Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!
    ललित

    फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 2, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, फॅशनची हुडहुडी, फॅशनचा अतिरेक, अंगप्रदर्शनाची फॅशन, आईची हौस, मुलीचे कपडे, तोकडे कपडे, लग्नसराईतील दिखावा,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुधीर करंदीकर

    गेल्या आठवड्यात प्रभात रोडला बायकोच्या दातांचं दुखणं दाखवायला डेंटिस्टकडे जात होतो. सकाळचे 9-9.30 वाजले असतील. हिवाळा असल्यामुळे, चांगलीच थंडी होती. स्कूटरवर जायचं, म्हणून आम्ही स्कार्फ – स्वेटर अशा तयारीनीच निघालो होतो. सध्या रस्त्यावर ट्रॅफिक इतके फास्ट असते की, बाजूने कोण जातोय, समोरने कोण येतोय, हे बघताच येत नाही आणि बायको मागे बसलेली असेल, तर ‘काही बघण्यासारखं असलं, तरी ते  बघता येत नाही’ किंवा ‘मी काहीच बघत नाही’, असंच दाखवावं लागतं.

    लाल सिग्नल लागल्यामुळे ट्रॅफिक स्लो झालं. एक बाइक थांबली अन् मी पण बाजूलाच थांबलो. बाइकवरील माणसाच्या समोर त्यांचा मुलगा बसला होता. तो कपड्यांमध्ये पूर्ण पॅक होता. फुल पॅन्ट, अंगात स्वेटर, डोक्यावर कॅप वगैरे… त्या माणसाला उपदेश करण्यात काहीच पॉइंट नव्हता… आणि तसंही म्हणतातच की, सीनिअर सिटीझन झाल्यानंतर कुणालाही उपदेश करू नये. एकतर उपदेश ऐकायला कुणाला वेळ नसतो, उपदेश ऐकण्याच्या कुणी मनस्थितीत नसतो आणि तिसरं म्हणजे, देणाऱ्याचा उपदेश आऊटडेटेड पण असू शकतो. अगदीच राहावत नसेल, तर फक्त स्वतःला उपदेश करावा, किंवा तो डायरीमध्ये लिहावा!

    हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…

    पुढे लॉ कॉलेज रोडला सिग्नलजवळ माझ्यासमोर एक मोटरसायकल होती. मागच्या सीटवर दोन्हीकडे पाय टाकून, साधारण चार-पाच वर्षांची छोटी मुलगी बसली होती, आणि थंडीमुळे ती चक्क कुडकुडत होती. गाडी चालवणारी व्यक्ती बहुदा तिचे वडील असावेत. त्यांनी व्यवस्थित कोट घातला होता. कारण बाईक आणि थंडी… म्हणजे कोट पाहिजेच. कोटाची उब घेण्याकरता मागे बसलेली छोटी मुलगी त्यांना बिलगून बसायचा प्रयत्न करत होती. पण वडिलांच्या पोटाचा घेर बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे, तिला ते जमत नव्हते आणि त्यामुळे तिला ऊब घेता येत नव्हती. आपोआपच माझं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं. बघितलं तर, तिच्या अंगात फॅशनेबल असा अगदी पातळ कापडाचा फ्रॉक होता. मध्यंतरी स्लीव्ह-लेसची फॅशन होती आणि आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे शोल्डरलेसची फॅशन आहे. तसाच काहीसा शोल्डरलेस आणि नो बॅकचा तिचा फ्रॉक होता. थंडी असूनही पायात सलवार किंवा फुलपॅन्ट नव्हती, पाय उघडेच होते. पायात मात्र फ्रॉकला मॅचिंग बूट आणि मोजे होते. साहजिकच नवल वाटलं की, एवढ्या थंडीत असे कपडे का घातले असावेत? बिचारीला थंडीमुळे हुडहुडी भरली होती. एक उत्सुकता म्हणून, मी ही शंका मागे बसलेल्या बायकोला विचारली.

    बायकोकडून स्टॅंडर्ड उत्तर आलं, “तिचे वडील आहेत ना बरोबर! तुम्ही समोर बघून आपली गाडी चालवा… कालच आपण पेपरमध्ये वाचलं, अपघात टाळायचे असतील तर, एका वेळेस एकच काम करा, गाडी चालवत असाल, तर इकडे तिकडे स्वैर पाहू नका… गाडी चालवत असाल, तर मोबाइलवर बोलू नका… आणि मोबाइलवर बोलत असाल, तर त्यावेळेस गाडी चालवू नका… आणि याउपर तुम्हाला बघायचंच असेल, तर इथे कोपऱ्या-कोपऱ्यावर छोटी छोटी मंदिरे आहेत, ती बघा!”

    मी सवयीप्रमाणे “थँक यू” म्हणालो.

    थिअरी कितीही छान असली, तरी, “दिल है के मानता नहीं”, असे प्रत्येकाचेच होते. विचार केला, की, सेफ्टीबद्दल तरी त्यांना सांगायलाच पाहिजे, अनायसे त्यांची गाडी शेजारीच होती.

    मी : दादा, मागे मुलीला नीट धरता येत नाहीये, मधून मधून मागे लक्ष ठेवा.

    त्यांनी ‘हो, हो’ म्हणत मान माझ्याकडे वळवली आणि लक्षात आलं की, हा तर मित्राचा मुलगा! त्याने पण मला ओळखलं आणि नमस्कार केला. माझ्यामधलं उपदेशाचं मशीन आपोआपच सुरू झालं.

