Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललिततेरे बिना जिया जाए ना…!

तेरे बिना जिया जाए ना…!

मयुरेश गोखले

नवरा ऑफिसला गेल्यावर ती घरची कामं करत होती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि रेडिओवर गाणं लागलं होतं, “तेरे बिना जिया जाए ना, बिन तेरे… तेरे बिन साजना, साँस में साँस आए ना…”

पावसामुळे वातावरण धुंद झालं होतं आणि बायकोची अवस्था त्या गाण्यासारखीच झाली होती. तेरे बिना जिया जाए ना… गॅलरीत येऊन तिने पावसाचे थेंब अंगावर झेलले. समोरच्या झाडाच्या हिरव्यागार पानांवरून पाण्याचे थेंब ओघळत होते… ती त्या थेंबांकडे पाहात बसली. त्या पानासारखे तिचे मनही ओले चिंब झाले होते… नवऱ्याची प्रचंड डोंगराएवढी आठवण तिला येत होती…. तेवढ्यात एक थंड वाऱ्याची झुळूक आली आणि तिने दीर्घ श्वास घेतला. या श्वासातही त्याचा सुगंध दरवळत होता आणि रेडिओवर गाण्याचं कडवं सुरू होतं –

जब भी खयालों में तू आए,

मेरे बदन से खुश्बू आए…

बायकोने आतल्या खोलीत जाऊन मोबाइल घेतला आणि त्याला कॉल केला. रिंग वाजली, पण त्याने फोन उचलला नाही. ती हिरमुसली आणि घरची काम परत सुरू केली.

हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…

संध्याकाळी तो घरी आला. जरा थकलेला होता. फ्रेश झाल्यावर तो मोबाइल बघत बसला, तेव्हा त्याला मोबाइलवर तिचा कॉल दिसला… तिच्या अबोल्याचे कारण नवऱ्याला समजले होते! आज त्याने एक मेसेजही तिला केला नव्हता. सकाळी तिचं डोकं दुखत होतं, हे त्याला आठवलं. कामाच्या गडबडीत तो सगळं विसरला होता. त्याने लगेच मोबाइल बाजूला ठेवला आणि बायकोला विचारलं, “कसं वाटतंय आता? डोकं थांबलंय का?” तिने मान हलवून ‘हो’ उत्तर दिले.

बाहेर छान पाऊस पडत होता. दोघंही बाहेर फिरायला निघाले. त्याला रस्त्यात एक कणसाची गाडी दिसली. बायकोला भाजलेलं कणीस पावसात खायला खूप आवडतं, हे त्याला माहीत होतं. त्याने लगेच कार थांबवली आणि कणीस घेतलं. आपली आवड नवऱ्याने ओळ्खल्याने ती सुखावली. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. दोघंही बराच वेळ पावसाचा आनंद घेत बोलत बसले.

हेही वाचा – श्वास तुझा मालकंस…

दुसऱ्या दिवशीही पाऊस थांबला नव्हता. त्याने ऑफिसला दांडी मारली. दोघेही घरीच होते. वाफाळलेला कडक चहा घेत पावसाकडे बघत निवांत बोलत होते आणि रेडिओवर कालचंच गाणं लागलं होतं, ओळी होत्या –

रेशमी रातें रोज ना होंगी,

ये सौगातें रोज ना होंगी,

जिंदगी तुझ बिन रास न आए

तेरे बिना जिया जाए ना…


मोबाइल – 9423100151


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!