Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आता तर दिदीने फतवा काढला…
    ललित

    आता तर दिदीने फतवा काढला…

    Team AvaantarBy Team AvaantarMay 4, 2025No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, मांजर, बोका, डंपर, डिगर, दनू, पिदू
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    दरवाजा उघडल्याबरोबर मला समोरच धुवून वाळत घातलेले आमचे मोठे पिंजरे दिसले! मग काय माझी पाचावर धारण बसली… मला वाटले दिदी पुन्हा आम्हाला पिंजऱ्यात घालते की काय? जीवाच्या आकांताने मी प्रतिकार केला आणि दिदीच्या डोक्यावरून उडी मारून पसार झालो! बरं, मी जी धाव घेतली ती सरळ मागच्या अंगणाच्या एका बाजूला जिथून जाळी होती, तिच्या खालून सटकून मी घराला वळसा घालून पुढच्या अंगणात आलो. तिथे काही कुंपण वगैरे नाही… त्यामुळे सरळ समोरच्या मुख्य रस्त्यावर आलो! आता इकडून पळ काढला तर सरळ महामार्गावर पोहोचलो असतो, पण नशिबाने रस्त्यावर पळण्याऐवजी मी घराबाजूच्या झुडपात लपायचे ठरवले.

    झुडपाच्या मागे भिंतीच्या बाजूला मी आणि समोर दिदी, एकमेकांना शह देऊन बसलो. आधीच्या शिकवणीनुसार मी थोडा सावरून तिला पट्टा पकडू देतो का, याची ती बिचारी वाट बघत होती. पण बराचवेळ झाला तरी परिस्थिती ‘जैसे थे’च ! मग आई बाजूने त्या झुडपामागे शिरली आणि मी पट्टा पकडू देत नाही, असे बघून सरळ शेपटी पकडून माझे मानगूट पकडले! अशा प्रकारे माझा पलायनाचा दुसरा प्रयत्न हाणून पाडला.

    मला पट्टा घालून काहीही उपयोग नाही, या निष्कर्षाप्रत या दोघी आता आल्या आहेत. हौदिनी जादूगार जणू त्याचे साखळदंडातून सुटण्याचे सारे कसब मलाच शिकवून गेला आहे, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नंतरच्या प्रयत्नात त्यांनी पट्ट्याशिवायच आम्हा दोघांना (दनू आणि मी) एकत्र सरळ मागच्या अंगणात सोडले. फक्त एका बाजूने जिथे जाळी होती तिथे पप्पा अडवून उभे राहिले. बाकी अंगणाला लाकडी मध्यम उंचीचे कुंपण आहे. आम्ही अंगणात आधी थोडे सावध फिरत होतो, पण लवकरच उधळलो! आता आम्हाला अंगण कमी पडत होते… आणि आमची नजर कुंपणाच्या उंचीचा अंदाज घेते आहे आणि त्या जवळच्या झाडांवर चढायचा आम्ही प्रयत्न करत आहोत, हे बघून आई आणि दिदी सावध झाल्या. आता चला घरात म्हणून आल्या पकडायला… आईने थोड्या पळापळीनंतर दनूला पकडले, त्याने जोरदार प्रतिकार केला… पण त्याला घरात घालण्यात आई यशस्वी झाली.

    आता या दोघी माझ्या मागे लागल्या, पण आता मी सावध होतो… आईच्या हाती शेपूटपण लागू दिली नाही! आणि आत डांबलं तरी खिडकीत बसून दनू मला मार्गदर्शन करतच होता! आई दमून आत गेल्यावर मी दिदीलापण चांगलेच धाबडवले. शेवटी दमून मी आणि दिदी दारासमोर धापा टाकत बसलो. पण आत जायचा काही माझा इरादा नव्हता. पण आईने फ्रीजमधून चक्क कोळंबी काढली…. आणि दनू पण मला सूचना करण्याची आपली जबाबदारी सोडून पसार झाला… आता तो गेला म्हणजे माझ्या वाट्याचे पण फस्त करणार… उगीच कोळंबी संपण्याचा धोका पत्करायचा नव्हता म्हणून मी पण गुपचूप घरात आलो!

    हेही वाचा – अखेर आम्ही अमेरिकेला पोहोचलो!

    आता मात्र दिदीने फतवा काढला… आम्हाला कोणी बाहेर काढले तर खबरदार! ती तरी बिचारी काय करणार, रात्री झोपेत पण तिला ती गवतात माझ्यामागे धावते आहे, असे तिला भास होत होते!

