Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : असा सुरती उंधियू करून पाहिला आहे का?
    फूड काॅर्नर

    Recipe : असा सुरती उंधियू करून पाहिला आहे का?

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 21, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, सुरती उंधियू, सुरती उंधियो, सुरती भाजी, गुजरात स्पेशल उंधियू, गुजरात स्पेशल उंधियो, वांग्याची मिक्स भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कामिनी व्यवहारे

    उंधियूचे साहित्य

    • कोवळी सुरती पापडी – पाऊण किलो
    • कंद किंवा कोनफळ – एक मध्यम आकाराचा
    • रताळी – 3 ते 4 मध्यम आकाराची
    • लहान जांभळी वांगी – 10 ते 12
    • अगदी लहान बटाटे – 10 ते 12
    • तुरीचे कोवळे दाणे – अर्धी वाटी
    • मटार – अर्धी वाटी
    • हरभऱ्याचे कोवळे दाणे – अर्धी वाटी
    • कच्ची केळी – 2 ते 3
    • एकत्र किसलेली आंबेहळद आणि साधी हळद – अर्धी वाटी
    • मेथी – 2 वाट्या बारीक चिरलेली
    • धणे पावडर – 2 टेबलस्पून
    • जिरे पावडर – 2 टेबलस्पून
    • तिखट – 2 टीस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • दोन लिंबांचा रस
    • तेल – एक ते दीड वाटी

    मेथी मुठियाचे साहित्य

    • मेथी – 1 मोठी जुडी
    • धणे पावडर – 2 टीस्पून
    • जिरे पावडर – 2 टीस्पून
    • लाल तिखट – 2 टीस्पून
    • हळद – पाव टीस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – 1 टीस्पून
    • हिंग – चिमूटभर
    • डाळीचे पीठ – 2 वाट्या
    • तेल – तळणासाठी

    वाटण मसाला साहित्य

    • ओला लसूण पात – 1 मोठी जुडी
    • कोथिंबीर – 1 मोठी जुडी
    • आले – 2 इंच
    • हिरव्या मिरच्या – 8 ते 10 (कमी तिखट)
    • दोन मोठ्या लिंबांचा रस
    • नारळ – 1 खोवलेला
    • साखर – 3-4 टीस्पून

    मेथी मुठियांची कृती

    1. मेथी धुऊन बारीक चिरून घ्या.
    2. त्यात सगळे मसाले घाला. सगळं नीट मिसळून थोडा वेळ तसंच ठेवा.
    3. नंतर त्यात डाळीचे पीठ घालून घट्ट भिजवा. डाळीचे पीठ जरी दोन वाट्या लिहिले असले तरी भाजीच्या मिश्रणात बसेल, या प्रमाणात पीठ कमी-जास्त करा.
    4. हातानं बोरापेक्षा थोडे मोठे लांबट आकाराचे मुठिये करून घ्या.
    5. कडकडीत तेलात लाल रंगावर तळा आणि बाजूला ठेवा.
    6. मुठियांमध्ये पीठ कमी आणि मेथी भरपूर दिसायला हवी.

    वाटण मसाला कृती

    1. मसाल्यासाठीचं सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालून एकजीव वाटून घ्या. मसाला फारवेळ फिरवून वाटू नका, नाहीतर तो काळपट रंगाचा होतो. मसाला हिरवागार दिसायला हवा. म्हणून वाटतानाच लिंबाचा रस घाला म्हणजे रंग छान येईल.

    उंधियूची कृती

    1. कोवळ्या सुरती पापडीच्या शिरा काढून दोन भाग करा. तसेच कंद किंवा कोनफळाचे चौकोनी मोठे तुकडे करा.
    2. रतळी सोलून मोठे तुकडे करा. भरली वांगी आणि भरले बटाटे करतो त्या प्रमाणे वांगी आणि बटाट्याला उभ्या चिरा द्या. कच्च्या केळ्यांचेही सालासकट मोठे तुकडे करा.
    3. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात तेल गरम करा.
    4. तेल गरम झाले की, त्यात किसलेली हळद घाला. जरासं परतून त्यात सुरती पापडी घाला. पुन्हा नीट परतून घ्या आणि झाकण घालून मध्यम आचेवर ठेवा. मधूनमधून परतत पापडी चांगली शिजू द्या.
    5. पापडीला चांगली वाफ आली की, त्यात कच्च्या केळ्याचे तुकडे, कंद आणि रताळ्याचे तुकडे घाला. परत झाकण ठेवून पाच मिनिटे एक वाफ येऊ द्या.
    6. नंतर त्यात बटाटे आणि वांगी घालून नीट मिसळून घ्या.
    7. आता त्यात तिखट, मीठ, धणे-जिरे पावडर घाला आणि छान परतून घ्या.
    8. लगेचच तुरीचे मटारचे आणि हरभऱ्याचे दाणे घाला. परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे वाफ येऊ द्या.
    9. नंतर त्यात वाटलेला मसाला आणि लिंबाचा रस घाला. चव बघून हवी असल्यास अजून साखर घाला. उधियू आंबट, गोड, तिखट असायला हवा.
    10. सगळं नीट एकत्र करून घ्या आणि दोन मिनिटे शिजू द्या.
    11. आता त्यात चार फुलपात्र पाणी घाला आणि नीट ढवळून घ्या. पाण्याचे प्रमाण आपल्याला हवे तसे कमी जास्त करा. पाणी जरा जास्त असेल तर उधियू कोरडा न होता ओलसर होतो आणि चांगला लागतो.
    12. नंतर त्यात मेथी घालून परत ढवळून घ्या.
    13. सर्वात शेवटी वर मेथी मुठिये घाला.
    14. गॅस मध्यम आचेवर ठेऊन सर्व जिन्नस चांगले शिजू द्या.

    एकूण कालावधी – एक तास

    टिप्स

    • मेथीचे मुठिये आदल्या दिवशी करून ठेवले तरी चालतील.
    • मेथीचे मुठिये करायचे नसतील तर फरसाणाच्या दुकानात तयार मिळतात ते वापरू शकता.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn