lipstick मुळे ओठ भरीव वाटून, Make-up पूर्ण दिसतो.
- Setting spray : यामुळे make-up fade न होता जास्त वेळ टिकून राहातो.
पुढच्या भागात आपण make-up बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
क्रमश: