Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पंचनामा : झाडाकडे पाहून धनगर दिनूची बोबडीच वळली…
    ललित

    पंचनामा : झाडाकडे पाहून धनगर दिनूची बोबडीच वळली…

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 8, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, पंचनामा, धनगर दिनू, आत्महत्या, गावातील जीवन, काल्या कुत्रा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    भाग – 1

    खरंतर, जीवन आणि मृत्यू या दोन घटनांवरच मनुष्य आपल्या आयुष्यातील आराखडे तयार करतो. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून वर्तमानातील सुखाचा विचार कधीच करत नाही, त्यामुळेच भौतिक गोष्टींच्या मागे लागून आपण जगण्यातला आनंद गमावतो. एखाद्याचे जगणे लक्षात राहते नाहीतर, मरणे लक्षात राहते! परंतु यामध्ये एखादी घटना जर अचंबित करणारी असेल तर, ती मात्र कायमची लक्षात राहते. त्यावरच आधारीत ही गोष्ट आहे.

    एक गाव होते. त्या गावातील चार-पाच सधन घर सोडली तर, इतर लोक साधारण परिस्थितीतील किंवा शेतकरी कुटुंबातील होते. त्या गावामध्ये अठरापगड जातीची लोक राहात होती. त्यामुळे गावाचा भांडणतंट्याचा निवाडा तिथल्या पंचायतीच्या सहाय्याने होत असे. पंचांनी दिलेला निर्णय हा सर्वानुमते मान्य व्हायचा. गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था, एकी राहण्याचे श्रेय त्या गावातील सरपंचाला दिले जायचे… कारण तोच गावचा ‘मुखिया’ असायचा.

    त्या गावातील गुराखी दिनू नेहमीप्रमाणे आपल्या गाई-म्हशींना गोळा करून गावाबाहेर असलेल्या रानमाळाकडे सकाळी रवाना होत असे. गाई-म्हशींना चरण्यासाठी दिनू नदीच्या पलीकडच्या रानात घेऊन जात असे. दिनूसोबत त्याचा आवडता कुत्रा ‘काल्या’ असायचा. त्याच्या भरवशावर रानामधे गाई-म्हशी सोडल्या की, दिनू एखाद्या डेरेदार वृक्षाखाली आपली न्याहारी करून निवांतपणे आराम करत असे. हा त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेला होता. गाईम्हशींना देखील ते माळरान आणि ती पायवाट परिचयाची झाली होती. त्यामुळे दिनूने आपली पथारी टाकली की, त्या रानात चरायला मोकळ्या असायच्या. संध्याकाळी चरून झाल्यावर चौफेर विखुरलेल्या गाई दिनूच्या हाकेसरशी त्याच्यापाशी गोळा होऊन मुकाट्याने त्याच्यासोबत गावाकडची वाट धरायच्या. उरल्यासुरल्या मागे रेंगाळलेल्या गाईंना आणि वासरांना काल्या त्यांच्यामागे धावुन कळपात सामील करून घेत असे. घराकडे परत जाताना परत एकदा नदीचे पाणी पिऊन त्या तृप्त व्हायच्या आणि सगळा कळप नंतर आपापल्या मालकाकडे रवाना होत असे.

    हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!

    झालं काय की, एक दिवस संध्याकाळी दिनूने आपल्या गाई-म्हशींचा कळप गोळा करून गावाकडची वाट धरली. संध्याकाळच्या नीरव शांततेत पाणवठ्यावरील पक्षांचा किलबिलाट आणि सोबतीला दिनूच्या गाई-म्हशींच्या गळ्यातील घुंगरांचा आणि घंट्याचा आवाज भर घालत होता. एखाद दुसरी बैलगाडी शेतातून परतत होती. आपल्याच नादात दिनू तोंडाने शीळ घालत नदीजवळ कधी येऊन ठेपला ते त्याच त्यालाच कळलं नाही. नदी ओलांडून जायची असल्यामुळे गाई-म्हशी अलगदपणे पाण्यात उतरल्या. आपली दिवसभराची तहान भागविण्यासाठी नदीचे पाणी पिऊन त्या तृप्त होत थोडावेळ मनसोक्तपणे पाण्यात डुंबायला लागल्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी दिनू आणि काल्या कुत्रादेखील पाण्यात शिरले. संध्याकाळचा अंधार दाटायला सुरुवात झाल्याने दिनूला आता गावाकडे लवकर परतायची घाई लागली होती. तो गाई-म्हशींना काल्याच्या मदतीने नदीच्या किनार्‍याकडे हाकलायला लागला. संध्याकाळच्या संधीप्रकाशात सगळा नदीकिनारा अंधाराची वाट पहात होता. दिनूच्या गाईम्हशी एकामागून एक किनार्‍यावर यायला लागल्या तशा दिनूने पण नदीच्या त्या वाहत्या पाण्यात हातपाय धुऊन घेतले आणि तो किनार्‍यावर येऊन एका उंच टेकाडावर उभा राहिला. दूरवर नजर टाकत, त्याने सगळी ढोर पाण्याबाहेर आली की, नाही ते पाहिले… तोच त्याची नजर नदीकाठी असलेल्या बाभळीच्या झाडाकडे गेली. त्या झाडावर त्याला अंधारात काहीतरी लटक्यासारखे दिसले, परंतु अंधार दाटत आल्यामुळे त्याला अंदाज बांधता येईना. म्हणून त्याने काय लटकले आहे, हे पाहण्यासाठी त्या झाडाकडे आपली पावलं वळवली. त्याला त्या झाडाकडे जाताना पाहून काल्या कुत्रापण त्याच्या मागोमाग चालायला लागला. गाईम्हशींनी घराची वाट धरली. दिनूच्या मागे काल्या तुरूतुरू चालत होता.

    हेही वाचा – पोतराज… मुख्य प्रवाहात येण्याची गरज!

    चालता चालता काल्या अचानक थांबला आणि दिनूच्या पायजमाला धरून त्याला मागे ओढू लागला. दिनूला तो असं का करतोय, ते कळेना म्हणून त्याने काल्याच्या अंगावर काठी उगारली… तरी तो ऐकेना! तो दिनूला त्या झाडाजवळ जाऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता… परंतू दिनूला त्या झाडाला काय लटकले आहे, ते पाहण्याची उत्सुकता होती. झाडाझुडूपातून वाट काढत दिनू त्या झाडापाशी पोहोचला आणि समोरचे दृश्य पाहून त्याची भीतीने बोबडीच वळली. त्याचे हातपाय गारठले आणि त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली… कारण त्या झाडावर एका माणसाने गळफास घेतला होता. त्याची जीभ बाहेर आली होती आणि डोळे बटबटीतपणे बाहेर आले होते. ते पाहून दिनूला दरदरून घाम फुटला होता. त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. कसंबसं स्वतःला सावरत काट्याकुट्यातून धावत त्याने गावाकडे धूम ठोकली आणि त्याच्या पाठीमागून त्याचा कुत्रा काल्यापण तोंडाने विचित्र आवाज काढत धावत सुटला.

    क्रमशः

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn