Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…
    Blogs

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यApril 3, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्याची आई प्राजक्ता, दादा गुरुंचा आशीर्वाद, आराध्याचा नवा अध्याय, माधवचे गूढ व्यक्तिमत्व, शर्वायची प्रतीक्षा, आराध्याच्या हाती गूढ पेटी, निशा माधवचे कटकारस्थान, आराध्याच्या विरोधात निशा माधव, दादा गुरुंचा सावध इशारा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 19

    निशा हळूवारपणे आराध्याच्या उशाखाली हात घालण्याचा प्रयत्न करत होती… तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली! खिडकीतून अचानक थंड वाऱ्याचा जोरदार झोत खोलीत घुसला, आराध्याच्या बेडशेजारी ठेवलेला दीपस्तंभासारखा एक मोठा दिवा अचानक खाली कोसळला — जोरात आवाज झाला!

    निशा घाबरली, ताडकन मागे झाली… आणि तितक्यात आजींच्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला… ती घाबरून धावतच बाहेर पडली…

    निशा आणि माधव दोघंही त्या रात्री गुपचूप भेटले. कॉफीचे कप हातात घेऊन, ते वाड्याच्या मागच्या अंगणातल्या अंधाऱ्या झाडाखाली बसले होते. माधवने कप खाली ठेवत निशाकडे त्रासिक चेहरा करत पाहिलं.

    “काय मूर्खपणा केलास गं निशा?” तो पुटपुटला… “झोपलेली वाटली म्हणून तुझी घाई झाली… पण अशाने आपलीच गचांडी धरली जाईल.”

    निशा चिडलीच… “मग काय करू? एवढं सोन्यासारखं काहीतरी तिच्याकडे आहे, हे नक्की… आणि ते गमावायचंय का तुला?”

    माधव थोडा शांत झाला… त्याच्या डोळ्यांत कपटी चमक दिसत होती.

    “तसं नाही, पण पुढचं पाऊल विचारपूर्वक उचलायचं. ती साधी मुलगी नाही. तिच्याभोवती काहीतरी अदृश्य रक्षण आहे, हे तू पाहिलंच.”

    निशा दबक्या आवाजात म्हणाली, “मग आता काय?”

    माधव हळू आवाजात बोलू लागला… “ती आराध्या लवकरच इथून परत जाणार आहे. आपण तिच्या घरीच सगळं रचायचं. तिथे तिला फसवायला सोपं जाईल. “म्हणजे तिला वाटेल, सगळं आपलंच आहे. सगळे ओळखीचे आहेत… आणि तिथे आपण तिच्यावर वार करू शकतो…”

    “कसला वार?” निशाने विचारलं… थोड घाबरून!

    “कोणतं तरी प्रलोभन देऊन तिला फसवायचं. एखाद्या गोड गोष्टीचं आमिष दाखवायचं. किंवा…” तो थोडा थांबला, “तिला भीती दाखवायची की, जर गुपित बाहेर काढलं नाही तर तिच्या प्राजक्ता आईला काही तरी होईल!”

    निशाच्या चेहऱ्यावर एक कुटिल स्मित उमटलं.

    “हो.. तिचा प्राजक्तावर जीव आहे. तिथेच आपली योजना सफल होईल!”

    दोघंही हसले… काळोखात त्यांच्या चेहऱ्यावरची ती धूर्तता चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसत होती. त्या रात्रीपासून त्यांनी आराध्यासाठी एक धोकादायक जाळं विणायला सुरुवात केली होती.

    हेही वाचा – आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    रात्रीची वेळ. आकाशात ढग दाटले होते, वाऱ्याची झुळूक दरवाजे, खिडक्या हलवत होती. आराध्या आपल्या खोलीत शांत झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या मनात पुन्हा त्या अंधाऱ्या बोगद्याची आठवण डोकावली… तिच्या उरात एक अनामिक धडधड वाढत होती. तेवढ्यात… तिच्या खिडकीच्या काचेला कोणीतरी हलकेच थाप देतंय, असं तिला वाटलं. ती दचकून उठली… पाहिलं तर कोणीच नाही.

    फक्त खिडकीच्या काचेवर एक अस्पष्ट बोटांचे ठसे उमटलेले दिसत होते — जणू कोणी बोटांनी “ये” असा संकेत दिला होता.

    ती भयभीत झाली, पण मनात कुठून तरी धैर्य जमवून तिने खिडकीकडे पाऊल टाकलं. तेवढ्यात तिच्या पाठीमागून मंद आवाज आला,

    “आराध्या… बाहेर ये… आपल्याला बोलायचं आहे…”

    ती चमकून वळली — आवाज ओळखीचा होता… निशाचा!

