Thursday, July 31, 2025

banner 468x60

नजर

कविता पाटील

अचानक कानावर आलेला हसण्याचा आवाज तिला वेगळाच वाटला. मान उचलून तिने सहज वर पाहिले असता, वय वर्षं 50 असलेला तो पुरुष चक्क लाजत हसत होता. त्याक्षणी त्याच्या डोळ्यामध्ये असलेली चमक ओळखीची वाटत होती. काहीसे बावरून, गोंधळून तिने शेजारी पाहिले तर 30-32 वर्षांची ती तरुणी त्या पुरुषाकडे टक लावून पाहात असल्याचे तिला दिसले. त्या दोघींची नजरानजर होताच, त्या तरुणीचा चेहरा उतरला. तिच्या आतून एक अनामिक भीतीची लहर वेगाने दौडत गेली. खूप अस्वस्थ वाटू लागले. थरथरत्या हाताने तिने पर्समधून पाणी काढून दोन घोट घेतले. विचारायचे म्हणून त्या दोघांना तिने पाणी पिणार का? असे विचारले. पण प्रश्नात जशी औपचारिकता होती तशी त्या दोघांच्या नाही म्हणण्यातही होती. काही तरी असे त्या क्षणामध्ये त्या दोघांमध्ये घडले होते की, त्याने अचानक तिला स्वतःची उपस्थिती खटकू लागली. अचानक असे अवघडलेपण वाटू लागले.

तिने स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की, सहज होतं ते! सगळं एवढं मनाला लावून घेण्याची गरज नाही. पण मग तिच्याशी नजरानजर होताच त्या दोघांचा चेहरा का उतरला होता? विचारांचे चक्र सुरू असतानाच तिला त्याच्या नजरेतील चमक आठवली, ही चमक केव्हा पहिली होती? अरे, याच नजरेच्या, हसताना लाजण्याच्या त्याच्या अदेवर तर ती फिदा झाली होती आणि त्याच्या प्रेमात पडली होती! मग नंतर हळूहळू कळत गेलं होत की ते फक्त आपल्यासाठीच नव्हतं. वेगवेगळे संदर्भ तिच्या मनात फेर धरू लागले आणि तिला हलकेच हसू आले. अरे, यात नवीन काहीच नाही. नवी ओळख, नवी दोस्ती आणि तेच प्रत्येक वेळा नव्याने हसून लाजणे. काही काळ, निदान नव्याने कुणी भेटत नाही तोवर आता हे असंच चालणार. आता एव्हाना आपल्याला या गोष्टीचा सराव व्हायला हवा होता. स्वतःशीच हसत ती फोन येत असल्याचा बहाणा करत तिथून उठली आणि दूर जात मावळत्या सूर्याकडे पाहत ती मुलांना फोन लावू लागली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!