Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नर Recipe : खानदेशी पद्धतीची शेव भाजी

 Recipe : खानदेशी पद्धतीची शेव भाजी

आराधना जोशी

साहित्य

  • खसखस – 2 टीस्पून
  • डाळं – 2 टेबलस्पून (चिवड्यात घालतात ते)
  • बडीशोप – 2 टीस्पून
  • तीळ – 2 टीस्पून
  • धणे पावडर – 1 टेबलस्पून
  • चक्र फूल – 2 (Star Anise)
  • सुक्या खोबऱ्याचा कीस – अर्धा कप
  • काळी मिरी – 2 टीस्पून
  • लवंग – 4
  • तमालपत्र – 3
  • दालचिनीचा तुकडा – 2 इंच
  • जिरं – 1 टेबलस्पून
  • लाल सुक्या मिरच्या –  9 (शक्यतो कमी तिखट असणारी मिरची घ्या)
  • कांदे – 2 मोठे (किंवा कांदा चिरून अंदाजे 2 वाट्या)
  • लसूण – 4 पाकळ्या (किंवा चिरलेला लसूण 2 टीस्पून)
  • आलं – अर्धा इंच
  • तेल – 1/3 वाटी (या भाजीला तेल जरा जास्त लागते)
  • मीठ – चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी
  • तिखट जाड शेव – 2 वाट्या

पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी

तयारीस लागणारा वेळ : 30 मिनिटे

शिजवण्याचा वेळ : 30 मिनिटे

एकूण वेळ : 60 मिनिटे

हेही वाचा – Recipe : पालकाचे थालिपीठ


कृती

  1. साहित्यात सांगितलेले सगळे मसाल्याचे पदार्थ मंद आचेवर कोरडे भाजून गार करायला ठेवा.
  2. कढईत एक टेबलस्पून तेल गरम झाले की, त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा तेलात चांगला परतवून ब्राऊन रंगाचा करून घ्या. नंतर तो पण गार करायला बाजूला‌ ठेवा.
  3. आता मिक्सरच्या भांड्यात आधी कोरडे मसाले एकत्र करून पावडर करून घ्या. मग त्यात तेलावर परतलेला कांदा, आलं, लसूण घालून सगळा मसाला फिरवून घ्या.
  4. पाण्याचा वापर करू नका. मसाला नीट वाटला जात नसेल तरच एखादा लहान चमचा पाणी घालून मसाला गुळगुळीत होईपर्यंत वाटून घ्या.
  5. आता कढईत उरलेले तेल घ्या. तेल तापले की, त्यात हिंग, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात वाटलेला मसाला घाला.
  6. मसाला तेलात चांगला परतवून घ्या. हळूहळू मसाल्यातून तेल वेगळे होताना दिसायला लागेल. साधारणपणे मंद आचेवर मसाला भाजायला 15 ते 20 मिनिटे लागतात.
  7. आता या मसाल्यात हळूहळू 4 ते 5 वाट्या गरम पाणी घालून मसाला एकजीव करून घ्या. नंतर चवीनुसार मीठ घाला.
  8. झाकण न ठेवता हा रस्सा मंद आचेवर उकळी येईपर्यंत ठेवा.
  9. मसाल्यातील तेल आता रश्शयावर दिसायला लागेल. आता गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  10. सर्व्ह करताना एका वाटीत किंवा बाऊलमधे आधी 2 टेबलस्पून तिखट शेव घाला. नंतर त्यावर गरम रस्सा, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळा.
  11. गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीबरोबर छान लागते ही भाजी.

हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा


विशेष आहार माहिती : शाकाहारी

विशेष सूचना

  • मसाल्याचा तिखटपणा कमी करायचा असेल तर दोन मोठे टोमॅटो चिरून कांद्याप्रमाणे परतून थोडेसे मऊ करा आणि मग मिक्सरमध्ये इतर मसाल्यांबरोबर वाटून घ्या.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!