    पण आराध्याच्या अंतरात्म्याने सावध केलं — ही निशा नाही… काहीतरी वेगळं आहे… ती एक पाऊलही पुढे सरकली नाही. तेवढ्यात, तिच्या ओढणीच्या टोकाला काहीतरी अडकलं… खिडकीच्या फटीतून एक झुळूक येऊन तिची ओढणी अलगद खेचली गेली.

    आणि…

    खिडकीबाहेर एक छायाकृती दिसली — धूसर, काळसर, अनोळखी.

    काही क्षण आराध्या स्तब्ध झाली. नंतर ती जोरात ओरडली.

    “आज्जी!!”

    तिचा आवाज करूण होता… वाड्यात प्रतिध्वनी झाला. सुमित्रा आजी आणि लक्ष्मी  आजी दोघी धावत आल्या… पाठोपाठ प्राजक्ताही आली.

    आराध्या भयाने थरथरत सुमित्रा आजीच्या मिठीत शिरली.

    “काय झालं पोरी?” सुमित्रा आजीने तिला घट्ट मिठीत घेतलं.

    आराध्या धडधडत्या आवाजात सांगत होती, “माझ्या खिडकीबाहेर कोणीतरी होतं… मला बोलावत होतं…  ती निशा काकी वाटली आधी  पण ती ती नव्हती…”

    “भास झालं असेल…” आज्जी.

    “भास नव्हता… खरंच होतं कोणीतरी!!”

    सुमित्रा आजी तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या, “शांत हो बाळा… आता काही होणार नाही. मी आहे ना तुझ्यासोबत…”

    तेव्हा लक्ष्मी आजी खिडकीजवळ गेली आणि सावध आवाजात म्हणाली, “सुमित्रा, पाहा… काचेवर काही लिहिलंय!”

    सगळे वळून पाहू लागले, काचेवर बोटांनी लिहिलं होतं…

    “तिचं गुपित माझ्या हाती द्या… नाहीतर तिला हिरावून नेंईन…”

    आराध्या अजूनही सुमित्रा आजींच्या मिठीत लपलेली होती. तिचं अंग थरथरत होतं. प्राजक्ता तिला शांत करत होती. सगळ्यांचा चेहरा काळजीने भरलेला…

    सुमित्रा आजी गंभीर आवाजात म्हणाल्या, “हे काही साधं प्रकरण नाही… लक्ष्मी, लगेच गुरुजींशी बोलायला हवं…”

    बायजा धावत गेली… आज्जीने आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिला दिलासा दिला, “बाळा, घाबरायचं नाही, तू सुरक्षित आहेस. पण आता आपल्याला वेळीच पावलं उचलायला लागतील.”

    आराध्याने डोळे मिटून मान हलवली.

    थोड्या वेळात गुरुजींना सगळा प्रकार सांगण्यात आला. गुरुजी म्हणाले, “सावध रहा. आराध्याला काही काळ घरातून बाहेर नका सोडू.”

    ते आराध्याकडे वळून म्हणाले, “तुझ्याकडे असलेली गोष्ट तुझ्याकडेच राहू दे, योग्य वेळ येईपर्यंत!”

    सुमित्रा आजी म्हणाल्या, “हो गुरुजी, आम्ही काळजी घेऊ.”

    गुरुजींनी सांगितलं, “आता पुढचं पाऊल आराध्याचंच असणार आहे. तिने स्वतःला सामर्थ्यवान बनवायला हवं. वेळ आल्यावरच खरं गुपित उघड होईल.”

    गुरुजी जाताच आजी आराध्याकडे वळल्या. आराध्या, तुला भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण लक्षात ठेव, तुझ्या हातात एक मोठं गुपित आहे. फक्त धैर्य ठेव आणि काहीही झालं तरी आपल्या तत्वावर कायम राहा.”

    आराध्या डोळे पुसत म्हणाली, “आज्जी, मी घाबरणार नाही. मी माझी जबाबदारी निभावीन…”

    त्या रात्री आराध्या आपल्या खोलीत एकटी बसली होती. तिने ती सापडलेली वस्तू — तो गूढ बॉक्स — हळूच बाहेर काढला. हळूवारपणे तो हातात घेतला आणि मनातल्या मनात प्रण केला, “मी या बॉक्सचं रहस्य उघड होईपर्यंत आणि शर्वायच्या हातात तो सुपूर्द करेपर्यंत काहीही होऊ दे, मी हार मानणार नाही!”

    तेवढ्यात वाऱ्याची झुळूक पुन्हा दार हलवत गेली…

    पण यावेळी आराध्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती — एक शांत पण निर्धाराचा प्रकाश होता!

    गुरुजींचा आशीर्वाद घेताच लक्ष्मी आजींच्या चेहऱ्यावर समाधानाची एक झाक दिसली. प्राजक्ताही अगदी नतमस्तक होऊन गुरुजींच्या पायांशी वाकली. दोघींच्या चेहऱ्यावर एका नव्या सुरक्षेची आणि आशेची झलक स्पष्ट दिसत होती.