    मी : अरे, ती थंडीने कुडकुडतेय. स्वेटर विसरला का आणायला? आणि पायात पण काही नाही.

    मुलीचे वडील : काका, स्वेटर कसा विसरेन? बाबा पण मागे लागले होते, तिला स्वेटर घाल म्हणून. पण बायकांना पटलं पाहिजे ना! त्यांच्या फॅशनमध्ये स्वेटर बसत नाही. एका लग्नाला चाललोय. बायको पाहुण्यांबरोबर रिक्षाने येतेय. लग्नात सगळे मुलीच्या ड्रेसचे कौतुक करतील… म्हणजेच बायकोच्या सिलेक्शनचं कौतुक होईल. ड्रेस कुठे घेतला? कधी घेतला? केवढ्याचा आहे?  हिला खूपच गोड दिसतोय! तुझ्या साडीला अगदी मॅच होतोय… वगैरे, वगैरे. खास लग्नाकरिता कालच हा ड्रेस आणलाय आणि तिथे बदलायला असेच अजून दोन ड्रेस बरोबर घेतले आहेत!

    तेवढ्यात आसपासच्या गाड्या सुटायला लागल्या, त्यावरून समजले, की, लाल दिव्याची वेळ संपत आली आहे. पाच-सहा सेकंद शिल्लक असले, तरी, लोक आजूबाजूचा अंदाज घेत, सुटतातच. आमचे ‘अच्छा’ ‘बाय’ झाले. हिरवा दिवा लागला आणि आम्ही पण सुटलो. तो यंगस्टरच्या स्पीडने निघाला आणि मी सीनिअर सिटीझनच्या स्पीडने निघालो.

    हेही वाचा – सारं काही मराठीसाठी!

    बायकोनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, मी रस्त्याच्या कोपऱ्यावर कुठे देऊळ दिसते कां? ते बघायला लागलो आणि सिग्नल क्रॉस केल्यावर, लगेचच डावीकडे छोटे मंदिर दिसले. मी स्कूटर साइडला थांबवून, दोन मिनिटांत येतो, असे बायकोला सांगून, मंदिराजवळ गेलो.

    देवासमोर हात जोडून, “धन्यवाद, थँक्यू” असं म्हणालो.

    देवाचे डोळे थोडे किलकिले झाल्यासारखे वाटले आणि ऐकू आलं, “कशाबद्दल?”

    मी : वर्षाच्या 12 महिन्यांमध्ये,  तू चार महिने उन्हाळा तयार केला, त्याबद्दल. आयांच्या फॅशनपायी छोट्या मुलींना वर्षांमधले तेवढे चार महिने तरी थंडीची हुडहुडी भरत नाही.

    देवानी डोळे पुन्हा किलकिले केले आणि ऐकू आले, “वेलकम!”

    देवासमोर मी पुन्हा हात जोडले, आणि निघालो.

    पेपरमध्ये वाचल्याप्रमाणे, ‘एका वेळेस एकच काम – गाडी चालवत असाल तर, इकडे तिकडे स्वैर पाहू नका… गाडी चालवत असाल, तर मोबाइलवर बोलू नका… आणि मोबाइलवर बोलत असाल तर, त्यावेळेस गाडी चालवू नका’, या मंत्रांची मी मनामधे उजळणी केली आणि आता हे तंतोतंत पळायचेच, असे मनात ठरवून, मी गाडी सुरू केली.

    तसं म्हटलं, तर स्त्रियांमध्ये फॅशनची क्रेझ आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. पण तेव्हा रंगसंगती, कलाकुसर यावर भर असायचा. नंतर पाश्चिमात्यांची फॅशन सिनेमावाल्यांनी नट-नट्यांमध्ये आणली. पण ती बऱ्यापैकी सिनेमागृहात सीमित असायची. टीव्हीचा जमाना आला, घराघरात टीव्ही पोहोचला, जाहिराती वाढल्या, शोज् वाढले आणि फॅशनमध्ये अंग प्रदर्शनाचं विषारी बी बेमालूमपणे कसं आणि कुणी पेरलं, हे समजलंच नाही. टीव्हीमधली अंगप्रदर्शनाची फॅशन आता घराघरात अवतरली. आता अंगप्रदर्शन म्हणजेच फॅशन, हेच समीकरण झाले आहे. सध्या स्त्री सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामध्ये या आधुनिक फॅशनचा पण वाटा असणारच!

    ग्लॅमरच्या दुनियेत अंगप्रदर्शन किती पुढे न्यायचं, हे प्रोड्युसर ठरवणार… ग्लॅमर आणि पैसा दिसत असला तर आपण अंगप्रदर्शन कुठे थांबवायचं, हे मॉडेल्स ठरवणार… आपण अनुकरणाची “री” कुठपर्यंत ओढायची, आपण कुठे डोळे बंद करायचे, हे मात्र आपल्याला ठरवायचे आहे… म्हणजेच, हा ज्याचा – त्याचा प्रश्न आहे. पण एक मात्र नक्की – फॅशनमुळे हुडहुडी ही भरतेच भरते!

    आयांची फॅशन – छोट्या मुलींना हुडहुडी, युवतींची फॅशन – पुरुषांना हुडहुडी (साधू – संतांना पण हुडहुडी भरल्याचं आपण वाचतोच) आणि स्त्रियांची फॅशन – नवऱ्यांना हुडहुडी… असंच म्हणावं लागेल!


    मोबाइल – 9225631100

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn