लीना जोशी परुळेकर
लेखाच्या या भागात आपण कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणती उत्पादने वापरावीत, हे पाहणार आहोत. त्याआधी आपण आपल्या त्वचेचा pH म्हणजे काय ते पाहू. pH ची माहिती अशासाठी गरजेची आहे की, कोणत्या प्रकारची उत्पादने कोणत्या प्रकारच्या त्वचेवर वापरल्यानंतर त्वचेच्या pH चा समतोल राखला जातो, हे कळावे म्हणून.
pH Scale ही 0 ते 14 या rangeमध्ये असते. त्यात 7 ही neutral (समतोल) range असते. 7 पेक्षा कमी range असेल तर ते acid मानले जाते आणि 7 पेक्षा जास्त range असेल तर ते alkali किंवा non-acid मानले जाते.
आपल्या त्वचेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती नैसर्गिकरित्या acidic असते, तिची pH range ही 4.5 ते 5.5 च्या मधे असते. त्यामुळे त्वचेवर एक नैसर्गिक आवरण तयार होऊन ते आपल्या त्वचेचे हानीकारक bacteria, अतिनील किरण तसेच प्रदूषणापासून संरक्षण करते. आपल्या त्वचेचा pH हा आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असतो.
सामान्य त्वचेचा pH 4.7 ते 5.75 च्या दरम्यान असतो. तेलकट त्वचेचा pH हा 4 ते 5.2 च्या दरम्यान असतो. कोरड्या त्वचेचा pH हा 5.5 च्या पुढे असतो. संवेदनशील त्वचा आणि मिश्र त्वचा यांची pH level ही चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांत थोड्याफार फरकाने वेगवेगळी असते.
आपण pH strips च्या मदतीने घरच्या घरी आपल्या त्वचेची pH level तपासू शकतो, पण त्याचे परिणाम बरोबर असतीलच असे नाही. आपण आपल्या त्वचेचा pH हा accurately dermatologistकडे जाऊन तपासू शकतो.
सामान्य त्वचा ही सगळ्यात आरोग्यपूर्ण त्वचा असते. या प्रकारच्या त्वचेचा pH हा balance असतो. या त्वचेवर कोणतेही उत्पादन वापरायचे झाले तर, ते एकदम mild असले पाहिजे.
तेलकट त्वचा ही आपल्या नैसर्गिक range पेक्षा कमी range मध्ये असते. म्हणजेच जास्त acidic असते. तेलकट त्वचेमध्ये मुळातच sebum Secretion जास्त असल्यामुळे तेलाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याला बाहेरून मिळणाऱ्या तेलाची आवश्यकता नसते. म्हणूनच तेलकट त्वचेवर water base उत्पादने म्हणजेच lotion आणि gel base उत्पादने वापरावीत.
हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार
तेलकट त्वचेवर रोज CTMS हा Plan वापरला गेलाच पाहिजे. तेलकट त्वचेवर खालीलप्रमाणे उत्पादनांचा वापर करावा.
- Cleanser हे lotion किंवा gel स्वरूपात असावे.
- Toner हे Alcohol Base Astringent वापरावे. यामुळे त्वचेवरील रंध्रे आकुंचन पावून त्वचा घट्ट होते आणि त्वचेवरील excess तेल साफ होऊन त्वचा कोरडी राहण्यास मदत मिळते. तेलकट त्वचेवर काहीवेळा मुरमांचे प्रमाण असते, astringent मुळे infection spread होण्याचे प्रमाण कमी होते.
- Moisturizing, cleanser प्रमाणे हे सुद्धा lotion आणि gel स्वरुपात मिळते.
- Sunscreen हे सामान्यत: lotion आणि gel स्वरुपात उपलब्ध असते.
- बाजारात अनेक प्रकारची lotion आणि gel base उत्पादने उपलब्ध असतात. उत्पादनांवर तसा उल्लेख केलेला असतो. उदा. Cleansing lotion / cleansing gel किंवा moisturizing lotion / moisturizing gel किंवा Sunscreen lotion / Sunscreen gel.
- ही उत्पादने हलकी असल्यामुळे त्वचेत ती सहजपणे मुरतात. या उत्पादनांचा चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अंश रहात नाही.
याशिवाय तेलकट त्वचेवर वाफ घेतली गेली पाहिजे. त्वचा जास्त तेलकट असेल, तिच्यावर मुरमे असतील तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा वाफ घेणे गरजेचे आहे. त्वचा कमी तेलकट असेल, तिच्यावर मुरुमे कमी असतील किंवा नसतील तर दोनवेळा तरी वाफ घ्यावी. वाफेमुळे चेहऱ्यातील रंध्रे मोकळी होतात. अतिरीक्त तेलकटपणा कमी होऊन त्वचा कोरडी होते.
तसेच आठवड्यातून दोनवेळा तरी scrub चा वापर करावा. तेलकट त्वचेसाठी granulated (रवाळ) scrub वापरावा. Scrub मुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेचा थर निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे राठ त्वचा smooth होण्यास मदत होते. जेव्हा जेव्हा Scrub चा वापर केला जाईल, तेव्हा तेव्हा mask (लेप)चा वापर होणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर मुरुमे असतील तर, तेवढ्याच भागाला मुरुमे कोरडे करणारा mask आणि इतर चेहऱ्याला oil control mask वापरावा.
आपल्या रोजच्या CTMS plan मध्ये वाफ, Scrub, Mask या गोष्टी कशा बसवायच्या? तर जेव्हा आपण वाफ, Scrub, Mask वापरू, तेव्हा सर्वप्रथम cleansing करावे. त्यानंतर वाफ घ्यावी. नंतर Scrub वापरावा. त्यावर एकदम थोडे Gel base cream वापरावे. त्यावर mask वापरावा. 15 ते 20 मिनिटांनी Mask काढून टाकावा. त्यावर Toning करावे. Moisturizer लावून नंतर sunscreen लावावे.
हेही वाचा – त्वचेची काळजी कशी घ्यावी?
जेव्हा नुसती वाफ घ्यायची असेल आणि Scrub, mask लावायचा नसेल तेव्हा cleansing नंतर वाफ घ्यावी. चेहरा हलक्या हाताने पुसून त्यावर toning करावे, नंतर moisturizer आणि Sunscreen लावावे.
पुढच्या लेखात आपण इतर त्वचा प्रकारांची काळजी कुठल्या प्रकारच्या उत्पादनांनी घ्यावी ते पाहू.
lee.parulekar@gmail.com