    हेही वाचा – आराध्याविरोधात निशा अन् माधवने कट रचला, पण…

    पण निशा… ती मात्र सगळं केवळ वरवर दाखवत होती. ती देखील गुरुजींसमोर वाकली खरी, पण तिच्या मनात आदर नव्हता; एक प्रकारची अस्वस्थता आणि ईर्षा धगधगत होती. चेहऱ्यावर नकली विनम्रता पसरवून ती बाजूला सरकली.

    तिथून निघायच्या आधी, गर्दीतील थोडक्याच संधीचा फायदा घेत, माधव निशाच्या जवळ सरकला. हलक्या आवाजात म्हणाला, “तुमचा मोबाइल नंबर देता का? काही महत्त्वाचं सांगायचंय… आपल्या फायद्याचं असेल.”

    निशा काही क्षण विचारात पडली, पण आपल्या स्वार्थी मनाला आवर न घालता तिने पटकन नंबर सांगितला. माधवने तो लगेच आपल्या मोबाइलमध्ये टिपून घेतला.

    जाता जाता दोघांनी एक गुप्त समजूतदार नजरेचं आदान-प्रदान झालं. माधव हळूच पुटपुटला…

    “लवकरच पुढचा कट आखू… अगदी काळजीपूर्वक.”

    तिथून बाहेर पडताना निशाच्या मनात एकच विचार घोळत होता — “हे लॉकेट आणि आराध्या… काहीही करून आपल्याच हातात यायला पाहिजे…”

    आणि दूरवर, आराध्या आपल्या हातात गुप्त लॉकेट धरून अजाणतेपणाने एका मोठ्या संघर्षाच्या दिशेने झपाट्याने पुढे जात होती…

    घरी परतल्यावर निशाच्या वागणुकीत अचानक झालेला बदल कोणाच्याही लक्षात येणार नाही असा नव्हता. ती जी आराध्याला नेहमी टोचून बोलायची, दुर्लक्ष करायची — तिने ते सगळं थांबवलं होतं.

    आता मात्र निशा मवाळ आवाजात आराध्याची चौकशी करू लागली… “आराध्या, बाळा, काही लागलं तर मला सांग हं… तू तर आमचीच आहेस,” असे गोड बोलून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत होती.

    पण आराध्या मात्र सावध होती. अचानक असा बदल झाल्यामुळे तीही थोडी साशंक झाली होती. तरीसुद्धा सगळ्यांसमोर निशाचं हे गोड रूप पाहून कुणाला काही शंका वाटावी. अशी परिस्थिती नव्हती.

    खरंतर निशा आतल्या आत अस्वस्थ होत होती… एवढा बदल करूनही आराध्याकडून काहीही विशेष माहिती मिळालेली नव्हती. आता माधवच्या सांगण्यावरून तिने ठरवलं होतं — पुढचा प्लॅन अंमलात आणायचीच वेळ आली आहे… तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज झाला. अन्वी उड्या मारत आत आली. चेहरा आनंदाने फुललेला होता!

    “आई, मला बोलावणं आलंय एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला जायला!” ती उत्साहाने ओरडली.

    “बापरे, एवढ्या मोठ्या कंपनीत! वा गं अन्वी…” प्राजक्ता आनंदाने म्हणाली. पण निशाच्या डोळ्यांत एक विचित्र चमक दिसली… ती लगेच अन्वीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली,

    “खूप छान गं! आता आपल्यालाही अभिमान वाटेल… एक काम कर, उद्या इंटरव्ह्यूला जाताना आराध्यालाही घेऊन जा.  तुझ्याबरोबर तिचाही इंटरव्ह्यू होतो का बघ!”

    बोलताना तिचा सूर अगदी सहज होता, पण आतल्या आत तिचा डाव शिजलेला होता — आराध्याला सोबत नेताना काही तरी घडवायचं होतं… एक असं जाळं पसरायचं होतं जिथून आराध्या सहज बाहेर पडू शकणार  नाही…

    क्रमशः

    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026 ललित

    जातीभेदापलीकडचे आप्पा अन् अलीकडचा रवीदादा!

    April 2, 2026 ललित

    प्रियकराकडून चौकशी… पण कोरडीच!

    April 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    By माधवी जोशी माहुलकरApril 3, 2026

    1984 साली क्राऊन कंपनीचा ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही आमच्या घरी आला, तोही माझ्या आजीच्या आग्रहाखातर!…

    जातीभेदापलीकडचे आप्पा अन् अलीकडचा रवीदादा!

    April 2, 2026

    प्रियकराकडून चौकशी… पण कोरडीच!

    April 2, 2026

    दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!

    April 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 256
    • अवांतर 179
    • आरोग्य 95
    • पंचांग आणि भविष्य 372
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 190
    • मैत्रीण 17
    • ललित 531
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    April 3, 2026

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026
    Most Popular

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.