    नंतर घडलेल्या एका प्रसंगाने तर आम्हाला बाहेर पाठवायचे नाही हे नक्कीच केले…

    आमच्या घरासमोर डेझी नावाची गावभवानी मांजर राहते. रात्रभर उंडारून भल्या सकाळी परतते, तेव्हा तिच्या घरातले सगळे झोपलेले असतात, पण आमचा दादा त्याचवेळी शाळेसाठी निघतो म्हणून आई दरवाजा उघडते. आमची आई एक येडी, दिसलं कोणी शेपटीवालं, की पाघळलीच! तर, या डेझीने सरळ सकाळच्या हफ्त्यासाठी आईशी सूत जुळवलं. मला हे अजिबात पसंत नाही… म्हणून ती दिसली रे दिसली की, मी तिला खिडकीतून दमदाटी करतो. तशी ती मला वचकून आहे, पण वाह्यात एवढी की, आता ती तिचे दोन- तीन दांडगे काळे बोके मित्रही खाण्यासाठी घेऊन येते. आधी त्यांचा आकार बघून मी थोडे नारमाईने घेतले, पण नंतर कळलं या बोक्यांमध्ये काय पाणी नाय राव! भांडणात काय मज्जाच येत नाय. आपल्या भारतात कसं इकडून हाळी दिली “अबे ए नरसाळ्या…!” की समोरून तोडीस तोड प्रत्युत्तर येतं “आबे रताळ्या….” फायनल मारामारी करायच्या आधी अर्धा तास तरी मस्त कलगीतुरा रंगतो! इथे म्हणजे आव्हान दिल्यानंतर, ते सरळ दुर्लक्ष करून खातात किंवा शेपूट घालून पळून जातात… काय गंमतच नाय… मग माझे पंजे कधी त्यांना बघून शिवशिवले तर मी सरळ दनूला बदडून काढतो. तो बिचारा भलताच शांततावादी आहे, त्यामुळे मी बाहेर भांडण सुरू केले की, तो पलंगाखाली पळून जातो!

    तर एकदा अशीच दरवाजापलीकडे कोणीतरी खात असल्याची चाहूल लागली… मी दम द्यायला खिडकीत पळालो आणि दनू पलंगाखाली. मी खिडकीतून जे पाहिले त्याने चक्रावून गेलो… बेणं दिसत तर होतं उंदरासारखं, म्हणून दम मारावा तर आकाराने माझ्यापेक्षा मोठं! पळून जावं की दम द्यावा? चलबिचल सुरू झाली. मी असे काय करतो आहे, हे बघायला आई खिडकीतून डोकावली तर, तिलाही कळेना, हे प्रकरण काय आहे. मग दिदीने सांगितले की, तो ओपोसम नावाचा प्राणी आहे. इथे असे अनेक प्राणी, वनस्पती आहेत की, ज्यांना आम्ही कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे त्याचे धोके किंवा त्यापासून बचाव कसा करावा, हे आम्हाला माहीत नाही. आम्ही ज्या वातावरणात वाढलो तिकडे वावरायला आम्ही सुसज्ज आहोत, पण या निसर्गाची आम्हाला माहिती नाही आणि मग या अज्ञानातून बिकट प्रसंग उद्भवू शकतो. जसं भारतातून आलेल्या एका श्वान भाऊंच्या बाबतीत झाले.

    हेही वाचा – अश्रू भरल्या डोळ्यांनी आईने केले टाटा…

    इथे स्कंक नावाचा एक दिसायला सुंदर, गोड पण महा खतरनाक प्राणी आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान! हा अतिशय भयानक वासाचा फवारा मारतो, तो वास जाता जात नाही आणि सहनही होत नाही. याच्या वाट्याला इतर प्राणी सोडा माणसेही सहसा जात नाहीत. तर, आपल्या अंगणात या अगांतुकला बघून या नुकत्याच भारतातून आलेल्या वीराचे (श्वान भाऊ) रक्त खवळले आणि धावले बाहेर मर्दुमकी गाजवायला. आता हा प्राणी कोण, काय करतो हे ठावूक नसल्याने सरळ गेले शेपटीचा मुका घ्यायला… त्या स्कंकने जो फवारा सोडला… याचे तर डोकं साफ फिरलंच… पण याला आवरताना आणि त्याच्यावर बसलेल्या वासाने घरातल्यांची पण वाट लागली. शेवटी मध्यरात्री फिरून वीस लिटर टोमॅटोचा रस आणला आणि त्याने याला दहावेळा आंघोळ घातली… तेव्हा परिस्थिती थोडी आटोक्यात आली!

    त्यामुळे अशी काही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आमचे बाहेर जाणे तात्पुरते रहीत करण्यात आले आहे. तर, सध्या आम्ही खिडकीत बसून बाहेरच्या खारुताई, सरडे, पक्षी आणि फिरायला निघालेले भुभू यांना उंगली करतो.

    आमच्या गल्लीत आमची खिडकी ‘माऊची खिडकी’ म्हणून प्रसिद्ध आहे. गल्लीतील लोक आईशी बोलताना “ओह! तुमचं घर म्हणजे त्या माऊ खिडकीत असतात तेच का?” अशीच ओळख देतात. पण लवकरच आम्ही नवीन घरात जाणार आहोत आणि तिथे मांजरांसाठीचे विशेष कुंपण लावून घेऊन आम्हाला मागच्या अंगणात सोडावे, असा प्रस्ताव आईने पप्पांकडे मांडला आहे. पप्पांचे म्हणणे आहे की, त्यांना दनूची काळजी नाही पण या कार्ट्याचा, म्हणजे माझा, भरोसा नाही… 100% escape rate आहे… जेव्हा जेव्हा बाहेर काढले तेव्हा तेव्हा मी कारनामे केले आहेत. अशा वेळेला मी जितका म्हणून भाबडा चेहरा करता येईल तितका करून दिदिकडे जातो. आमची दिदीही घरातील मार्जार हक्क संस्थापन, संरक्षण आणि संवर्धन या समितीची अध्यक्ष आहे! हसू नका, घरातील सगळ्यात जास्त पावरफुल्ल समिती आहे ही! आमचे ब्रीद वाक्य आहे “मी काय पण करीन!” आणि ते आम्ही कसोशीने पालन करतो. त्यामुळे काहीही भानगड केल्यावर जर आई बोंबाबोंब सुरू असेल तर, आम्ही सरळ शेपूट दाखवून शांतपणे चालते होतो आणि तिला सांगतो “माझ्या शेपटीशी बोल!”

    क्रमश:

    (पिदू या मांजराची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn