Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Unethical values of journalism : शीतावरून भाताची परीक्षा
    अवांतर

    Unethical values of journalism : शीतावरून भाताची परीक्षा

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 16, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    भाताची, अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, पत्रकारिता, नीतिमत्ता, मद्यपान, मराठी_संमेलन, Journalism, Ethics, Alcohol, Marathi_Sammelan
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अजित गोगटे

    `शीतावरून भाताची परीक्षा` या म्हणीनुसार काही पत्रकारांच्या अपवादात्मक वर्तनावरून सर्वच पत्रकारांच्या गैरवर्तनाचे गृहीतक काढणे योग्य आहे का? यावर ज्यामुळे मत-मतांतरे मांडली गेली त्या प्रसंगाविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग मी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीला असताना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धात घडला.

    नक्की कुठे ते आठवत नाही. पण त्यावर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर, बहुदा मध्य प्रदेशात कुठे तरी भरणार होते. संमेलनाच्या आयोजन समितीने संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेसोबत `लोकसत्ता`सह मुंबईतील वृत्तपत्रांना औपचारिक निमंत्रण पाठविले होते. सोबत एक पत्रही होते. त्यात संमेलनासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, या नेहमीच्या मजकूराखेरीज पुढील सूचनाही ठळकपणे लिहिलेली होती :

    “काही पत्रकार आयोजकांकडून अनाठायी अपेक्षा ठेवतात / मागणी करतात आणि ती पूर्ण झाली नाही तर, आयोजक अडचणीत येतील अशा बातम्या देतात, असा अनुभव आहे. तरी, अशा गोष्टी आमच्याकडून खपवून घेतल्या जाणार नाहीत, याची आपण ज्या प्रतिनिधीला पाठविणार असाल त्यांना पूर्वकल्पना द्यावी.”

    हेही वाचा – पत्रकारितेची नीतिमूल्ये आणि प्रसार माध्यमांची विश्वासार्हता

    आयोजकांच्या निमंत्रणपत्रातील हा सूचनावजा मजकूर पत्रकारांविषयी सरधोपट (गैर)समज करून घेऊन त्यांचा अपमान करणारा आहे, असे `लोकसत्ता`च्या संपादकमंडळातील वरिष्ठांचे मत पडले. पत्रकारवर्गामध्ये अयोग्य वर्तन करणारा एखादा असेलही. परंतु त्यावरून सर्वच पत्रकार तसे असतात, असा समज जाहीरपणे व्यक्त करणे, ही आयोजकांची कृती औद्धत्याची आहे, असे संपादकमंडळाचे म्हणणे होते. तेच वैचारिक सूत्र ठेवून दुसऱ्या दिवशीच्या `लोकसत्ता`च्या अंकात साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर टीका करणारे संपादकीय स्फूट लिहिले गेले. मुंबईच्या आणखी एका मराठी दैनिकात अशाच प्रकारे टीका करणारी बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध केली गेली.

    या प्रकरणी आयोजकावर आगपाखड करणे मला त्याहीवेळी पटले नव्हते. `लोकसत्ता`मधील संपादकीय स्फूटाचा सविस्तर प्रतिवाद करणारे पत्र `वाचकांची पत्रे` या सदरात छापण्यासाठी मी संबंधितांकडे दिले. अर्थात, माझे ते पत्र प्रसिद्ध केले गेले नाही, हे वेगळे सांगायला नको! आयोजकांनी त्यांच्या निमंत्रणपत्रात काहीही वावगे लिहिले नव्हते, हे माझे तेव्हाचे मत आजही कायम आहे. पत्रकारिता आणि त्यातील नीतिमूल्ये याविषयी चुकीचे समज (सोईस्करपणे ) डोक्यात भरलेले (भरवून घेतलेले) लोक वरिष्ठ पदांवर बसल्यावर (बसविल्यावर) माध्यमांची विश्वासार्हता गर्तेत जाणार, हे उघड आहे.

    हेही वाचा – पत्रकारितेमधील अनीतिमूल्ये : `व्होडका` भेट देऊन लाज काढली!

    पत्रकारांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करताना `शीतावरून भाताची परीक्षा` हाच निकष लावायला हवा. पत्रकार त्याच्या कामानिमित्त विविध समाजवर्गांपुढे जातो तेव्हा तो  केवळ त्याच्या माध्यमाचे नव्हे तर, तमाम पत्रकारितेच्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत असतो. पत्रकारांचा बडेजाव त्या व्यक्तीचा म्हणून नव्हे तर, तो ज्या माध्यमाचे प्रतिनिधीत्व करतो, त्याची मर्जी राखणे हिताचे असणे, या स्वार्थी हेतूने राखला जातो. जिचा आपल्याला काहीच उपयोग नाही, अशा व्यक्तीला खुश ठेवण्याचा अट्टाहास कोण कशासाठी करेल? पत्रकारांची मर्जी केवळ त्यांच्या व्यवसायामुळे राखली जाते. म्हणूनच एखाद्या पत्रकाराचे गैरवर्तन त्याच्यापुरते व्यक्तिगत न राहता ते त्याच्या व्यवसायाचे प्रातिनिधिक गैरवर्तन ठरते. एकाच्या गैरवर्तनाच्या शिंतोड्यांनी संपूर्ण पत्रकारितेचे विश्व मालिन व्हायलाच हवे. अनेक पत्रकार परिषदा सूर्यास्तानंतर तारांकित हॉटेलांमध्ये होतात. त्यांच्या निमंत्रणांमध्ये ‘पत्रकार परिषदेनंतर मदिरापान आणि जेवण असेल,’ असे स्पष्ट लिहिलेले असते. अशी निमंत्रणे माध्यमांच्या कार्यालयांमध्ये आणून देताना ‘तुमच्याकडून येणारा प्रतिनिधी पिणारा आहे का?’ असे विचारून दिली जात नाहीत. अशा निमंत्रणामागेही सर्व पत्रकार पिणारेच असतात, असे अप्रत्यक्ष गृहीतक असते. अपमान झाल्याचे न मानता किंवा कपाळावर नाराजीची एकही अढी न पडू देता अशा निमंत्रणांचा सहर्ष स्वीकार केला जातो. थोडक्यात, पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे पालन दुटप्पीपणाने केले जाते आणि हातात लेखणी आहे म्हणून अतार्किकतेने काहींवर निष्कारण आसूड ओढले जातात.

    (क्रमशः)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    By सुधीर करंदीकरMarch 23, 2026

    जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना…

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn